गर्भवती महिलांनो! हिवाळ्यात इम्युनिटी वाढवण्यासाठी खा पाच पदार्थ

हिवाळ्यात गर्भवती महिलांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी हे ५ पदार्थ
Pregnant Women
Pregnant Womenesakal

हिवाळा हा असा ऋतू आहे जेव्हा अचानक रिमझिम पावसाने तापमान कमी होते आणि दिवसाही आपल्याला थंडी जाणवते आणि जर तुम्ही दोन महिन्याच्या गर्भवती महिला असाल किंवा गर्भवती होण्यासाठी प्रयत्न करत असाल तर हे वातावरण कंटाळवाणे वाटते आणि सर्दी, थंडी आणि ताप, व्हायरल किंवा बॅक्टेरिअल इन्फेक्शनमुळे आजारी पडू शकता. काही वेळा गर्भवती महिलांना त्वचेमध्ये कोरडेपणा जाणवतो. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे किंवा वातावरणातील बदलांमुळे त्याच्या रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम होऊ शकतो. अशावेळी गर्भवती महिलांनी रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या पदार्थांचा आपल्या आहारत सामावेश केला आहे. जाणून घ्या सविस्तर...

garlic
garlicesakal

लसून :

गर्भवती महिलांना ९ महिने गॅसचा त्रास आणि सुज येणे अशा समस्यांचा सामाना करावा लागतो. आता तुम्ही म्हणाल की मग लसून का? त्याचे कारण असे की, लसणांमध्ये सर्व घटकांमध्ये सल्फरचे प्रमाण अत्यंत समृद्ध आहे, जे केवळ गॅसेसेस दूर करत नाही तर शरीराला उबदारपणा देखील देतात.

Pregnant Women
स्वयंपाकघरातील 'या' गोष्टींना कधीच नसते Expiry Date
Ginger
GingerGinger coronavirus

आले

आल्यामध्ये जळजळ कमी करणाऱ्या घटक आहे आणि सकाळी सकाळी जाणवणारा थकवा आणि मळमळ दूर करते. तुम्हाला कदाचित हे माहित नसेल पण तुमच्या आहारात आल्याचा समावेश केल्यास तुमची पचनशक्ती वाढवताना पोटाच्या समस्यांपासून सुटका मिळू शकते. फक्त एवढेच नाही तर आल्यामुळे शरीरामध्ये उब राखण्यास मदत करते. त्यामुळे आले हे शक्तिवर्धक घटक आहे जो तुम्ही आहारात समाविष्ठ करु शकता.

Pregnant Women
Ayurveda: आयुर्वेदानुसार अन्न आणि भावना यांत नेमका काय संबंध आहे?
turmeric
turmericturmeric

हळद

हळदीमध्ये अँटी-व्हायरल आणि अँटी-सेप्टिक गुणधर्म असतात हे अनेक वर्षांपासून ज्ञात आहे. हे अनेकांसाठी आश्चर्यकारक असेल, परंतु हिवाळ्यात हळदीचे दूध पिल्याने गर्भवती महिलांची प्रतिकारशक्ती वाढू शकते. हे हिवाळ्यात जीवनरक्षकासारखे आहे आणि गर्भधारणेदरम्यान भयंकर सर्दी आणि खोकल्यापासून मुक्त होऊ शकते.

Pregnant Women
कामाच्या ठिकाणी तुमचे व्यक्तिमत्व कसे असावे? जाणून घ्या टीप्स

गूसबेरी (Gooseberry)

हे फळ एक नैसर्गिक डिटॉक्सिफायर आहे आणि व्हिटॅमिन सी मध्ये अति समृद्ध आहे. ज्या महिला गर्भवती राहण्यासाठी प्रयत्न करतायेत त्यांच्यासाठी लोह हे एक आवश्यक पोषक तत्व आहे आणि जेव्हा तुम्ही या फळाचा तुमच्या आहारात समावेश करता तेव्हा ते लोह सहजपणे शोषून घेण्यास मदत करते. त्यात असलेल्या व्हिटॅमिन सीमुळे, ते तुमची प्रतिकारशक्ती वाढते कारण कोणताही घटक करू शकत नाही.

Cow Milk
Cow MilkSakal
Pregnant Women
विशाल निकम जिंकणार 'बिग बॉस मराठी ३'ची ट्रॉफी?

गायीचे दुध (Cow milk)

एक ग्लास गाईचे दूध पिल्याने हिवाळ्यात तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते हे तुम्हाला माहीत आहे का? लॅक्टोफेरिन नावाचं कंपाऊंड विषाणू आणि शरीराच्या पेशींमधील परस्परसंवादात व्यत्यय आणतो. हे कंपाऊंड असे आहे जे कोणत्याही गोष्टीप्रमाणे तुमची प्रतिकारशक्ती वाढवू शकते. तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही हळदीचे दूध देखील बनवू शकता.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com