वुहानवासीय घेताहेत मोकळा श्‍वास

पीटीआय
Sunday, 24 January 2021

चीनमधील वुहानमध्ये कोरोनाव्हायरसचा प्रसार झाल्याने शहरात जगातील पहिले लॉकडाउन लागू झाल्याचा संदेश नागरिकांच्या स्मार्टफोनवर रात्री दोन वाजता  झळकला होता. या घटनेला आज एक वर्ष होत असताना आणि सर्व जग अजूनही या विषाणूच्या संसर्गातून बाहेर पडलेले नसताना वुहानवासीय मात्र मोकळा श्‍वास घेत आहेत.

बीजिंग - चीनमधील वुहानमध्ये कोरोनाव्हायरसचा प्रसार झाल्याने शहरात जगातील पहिले लॉकडाउन लागू झाल्याचा संदेश नागरिकांच्या स्मार्टफोनवर रात्री दोन वाजता  झळकला होता. या घटनेला आज एक वर्ष होत असताना आणि सर्व जग अजूनही या विषाणूच्या संसर्गातून बाहेर पडलेले नसताना वुहानवासीय मात्र मोकळा श्‍वास घेत आहेत.

WHO ने पुन्हा केलं भारताचं कौतुक; मानले पंतप्रधान मोदींचे आभार 

मध्य चीनमधील या शहरातच कोरोनाचा जगातील पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर संपूर्ण जगात कोरोनाने हातपाय पसरले. कोरोनाच्या नवीन प्रकारांनी जगावर भयाचे सावट कायम असले तरी येथील नागरिक आज सकाळी धुके पसरलेले असताना यांगत्से नदीच्या तीरावरील उद्यानात व्यायाम करीत होते. एक कोटी पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या या शहरातील जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे.

मंगोलियात बाळासह महिलेला रुग्णालयाने काढलं बाहेर; आंदोलनानंतर पंतप्रधानांनी दिला राजीनामा

रस्त्यांवर तुरळक वाहतूक दिसत असली तरी गेल्या वर्षीसारखे बाहेर फिरण्यावर कडक निर्बंध नाही. चीनचे नवे चांद्रवर्ष सुरू होत असल्याने पुढील महिन्यात तेथे सुट्या लागणार आहे. या काळात लोक मोठ्या प्रमाणावर एकमेकांच्या संपर्कात येण्याची शक्यता असल्याने  संसर्गाची लागण होण्याची भीती अधिकाऱ्यांना वाटत आहे. त्यामुळे या काळात प्रवास व सार्वजनिक कार्यक्रम टाळावेत असे नागरिकांना करण्यात येत आहे. शालेय शिक्षण ऑनलाइन सुरू असून खबरदारीचा उपाय म्हणून नागरिक घरांमध्ये व सार्वजनिक वाहनांमधून प्रवास करताना मास्क घालत असल्याचे दिसत आहे. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wuhan City people Coronavirus China