esakal | Coronavirus : कोण शोधणार कोरोनावर उपचार?
sakal

बोलून बातमी शोधा

Treatment-Research

कोरोना विषाणूवरील उपचार शोधण्यासाठी जागतिक पातळीवर स्पर्धा सुरू आहे. चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक होऊन तीन महिने झाले असून, या विषाणूचा संसर्ग आता जगभर झाला आहे. चीन, अमेरिका आणि युरोपीय देश कोरोनावरील लस आणि औषधे शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. लस संशोधनात काही पातळ्यांवर सहकार्याची भूमिका असून, त्याला राष्ट्रवादाची किनारही मिळत आहे. कारण, जो देश आधी लस शोधेल तो आधी त्याच्या जनतेला उपलब्ध करून देईल आणि कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून लवकरात लवकर बाहेर पडेल.

Coronavirus : कोण शोधणार कोरोनावर उपचार?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कोरोना विषाणूवरील उपचार शोधण्यासाठी जागतिक पातळीवर स्पर्धा सुरू आहे. चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक होऊन तीन महिने झाले असून, या विषाणूचा संसर्ग आता जगभर झाला आहे. चीन, अमेरिका आणि युरोपीय देश कोरोनावरील लस आणि औषधे शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. लस संशोधनात काही पातळ्यांवर सहकार्याची भूमिका असून, त्याला राष्ट्रवादाची किनारही मिळत आहे. कारण, जो देश आधी लस शोधेल तो आधी त्याच्या जनतेला उपलब्ध करून देईल आणि कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून लवकरात लवकर बाहेर पडेल. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चीनकडून लसीची चाचणी सुरू 
चीनमध्ये कॅनसिनो बायोलॉजिक्‍स कंपनीने लसीची चाचणी सुरू केली आहे. बीजिंग इन्स्टिट्यूट ऑफ बायोटेक्‍नॉलॉजीच्या सहकार्याने ही लस विकसित करण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेचा नमुना आणि दुसरा हानिकारक नसलेला विषाणू यांचा वापर करून या कोरोनाच्या विषाणूच्या विरोधातील अँटिबॉडीज तयार करण्यावर संशोधनात प्रामुख्याने भर आहे. प्राथमिक चाचणीतून समोर आलेल्या निष्कर्षानुसार, लस दिलेल्या प्राण्यांची या विषाणूविरोधातील प्रतिकारशक्ती वाढल्याचे दिसून आले आहे. 

कोरोना सहा दिवसांत बरं करणारं औषध सापडल्याचा दावा

अमेरिकेचे जोरदार प्रयत्न
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी औषध कंपन्यांच्या प्रमुखांची बैठक घेऊन अमेरिकेच्या भूमीवर पहिली लस तयार व्हावी, यासाठी कंबर कसली आहे. कैसर पर्मनंट वॉशिंग्टन हेल्थ रिसर्च इन्स्टिट्यूटने लसीची चाचणी सुरू केली आहे. मॉडर्ना या जैवतंत्रज्ञान कंपनीने ही चाचणी सुरू केली असून, या लसीसाठी विषाणूचा वापर करण्याऐवजी त्याच्या जनुकीय रचनेचा वापर करण्यात आला आहे. यामुळे ही लस लवकर उपलब्ध होईल, अशी शक्‍यता आहे.

चीनने माहिती लपविली : ट्रम्प 

ब्रिटनमध्ये पुढील आठवड्यात चाचणी
ब्रिटनमधील ऑक्‍सफोर्ड युनिव्हर्सिटी पुढील आठवड्यात लसीची चाचणी पुढील आठवड्यात प्राण्यांवर सुरू करणार असून, मानवावर तिची चाचणी पुढील महिन्यात सुरू होईल. पुढील आठवड्यात या लसीची प्राण्यांवर चाचणी सुरू होणार आहे. संशोधकांनी हा विषाणू संसर्गासाठी कोणत्या प्रथिनांचा वापर करतो, यावर भर दिला आहे. 

जगाचे व्यवहार ठप्प; इटलीने मृतांच्या संख्येत चीनला टाकले मागे; आता बोलवले लष्कर

ऑस्ट्रेलियात इतर औषधांचा वापर
ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलॅंड युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी सध्या उपलब्ध असलेल्या औषधांचा वापर कोरोना विषाणूवर उपचारासाठी यशस्वीपणे केल्याचे समोर आले आहे. एचआयव्ही आणि मलेरियावरील औषधांचा एकत्रित वापर केलेल्या रुग्णांमध्ये या चाचण्यांचे निष्कर्ष चांगले आले आहेत. यामुळे देशातील इतर रुग्णालयांमध्येही रुग्णांवर या औषधांचा वापर करण्यात येणार आहे.

जर्मनीतील क्‍युअरवॅक वादाच्या केंद्रस्थानी
जर्मनीतील क्‍युअरवॅक ही कंपनी लसीवर संशोधन करीत आहे. मात्र, अमेरिका या कंपनीला तिच्याकडे ओढून घेत असल्याचा आरोप जर्मन सरकारने केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी या कंपनीला पैसे देण्याचे आमिष दाखविल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यावरून दोन्ही देशांमध्ये वाक्‍युद्ध सुरू आहे. अमेरिकेत व्यवसाय हलविण्याचा कंपनीनेही इन्कार केला आहे.

loading image