
महिलेने घरासह दिली नवऱ्याला विकण्याची ऑफर
अमेरिकेतून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. एका महिलेने घरासह आपल्या पतीला विकण्याची ऑफर दिली आहे. हे प्रकरण अमेरिकेतील असून सध्या चर्चेचा विषय आहे. सध्या सोशल मीडियावर हे प्रकरण बरंच गाजत असून असं ऑफर कोण देतं, असा प्रश्न विचारला जात आहे. या महिलेचे नाव क्रिस्टल बॉल (Crystal Ball) असून तीने तीच्या एक्स नवरा रिचर्डला (Richard) घरासह विकण्याचा निर्णय घेतला आहे. (woman puts ex-husband on sale along with her house)
क्रिस्टल आणि रिचर्डचा सात वर्षापुर्वी घटस्फोट झाला. परंतु अजूनही अनेक गोष्टीत ते दोघेही समान भागीदार आहेत. या घरावरही क्रिस्टल आणि रिचर्डचा समान हक्क आहे. मात्र तिला हे घर विकायचे आहे. मा्त्र घर विकल्यानंतरही रिचर्डला राहायला जागा मिळावी अशी तिची इच्छा आहे. त्यामुळे या महिलेने घर विकण्यासाठी एक जाहीरात दिली त्यात तिने जर कोणाला तिचे घर घ्यायचे असेल तर तिला तिच्या पतीला सोबत घ्यावे लागेल. अशी ऑफर दिली आहे. सोबतच तो घर स्वच्छ करेल आणि त्याच्या नवीन मालकासाठी जेवण बनवणार, असेही तिने सांगितले.
क्रिस्टलचे घर विकणारी ही जाहिरात वेबसाइटवरून काढून टाकण्यात आली आहे. काही लोक या जाहिरीतीमध्ये एक्स पतीचा समावेश करण्यास विरोध करत असल्याचे समोर आले. मात्र क्रिस्टलला विश्वास आहे की, तिचे घर खूप चांगले आहे आणि कोणीतरी तिचे घर नक्कीच विकत घेईल आणि तिच्या एक्स पतीला देखील सोबत घेणार.
सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकऱ्यांच्या यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहे.