कोरोना आला कोठून? चीनविषयी WHOच्या खुलाशाने धक्का

who wuhan covid 19 no evidence laboratory leak
who wuhan covid 19 no evidence laboratory leak

वुहान : चीनच्या वुहान शहरातून कोरोना जगभर पसरला. पण, माणसाच्या शरिरात हा व्हायरस नेमका आलाच कसा? याविषयीचं गूढ अजूनही कायम आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO)पथकाने चीनमधील वुहान शहराला भेट देऊन, संशोधन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात काही महत्त्वाचे निष्कर्ष निघाले आहेत. त्यानुसार चीनमध्ये कोरोना व्हायरस आधीपासून होता, याचे कोणतेही पुरावे नसल्याचं WHOच्या टीमनं म्हटलंय. शास्त्रज्ञांच्या दाव्यानंतर आता, कोरोनाबाबत चीनला अप्रत्यक्षपणे क्लीन चीट मिळाल्याचं बोललं जातंय. पण, कोरोना नेमका आला कोठून? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे.

WHOच्या संशोधकांच्या टीमने चीनमध्ये जाऊन, कोरोनाची पाळेमुळे शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यासाठी चीन सरकारकडून तशा संशोधनासाठी अनुमती हवी होती. मात्र, चीनने सुरुवातील ताठर भूमिका घेत. WHOच्या संशोधनकांना चीनमध्ये प्रवेश नाकारला. मात्र, अनेक प्रयत्नांनंतर चीन संशोधनासाठी तयार झाला. त्यानंतर जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात WHOचे संशोधक चीनमध्ये वुहान शहरात दाखल झाले. त्यानंतर संशोधकांच्या टीमने वुहानचे फिश मार्केट, तसेच तेथील लॅबची पाहणी केली. सुरुवातीपासून कोरोना प्राण्यांमधून मानवी शरिरात आल्याची चर्चा होती. वटवाघळांमध्ये पहिल्यांदा कोरोना सापडला. त्यानंतर तो मानवी शरिरात आला, असे बोलले जात होते. त्याच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न WHOच्या शास्रज्ञांनी केला. त्यानंतर आज पत्रकार परिषद घेत, शास्त्रज्ञांनी माहिती दिली.

काय होती चर्चा?

  • वुहानच्या फिश मार्केटमधून, कोरोनाचा प्रसार झाला
  • प्राण्यांमधून (वटवाघूळ) कोरोना मानवी शरिरात आला
  • चीनच्या वुहानमधील दुर्घटनेनंतर कोरोना पसरला
  • चीनमध्ये ऑक्टोबर 2019ला कोरोनाचे रुग्ण सापडल्याचा आरोप

WHOच्या शास्त्रज्ञांचे निष्कर्ष

  • वुहानमध्ये कोरोना आधीपासून होता, याची माहिती घेण्याचा शास्त्रज्ञांचा प्रयत्न
  • चीनच्या वुहान शहरात डिसेंबर 2019पूर्वी कोरोनाचा प्रसार झाल्याचे पुरेसे पुरावे नाहीत
  • प्रयोग शाळेतील दुर्घटनेनंतर कोरोना व्हायरस मानवी शरिरात आल्याची शक्यता धूसर (ही केवळ कल्पनाच)
  • कोरोना वुहानच्या फिश मार्केटमधून पसरला असेल, पण, त्याचा उगम दुसरीकडे असू शकतो

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com