मोहम्मद पैगंबरांचं शक्तीस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्यांच्या पत्नी 'खदिजा'

खदीजाने तिसरे लग्न मोहम्मद यांच्यासोबत केले. लग्नाच्या काही वर्षानंतर हेच मोहम्मद इस्लामचे पैगंबर झालेत.
Mohammed Paigambar's wife
Mohammed Paigambar's wifesakal

सध्या सर्वत्र पैगंबरांचा विषय बराच गाजतोय. भाजप नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे हा विषय आणखी चिघळला. या प्रकणातून एक बाब समोर आली ती म्हणजे पैगंबरांच्या आयुष्यात असणारी ती स्त्री कोण होती? ती महिला कोण होती? ती मोहम्मद यांच्या आयुष्यात कशी आली ? आणि तिचे पैगंबराच्या आयुष्यात काय योगदान आहे ? तसेच तिचे आणि पैगंबऱ्यांचे सामाजिक आणि वैवाहिक जीवन कसे होते? या सगळ्या तपशिलावर आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहोत. (Who is Mohammed Paigambar's wife?)

Mohammed Paigambar's wife
पंचांग 9 जून: या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे

खदीजा कोण होती?

या शक्तीशाली महिलेच नाव खदीजा होतं. खदीजा ही एका श्रीमंत कुटुंबात वाढलेली लेक होती. तिला समाजातील लोकांप्रती खुप आदर होता. ती जशी पैसाने श्रीमंत होती तशीच मनानेही श्रीमंत होती.

सौदर्याच लेणंही खदीजाला लाभलेलं होतं. त्यामुळे अनेक मोठ्या लोकांनी तिच्यासमोर लग्नाचे प्रस्ताव ठेवले होते पण तिने बहुतेकांना नकार दिला. पुढे तिने एका गृहस्थांशी लग्न केले आणि दुदैवाने त्या गृहस्थाचे निधन झाले. त्यानंतर तिने पुन्हा दुसऱ्यांदा लग्न केले पण तेही अयशस्वी ठरले.

यानंतर तिने ठरवले की आता मी पुन्हा लग्न करणार नाही. पण काही काळानंतर तिच्या आयुष्यात एक अनोखी व्यक्ती आली आणि तिची त्या व्यक्तीसोबत विवाह करण्याची इच्छा झाली. तिने लग्न केले तो तिचा शेवटचा नवरा ठरला.

Mohammed Paigambar's wife
Prophet Muhammad Row: भारताच्या भूमिकेवर इराणचे परराष्ट्रमंत्री समाधानी

खदीजाच्या अंगी काही अद्भुत गुण होते जेव्हा तिने पुन्हा कधीही लग्न न करण्याचा निर्णय बदलला तो मोठा धाडसी होता. कारण त्या काळातील प्रथेच्या विरोधात जाऊन खदिजाने स्वतःहुन त्या पुरुषाकडे लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावेळी ती 40 वर्षांची होती आणि तिचा होणारा नवरा फक्त 25 वर्षांचा तरुण होता.

हे असे आगळेवेगळे प्रेमप्रकरण फक्त स्त्री आणि पुरुष यांच्यातील मुद्दा नाही तर त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. तुम्हाला ऐकायला आश्चर्य वाटेल पण जगातील दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या धर्माच्या उदयाचा संबंध या नात्याशी निगडीत आहे.

Mohammed Paigambar's wife
पाकिस्तानात मंदिराच्या पुजाऱ्यावर भ्याड हल्ला; जमावाकडून मूर्तींची तोडफोड

खदीजाने तिसरे लग्न मोहम्मद याच्यांसोबत केले. लग्नाच्या काही वर्षानंतर हेच मोहम्मद इस्लामचे पैगंबर झालेत. प्राचीन इतिहासाचे प्राध्यापक सांगतात की खदीजाबद्दल संपूर्ण माहिती मिळणे कठीण आहे. कारण खदिजाच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनी तिच्याविषयी काहीतरी लिहिले गेले आहे.

असं म्हणतात की खदिजाला बंधनात राहणे आवडत नव्हते. ती मुक्तछंद ,खूप मजबूत इच्छाशक्ती असलेली बाई होती. तिने त्या काळात तिच्या चुलत भावांशी लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. कारण तिला स्वतःचा जीवनसाथी निवडायचा होता. खदिजा ही एका श्रीमंत व्यापाऱ्याची मुलगी होती. आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर खदीजाने स्वतः सगळया व्यावसायिक साम्राज्याचा ताबा घेतला.

Mohammed Paigambar's wife
स्वातंत्र्यावर गदा आणू नका; नुपूर शर्मांना पाठिंबा देणारे डच खासदार म्हणतात...

खदीजाला निश्चितपणे स्वत:च्या मनाने जीवन जगायचे होते. आणि शेवटपर्यंत ती तिच्या मार्गाने चालत राहिली. खरं तर, तिच्या व्यवसायाच्या आवडीने तिला एक नवीन मार्ग दाखवला आणि तिने त्या मार्गावर चालुन जगाचा इतिहास बदलला. इतिहासाची पाने उघडली तर अस समजतं की खदीजा तिची सर्व कामे मक्का आताचे सौदी अरेबिया येथून करत होती.

खदीजाला तिच्या कुटुंबाकडून भरपूर संपत्ती वारसाहक्काने मिळाली होती .सोबतच तिने स्वत:ही भरपूर संपत्ती कमावली देखील होती. खदीजा ही उत्तम उद्योजक होती. तिने स्वतःचे निर्णय घेतले. तिच्यात प्रचंड आत्मविश्वास होता. ती नेहमी स्वतःचे कर्मचारी निवडायची आणि निवड करतांनाच ती पारखुन करायची. खास कौशल्य असलेल्या लोकांनाच कामावर घ्यायची त्यामुळेच तिच्या व्यवसायाला भरभराटीचे दिवस आले होते.

ती व्यवसाय पाहत असतानाच तिला एका माणसाची ओळख झाली जो खूप प्रामाणिक आणि मेहनती होता. खदीजाने यांची भेट घेतली. आणि पहिल्याच भेटीत समाधानी होऊन खदिजाने त्या व्यक्तीला आपल्या एका काफिल्याचे नेतृत्व करण्यासाठी निवडले. खदिजा त्या माणसाच्या जिद्दीने खूप प्रभावित झाली. दिवसेंदिवस व्यवसायाच्या निमित्ताने त्यांचे खदिजासोबतचे संबंध वाढले. मोहम्मद असे या व्यक्तीचे नाव होते .

Mohammed Paigambar's wife
आम्हालाही सोबत घ्या; भांडखोर चीनची भारताला विनंती

काही काळ लोटल्यानंतर मोहम्मदवर खदीजाला इतकी प्रभावित झाली की तिने शेवटी तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे, एका पतीच्या मृत्यूनंतर आणि दुसऱ्या पासून विभक्त झाल्यानंतर खदीजाने ज्याने पुन्हा कधीही लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता.

तीचा तो विचार मोहम्मदमुळे बदलला. मोहम्मद हा माणूस अनाथ होता. मोहम्मदचे पालनपोषण त्याच्या काकांनी केले. पुढे खदीजासोबत लग्न केल्यानंतर त्यांच्या आयुष्यात अचानक 'मोठी शांतता आणि आर्थिक सुबत्ता' आली. असे सांगितले जाते की या जोडप्याला चार मुले होती. पण एक मुलगी सोडून बाकीचे बालपणीच मृत्यू पावले होते.

खदिजा आणि मोहम्मद यांचे नाते अनोखे होते. मोहम्मद साहब यांचा जन्म कुरैश जमातीत झाला (खदिजा यांचाही जन्म याच कुळात झाला होता.) त्या वेळी वेगवेगळ्या जमाती वेगवेगळ्या देवदेवतांची पूजा करत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com