जगातील टॉप 100 शहरांमध्ये भारतातील एकाच शहराला स्थान

world top cities
world top cities

नवी दिल्ली - भारतात गेल्या काही वर्षांमध्ये स्मार्टसिटी सारख्या प्रोजेक्टच्या माध्यमातून शहरांचा विकास करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र अद्यापही ग्लोबल रँकिंगमध्ये भारतीय शहरं मागं पडताना दिसत आहेत. जगातील टॉप 100 शहरांमध्ये भारतातील फक्त एका शहराच्या नावाचा समावेश आहे. रँकिंग ठरवताना 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या यांसह 25 निकषांचा आधार घेण्यात आला. या निकषांमध्ये भारतातील फक्त एकच शहर बसू शकलं आणि ते म्हणजे राजधानी दिल्ली.

ग्लोबल रँकिंग ज्या आधारावर देण्यात आले त्यामध्ये सोशल मीडिया हॅशटॅग, चेकइन्स, वातावरण, पर्यटन स्थळांची संख्या, कोरोनाचा उद्रेक, बेरोजगारी, उत्पन्न इत्यादींचा समावेश आहे. 2021 मध्ये ज्या शहरांचा टॉप 10 मध्ये लंडन, न्यूयॉर्क, पॅरिस, मॉस्को, टोकियो, दुबई, सिंगापूर, बार्सिलोना, लॉस एंजिलिस, मद्रिद ही शहरे आहेत. 

टॉप टेनच्या यादीमध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क आणि लॉस एंजिलिस ही दोन शहरे आहेत. याशिवाय यादीमध्ये ब्रिटनची राजधानी लंडनसह अनेक युरोपीय शहरांचा समावेश आहे. आशियातील टोकियो, दुबई आणि सिंगापूर या शहरांनाच टॉप टेनच्या यादीत स्थान मिळालं आहे. Resonance Consultancy Ltd ही यादी प्रसिद्ध केली आहे.

यादीमध्ये रोम, शिकागो, टोरांटो, सॅन फ्रान्सिस्को, अबुधाबी, सेंट पीटर्सबर्ग, अॅम्सटरडॅम, बर्लिग, प्राग, वॉशिंग्टन या शहरांचासुद्धा यादीमध्ये समावेश आहे. Resonance Consultancy Ltd ने तयार केलेल्या या यादीमध्ये टॉप 100 शहरात भारतातील दिल्ली वगळता इतर कोणतंही शहर स्थान मिळवू शकलं नाही. दिल्ली या रँकिंगमध्ये 62 व्या स्थानावर आहे.

टॉप 100 शहरांची यादी तयार करत असताना अनेक बाबींची माहिती घेण्यात आली. त्यामध्ये स्थानिक लोकांशिवाय संबंधित शहरांना भेट देणाऱ्या लोकांचे म्हणणेही विचारात घेतले गेले. रँकिंगमध्ये स्थानिक लोक, पर्यटक, व्यावसायिक लोकांसाठी शहर किती अनुकूल आहे या गोष्टीकडे लक्ष देण्यात आले. त्यानुसार ही यादी तयार करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com