अमेरिकेचा तालिबानशी काय झाला ऐतिहासिक करार

वृत्तसंस्था
शनिवार, 29 फेब्रुवारी 2020

करारातील महत्त्वाचे मुद्दे

  • सर्व प्रकारच्या मोहिमा आणि कारवाया बंद.
  • अफगाणिस्तान सरकार आणि तालिबान यांच्यात १० मार्चपर्यंत चर्चा.
  • पुढील चौदा महिन्यात अमेरिकेची सैन्य माघारी. 
  • पाच हजार दहशतवाद्यांना सोडणार, अफगाणिस्तानचेही १००० सैनिकांना सोडणार

शांततेच्या मार्गावर चालण्याची अफगाणि-स्तानच्या नागरिकांना ही मोठी संधी चालून आली आहे. त्यांनी या संधीचा सदुपयोग करावा. 
- डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे अध्यक्ष

आमचा त्याग फार मोठा आहे. दहशतवादामुळे आमच्या नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या करारामुळे देशात कायमस्वरूपी शांतता नांदेल, अशी मला आशा आहे. 
- अश्रफ घनी, अफगाणिस्तानचे अध्यक्ष

दोहा, काबूल - अमेरिका आणि तालिबानी दहशतवाद्यांची संघटना यांच्यातील ऐतिहासिक शांतता करारावर आज कतारची राजधानी दोहा येथे स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या करारानुसार पुढील १४ महिन्यांत अमेरिका आपले सर्व सैनिक अफगाणिस्तानातून माघारी बोलविणार असून, त्यामुळे अठरा वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धाला पूर्णविराम मिळाला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

अमेरिकेचे विशेष दूत जाल्मे खलीलजाद आणि तालिबानचा राजकीय प्रमुख मुल्ला अब्दुल घनी बरादार यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या वेळी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पियो उपस्थित होते. 

Coronavirus:चीननंतर 'या' देशात आहेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण

आज झालेल्या कारारामुळे अफगाणिस्तानचे सरकार आणि तालिबान यांच्यातील संवाद सुरू होणार असून, त्याला यश आल्यास मागील अठरा वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष थांबण्यास मदत मिळणार आहे. 

कोरोना व्हायरसमुळं बिअरचं काय झालं? सोशल मीडियावर अफवा

या करारापूर्वीच्या चर्चेत तालिबानच्या वतीने मुल्ला बरादार आणि अमेरिकेतर्फे खलीलजाद यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडल्याचे सांगण्यात आले. दोहा येथील अलिशान हॉटेलमधील कक्षात या दोन्ही नेत्यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. करार झाल्यानंतर उपस्थितांनी उत्साहात घोषणा दिल्या, त्याचवेळी खलीलजाद आणि बरादार यांनी हस्तांदोलन केले. 

आणखी वाचा - बाप रे सोन्याचा दर, लाखावर!

तालिबानने अल कायदा या दहशतवादी संघटनेबरोबर असलेले सर्व संबंध तोडून टाकण्याची अट अमेरिकेकडून घालण्यात आली आहे. दोहा येथे शांतता करार झाल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाण नागरिकांचे अभिनंदन केले आहे. या करारामुळे नव्या उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करण्याची संधी अफगाण नागरिकांना मिळाली असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. 

आणखी वाचा - मंत्र्यांनी स्टेजवरच मारला चिकनवर ताव 

अमेरिका आणि तालिबान यांच्यातील वाटाघाटींमध्ये अफगाणिस्तान सरकारचा थेट सहभाग नव्हता. त्यामुळे शांतता करारानंतर अफगाणिस्तानातील परिस्थितीत नेमका काय फरक पडेल याबाबत अनिश्चितता कायम आहे. आज झालेल्या करारावेळी भारताचे कतारमधील राजदूत पी. कुमारन हेदेखील उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What happened to the United States with Taliban agreement