World Ocean Day - समुद्राच्या स्वच्छतेवर अवलंबून पृथ्वीचं आरोग्य

World Ocean Day - समुद्राच्या स्वच्छतेवर अवलंबून पृथ्वीचं आरोग्य

पुणे - समुद्र हा वातावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी आणि जगातील लाखो लोकांकरिता पाण्याचा प्रमुख स्रोत आहे. समुद्र पृथ्वीवर प्राणवायूची निर्मिती करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. पण प्लास्टिकचे प्रदूषण, कचरा तसेच दूषित गढूळ आणि केमिकल युक्त पाणी प्रदूषण ही समस्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याला भेडसावत आहे. विशेषत: समुद्राच्या पाण्यात प्रचंड मोठ्या प्रमाणावर मिसळल्या जाणार्‍या प्लास्टिकमुळे सागरी जीवांचे, समुद्री प्राण्यांचे जीवनच धोक्यात आले आहे. आज जागतिक महासागर दिन, त्यानिमित्त जाणून घेऊ त्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी.

जागतिक महासागर दिनाचा इतिहास

समुद्राचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आज त्यासंबंधी जनजागृती करणे आवश्यक बनले आहे. 2008 मध्ये साजरा करण्यास सुरुवात केलेला जागतिक महासागर दिवस सुरुवातीला केवळ कॅनडामध्येच साजरा केला जात होता. या संदर्भातला प्रस्ताव कॅनडाने ब्राझीलमधील रिओ दी जानेरिओ येथे झालेल्या पहिल्या पृथ्वीविषयक वसुंधरा शिखर परिषदेत मांडला आणि हा दिन साजरा करण्याबाबत विचारमंथन झाले. त्यानंतर 5 डिसेंबर 2008 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसामान्य सभेत 8 जून हा दिवस जागतिक महासागर / समुद्र दिन म्हणून साजरा करण्याचा ठराव झाला. यानिमित्ताने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सागरीव्यवहार आणि समुद्री कायदेविषयक विभागातर्फे जगभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. तेव्हापासून युनेस्कोच्या आंतरसरकारी समुद्र विज्ञान आयोगातर्फे ‘द ओशन प्रोजेक्ट’ या अमेरिकन संस्थेच्या जागतिक समुद्र नेटवर्कला प्रायोजकत्व देण्यात आले आहे. त्यांच्या सहकार्याने, हा दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर दरवर्षी साजरा होऊ लागला.

World Ocean Day - समुद्राच्या स्वच्छतेवर अवलंबून पृथ्वीचं आरोग्य
मरियाना ट्रेंच...पृथ्वीवरील सर्वात खोल समुद्र

काय आहे 2021 वर्षाची थीम

यंदाच्या महासागर दिनाची थीम 'द ओशन : लाइफ अँड लाइव्हलीव्हिटीज' अशी आहे. 2021 ते 2030 या दशकात शाश्वत विकासासाठी समुद्र विज्ञान विकासाशी संबंधित अशी थीम आहे. महासागर अर्थात समुद्र आपल्या पोटात त्यांच्या आजूबाजूच्या अनेक छोट्या छोट्या जीवांना सामावून घेतो, त्यांचे पोषण करतो. तसेच आपल्या किनाऱ्यावर विविध प्रकारच्या वनस्पतींचे पोषण संरक्षण करतो. विशेषतः मानवजातीला जल, वायू, तेल, खनिज संपत्ती औषधे सारख्या अनेक मार्गांनी उपयोगी पडतो रोजगार देतो. अशा या जागतिक महासागर दिनानिमित्त समुद्र स्वच्छ ठेवण्याचा आणि समुद्राला संरक्षण देण्याचा संकल्प करूया. लोकांमध्ये जागरूकता पसरवूया. समुद्र आपली शान, मान व अभिमान आहे. आपल्यापैकी अनेकांना रोजगार देणारा, सागरी अन्न पुरवणारा व अनेक जल जीवांनी समृध्द असलेला हा अथांग महासागर आणि त्याचा किनारा स्वच्छ ठेवणे ही आपली नैतीक जबाबदारी आहे.

World Ocean Day - समुद्राच्या स्वच्छतेवर अवलंबून पृथ्वीचं आरोग्य
टक्कर दोन महासागरांची

का साजरा केला जातो जागतिक महासागर दिन

  • प्रत्येकाच्याच दैनंदिन जीवनात समुद्राची महत्त्वाची भूमिका आहे.

  • मोठ्या प्रमाणावर प्राणवायू देण्याचे काम समुद्र करतो.

  • यानिमित्ताने समुद्र बचावाची जगभरात एक चळवळ उभारली जावी.

  • समुद्रांचा शाश्‍वत विकास साधण्यासाठी जगातील लोकांना उद्युक्त करणे.

  • औषधी, अन्न, पाणी व प्राणवायू यासाठी समुद्र हा एकमेव मोठा स्रोत आहे, हे जाणून त्याकडे लक्ष पुरविणे.

समुद्री संपत्तीचे जतन व संवर्धन करणे हा हेतू.

‘‘समुद्रांच्या क्षमतेपेक्षा अनेक पटींनी अधिक भार आपण समुद्रांवर लादतो आहोत. समुद्रात मोठ्या प्रमाणावर मिसळले जाणारे अशुद्ध पाणी, प्लास्टिकचा प्रचंड मोठा कचरा यामुळे सागरी जीवन व समुद्रच धोक्यात आले आहेत. भविष्यात समुद्राचे जीवन वाचविण्यासाठी आजच समुद्रांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.’’

World Ocean Day - समुद्राच्या स्वच्छतेवर अवलंबून पृथ्वीचं आरोग्य
कोविशील्डच्या दुसऱ्या डोससंदर्भात केंद्राचा मोठा निर्णय

समुद्रच बेपत्ता

पर्यावरणाच्या मोठ्या प्रमाणावर होणार्‍या हानीमुळे आणि प्रचंड प्रदूषणामुळे पृथ्वीवरील एक अख्खा समुद्रच बेपत्ता झाला आहे. मध्य आशियातील कझाकिस्तान आणि उझबेकिस्तान दरम्यान असलेला अरल समुद्र आता वाळवंटातच रुपांतरित झाला आहे.

काही तथ्य आणि आकडेवारी

पृथ्वीवरील ९७ टक्के जलसाठा समुद्रात आहे.

समुद्रावर तब्बल ३ अब्ज लोक अवलंबून आहेत

जगभरात, समुद्र व सागरी संसाधने आणि त्यावर अवलंबून असलेल्या बाजारपेठांचे मूल्य प्रतिवर्षी तीन ट्रिलियन डॉलर अर्थात जागतिक सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 5 टक्के आहे.

सुमारे ३० टक्के कार्बन डायऑक्साईड समुद्र शोषून घेतो यामुळे प्रदूषणाचा परिणाम कमी करण्यास अप्रत्यक्षपणे थेट मदत होते.

सागरी मासेमारीवर जगभरात तब्बल 200 दशलक्ष लोक अवलंबून आहेत.

- बाळासाहेब पाटोळे, इलेक्ट्रो टेक्नो ऑफिसर, टोकियो, जपान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com