World Sparrow Day: इवल्याश्या चिमण्यांचे महत्त्व भारी! ती जगायला हवी..

'चिमणी जगायला हवी' याची जाणीव व्हावी, यासाठी 2010 पासून 20 मार्च हा दिवस 'जागतिक चिमणी दिवस' म्हणून साजरा केला जातोय
World Sparrow Day
World Sparrow Dayसकाळ डिजिटल टीम

'चिमणी जगायला हवी' याची जाणीव व्हावी, यासाठी 2010 पासून 20 मार्च हा दिवस 'जागतिक चिमणी दिवस' म्हणून साजरा केला जातोय. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निसर्गातील प्रत्येक घटकाला जपणे महत्वाचे आहे. सध्या देशभरातील चिमण्यांच्या अनेक जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. यातुनच चिमण्यांचे अस्तित्व जपले जावे, म्हणून 'जागतिक चिमणी दिवस' म्हणून साजरा केला जातो.

महंमद दिलावर (Mohammad Dilawar) यांनी 2006 मध्ये ‘नेचर फॉरेव्हर सोसायटी’ नावाची एक संस्था स्थापन केली या संस्थेच्या पुढाकारातून जागतिक चिमणी दिन साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली.

जगभरात 26 जातीच्या चिमण्यांची नोंद आहे. विशेष म्हणजे 'हाऊस स्पॅरो' (House Sparrow) ही चिमण्यांची जात सर्व जगभरात आहे. अलीकडे वाढत्या शहरीकरणामुळे वृक्षतोड खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे. परिणामी चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. शहरांमध्ये मोबाईल टॉवर्स तसेच आधुनिक प्रकारच्या घरबांधणी पद्धत, शहरातील प्रदूषण इत्यादी कारणाने चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. ताज्या अहवालानुसार गेल्या 15 ते 20 वर्षांमध्ये चिमण्यांची संख्या तब्बल 85 टक्क्यांनी घटली आहे.

World Sparrow Day Chirp heard in urban areas nagpur
World Sparrow Day Chirp heard in urban areas nagpur sakal

गेल्या 15 ते 20 वर्षांमध्ये गाव तसेच शहरांमध्ये मोठ्याप्रमाणात मोठ-मोठ्या इमारती आणि घरे बांधण्यासाठी वृक्षतोड करण्यात येत आहे, यामुळे चिमण्यांच्या निवासाचा प्रश्न निर्माण झाला. सोबतच मोबाईलमधून निघणाऱ्या रेडियशनमुळे अनेक चिमण्यांचा जीवास धोका निर्माण झाला आहे. रेडियशनमुळे चिमणीचा केवळ मृत्यूच होत नाही तर त्यांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होतो. त्यामुळे त्यांची प्रजनन संख्यादेखील कमी होते.

चिमण्या पिकांवर पडणाऱ्या अळ्या आणि किडे फस्त करत असतात मात्र गेल्या काही वर्षात चिमण्यांची संख्या कमी झाल्याने त्याचा परीणाम शेतांवरील पिकांवर झाला आहे. एकंदरीत चिमण्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्यामुळे चिमणी जगली पाहीजे, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

world sparrow day Awareness of sparrow conservation high in rural areas akola
world sparrow day Awareness of sparrow conservation high in rural areas akolasakal

चिमण्यांना वाचविण्यासाठी उन्हाळ्यात चिमण्यांसाठी पाण्याची सोय करणे, घरात किंवा अंगणात पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. चिमण्यांसाठी कमीत कमी दहा फुट उंचीवर लाकडाचे किंवा कपट्याचे कृत्रिम घरटे तयार करणे गरजेचे आहे. पक्षांना दररोज अन्न पुरवठा करणे आवश्यक आहे. 'चिमणी जगायला हवी' याची जाणीव जर प्रत्येकाने ठेवली तर तरच चिमणी जगेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com