नदीत टाकला लोहचुंबकाचा गळ आणि हाती लागला भारतीय गूढ खजिना....

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 18 June 2020

काही दिवसांपूर्वी विल रीड नदी उत्खनन तज्ञ आपल्या दोन मुलांना घेऊन सोव्ह नदीच्या बगिंगटन पुलावर गेला. आपण मासेमारी करताना जसे गळ टाकतो, तसेच लोहचुंबक लावलेले गळ त्यांनी पुलावरून नदीत टाकले.

आपल्या सर्वांनाच आपल्याला कधीतरी मोठी लॉटरी किंवा मोठा खजिना मिळावा असं वाटत असतं. पण प्रत्येक जण तेवढा लकी असतोच असं नाही. पण काहींच्या बाबतीत असं खरंच होतं. कधी शेत नांगरताना मिळालेला खजिना किंवा काही खोदकाम करताना मिळालेला खजिना. फार क्वचित लोकांसोबत असं होतं. आता तुम्ही जी बातमी वाचणार आहात ही बातमी खरंतर कुणालाही एखाद्या पुस्तकातील गोष्ट वाटेल अशीच आहे. कारण विल रीड सोबत असंच काहीसं घडलंय.. 

विल रीड हे प्रसिद्ध उत्खनन तज्ज्ञ आहेत. नुकतेच ते आपल्या दोन मुलांना घेऊन ते सोव्ह नदीवरील बगिंगटन पुलावर गेले होते. तिथे त्यांनी लोहचुंबकाचे गळ पाण्यात टाकले आणि गळाला काही लागतंय का का याची ते वाट पाहत होते. थोडा वेळ झाला. गळाला काहीतरी लागलं, विल यांनी लगेच त्यांच्या मुलाला काय आहे ते पाहायला सांगितलं. त्यावेळी त्यांच्या मुलाने गळाला खजिना लागल्याचं सांगितलं. ते होते कसे तरी गूढ ठोकळे. हे ठोकळे सोन्याचे नव्हते शिसाचे होते. 

मोठी बातमी - ...अन्यथा एसटी कामगार 22 जुनपासून जाणार सामुहीक रजेवर

आधी ६४ आणि काही दिवसांनी आणखी २० असे एकूण ८४ ठोकळे विल यांना मिळाले. विल यांना यासोबत काही नाणी देखील मिळाली. या ठोकळ्यांवर देवनागरी लिपीत काही गूढ आकडे आणि नाण्यांवर माता दुर्गेची प्रिंट आणि मागे श्री असं कोरलेलं आढळलं. बरं या ठोकळ्यांवर असणाऱ्या आकड्यांची उभी आडवी तिरपी काहीशी बेरीज केली तरीही ती एकंच यायची. त्यामुळे विल यांची याबद्दलची उत्सुकता आणखी वाढली होती.     

विल यांनी सोशल मीडियावर शेअर केले ठोकळ्यांचे फोटो : 

विल हे एक उत्खनन तज्ज्ञ असल्याने त्यांना हे तर समजलं होतं की ठोकळ्यांवरील आकडे हे देवनागरी लिपीतील आहेत. मात्र त्यांना त्याचा अर्थ उमजत नव्हता. त्यामुळे, हे ठोकले नेमके कुणाचे? या ठोकळ्यांवर नेमकं काय लिहिलंय हे शोधण्यासाठी विल यांनी सोशल मीडियावर या ठोकळ्यांचे फोटो शेअर केलेत. त्यानंतर त्यांच्यावर  कमेंट्सचा भडीमार झाला आणि अखेर सत्य समोर आलं. 

BIG NEWS मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, तलावक्षेत्रात पावसाची जोरदार हजेरी

सुरवातीला विल याना वाटलं होतं की हे ठोकळे ईस्ट इंडिया कंपनीने भारतातून प्रचंड संपत्ती आणली होती, त्याचाच हा भाग असावा. पण हे काहीतरी वेगळंच होतं. या ठोकळ्यावर  'ओम राहवे नमः’असं लिहिलं होतं आणि त्यावर काही आकडे होते. 

१५ ०८ १३
१० १२ १४
११ १६ ०९
ओम राहवे नमः

सोशल मीडियावर आलेल्या कमेंटच्या माध्यमातून विल याना हे राहू यंत्र असल्याचं समजलं. त्यांनी यावर आणखीन अभ्यास केला असता शेवटी त्यांना या ठोकळ्यांची उकल झाली. हिंदू मान्यात्यांच्या नुसार तुमच्यावर काही संकट आलं तर त्यावर या मंत्रांचा वापर करतात. विशेषतः उत्तर भारतात ही प्रथा प्रसिद्ध आहे. मात्र तंत्र करून ४३ दिवसानंतर हे राहूचे ठोकळे शेवटच्या दिवशी पाण्यात विसर्जित केले जातात. विल यांच्या काही मित्रानी हे ठोकळे स्वतःकडे ठेऊ नकोस असं देखील त्यांना सांगितलं. कारण अशा प्रकारचे मंत्र तंत्र करून कुणावरील वाईट संकट स्वतःवर ओढवून घेण्यासारखं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.  

will read found mysterious treasure in the river of sowe and found indian treasure


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: will read found mysterious treasure in the river of sowe and found indian treasure