पगारच कमी म्हटल्यावर गड्यानं ऑफिसमध्येच थाटला संसार....| Man moves into office | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Man moves into office
पगारच कमी म्हटल्यावर गड्यानं ऑफिसमध्येच थाटला संसार....| Man moves into office

पगारच कमी म्हटल्यावर गड्यानं ऑफिसमध्येच थाटला संसार...

Man moves into office: ऑफिसमध्ये चांगला पगार मिळावा अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांना असते. पगार वाढण्यासाठी कर्माचारी मेहनत करून चांगले काम करत असतात. महत्वाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पगार चांगला असावा असे प्रत्येक कर्मचाऱ्याला वाटत असते. पण काही ठिकाणी खूप मेहनत करूनही मनासारखा पगार मिळत नाही. अशावेळी एकतर तो मिळेल अशी आशा करत काम करायचं किंवा दुसरीकडे नोकरी शोधायची असे पर्याय उरतात. पण एका व्यक्तीने कंपनी कमी पगार देते म्हणून चक्क ऑफिसमध्येच संसार थाटला आहे.

हेही वाचा: Viral : आईच्या हातचा पदार्थ बनतो 'दगड'! मुलाचा निबंध होतोय व्हायरल

ऑफिसचा पगार कमी असल्याने मी भाड्याच्या घरातही राहू शकत नाही. म्हणून मी घरातलं सगळं सामान घेऊन ऑफिसमध्ये आलो आहे, असे या व्यक्तीचे म्हणणे आहे. त्या व्यक्तीने आपल्या डेस्क खाली झोपण्यासाठी जागा केली आहे. ही घटना अमेरिकेतील आहे. टिकटॉकवर सिमॉन या व्यक्तीने व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात तो म्हणतो, कंपनी पुरेसा पगार देत नसल्याने त्याने त्याचे सर्व सामान ऑफिसच्या क्युबिकलमध्ये ठेवले होते. कंपनीचा निषेध म्हणून हे केले. मी माझ्या ऑफिसमध्ये राहणार आहे. बघू किती वेळ मी इथे राहतोय ते.

हेही वाचा: काय सांगता राव! जावयाला गाढवावर बसवून मिरवणारेही आहे गाव!

दुसरा व्हिडिओ शेअर करत तो म्हणाला की, माझे सहकारी या काळात घरातून काम करत आहेत. त्यामुळे मी ऑफिसमध्ये आरामात क्युबिकल्समध्ये राहू शकतो. त्याने कपडे, खाणं क्युबिकलमध्ये कशाप्रकारे ठेवलं आहे, हेही व्हिडिओत दाखवलं आहे. या व्हिडिओवर कमेंट करताना लोकांनी त्याला सुरक्षा रक्षक पकडतील असे सांगितले. पण त्यावर त्याने त्याच्या ऑफिसमध्ये कॅमेरे नाहीत, असे सांगितले आहे.

हेही वाचा: शाकाहार कराल तर कॅन्सरपासून वाचाल! अभ्यास सांगतो...

शेवटी ऑफिसमध्ये कळलेच...

त्याने केलेला जुगाड जास्त दिवस चालला नाही. ऑफिसमधल्या एचआर पर्यंत ही बाब गेल्यावर त्याने त्याला तिकडून जायला सांगितले. शिवाय पोस्ट केलेला व्हिडिओही डिलिट करायला सांगीतला. आता सिमॉन त्या कंपनीत काम करतोय का याविषयी माहिती नाही. पण व्हिडिओ शेअर करताना त्याने मी ही कंपनी लवकरच सोडणार आहे, आहे सांगितले होते.

Web Title: Worker Turns Office Cubicle Into Apartment Sets Up Home Over Salary Employee Job Pay Home Rent Issue

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top