प्रियकराने दिला धोका; वजन कमी करण्यासाठी तरूणीने उचललं हे पाऊल

Weight Loss: प्रियकराने धोका दिल्याने तरूणीने मोठ्या मेहनतीने तब्बल 82 किलो घटवलं.
weight loss
weight lossesakal

स्लिम आणि फिट (Slim and Fit) दिसण्याचा आजकाल ट्रेंड चालला आहे. त्यामुळे लहानांपासून मोठ्यापर्यंत अनेकजण व्यायामशाळेत जातात आणि उत्कृष्ट शरीररचनेसाठी मेहनत करतात. काही लोकांना वजन घटवणं (Weight Loss) सोपे जाते, परंतु काही लोकांसाठी हे खूप अवघड काम असते. पण जेव्हा एखादा व्यक्ती वजन कमी करायचं हे पक्के ठरवते आणि त्यासाठी मेहनतही करते, तेव्हा आज ना उद्या फरक हा दिसतोच. तब्बल 152 किलो वजनाच्या एका अठरा वर्षीय मुलीला डॉक्टरांनी सांगितले की, वजन असंच राहिले तर तू 21 वा वाढदिवसही साजरा करू शकणार नाही. एवढंच काय तर तिच्या प्रियकरानेही (Lover) धोका दिला. रागाच्या भरात तरूणीने मोठ्या पगाराची नोकरी सोडली आणि पोस्टमनची नोकरी स्वीकारली आणि अथक प्रयत्नानं वजन 182 वरून चक्क 66 किलो केलं. (After her boyfriend broke up, the girl left the civil service to lose weight and became a postman.)

weight loss
Weight Loss : वजन कमी करायचेय? निगेटिव्ह कॅलरी असलेले पदार्थ खा

या मुलीचे नाव लीन विल्सन असून ती इंग्लंडची आहे. लीन विल्सनचे वजन सुमारे 149 किलो (328 पाऊंड) होते, परंतु तिने 82 किलो (182 पौंड) कमी केले आहे. तिचे वजन सुमारे ६६ किलोपर्यंत कमी केलं आहे. ती आता एकदम स्लिम दिसत आहे. तिचा वजन कमी करण्याचा प्रवास खूपच संघर्षमय आहे.

लीनच्या वाढलेल्या वजनामुळे तिचा प्रियकर तिला सोडून गेला. 13 वर्ष एकत्र राहिल्यानंतर प्रियकराने धोका दिल्यानंतर त्या प्रचंड तणावात आल्या होत्या. त्या डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या आणि त्यातून बाहेर पडणे त्यांना कठीण झालं होते. मात्र नंतर त्यांनी वजन कमी करायचं मनाशी पक्कं ठरवलं.

weight loss
Weight loss: व्यायाम न करता वजन कमी करायचयं? कसे ते वाचा

37 वर्षीय लीन विल्सनच्या म्हणण्यानुसार, तिला आधीच टाइप 2 मधुमेह आणि श्वासोच्छवासाचा त्रास होता. 18 वर्षांची असताना जेव्हा ती तिच्या डॉक्टरांकडे गेली तेव्हा तिला तपासणीतून कळले की तिचे यकृत खराब होत आहे, कारण तिच्यावर भरपूर चरबी जमा झाली होती, जे तिच्या चुकीच्या खाण्यामुळे झालं होते. डॉक्टरांनी तिला सांगितले की, त्यांनी 20 वर्षांहून अधिक काळ मद्यपान करणाऱ्या लोकांमध्ये यकृताच्या समस्या पाहिल्या आहेत. पण लीनने कधीही दारू प्यायली नव्हती हे ऐकून डॉक्टर थक्क झाले. डॉक्टरांचा हा शब्द लीनसाठी एक इशारा होता, त्यानंतर तिला तिची जीवनशैली सुधारावी लागली.

मोठ्या पगाराची नोकरी सोडून झाली पोस्टमन-

लीन एक वरिष्ठ नागरी सेवक म्हणून काम करत असे, जिथे तिला 6 अंकांमध्ये (लाख आकड्यांमध्ये) पगार मिळत असे. पण चालता यावं म्हणून तिने नोकरी सोडली. तिला व्यायामशाळेत जाणे आवडत नव्हते आणि परंतु तिची चालायची तयारी होती. म्हणूनच तिने पोस्टमनची नोकरी सुरू केली आणि दररोज 14 किलोमीटर चालते.त्यामुळे कोणत्याही तणावाशिवाय स्वतःवर लक्ष केंद्रित नोकरीचा आनंद देखील घेऊ शकली. तिच्या म्हणण्यानुसार, तिला तिच्या आधीच्या पगारापेक्षा कमी मिळत असले तरी ती खूप आनंदी आहे.

weight loss
Weight Loss Foods: वेगाने वजन कमी करतील हे 5 घरगुती उपचार

आहारावर नियंत्रण-

लीनच्या म्हणण्यानुसार, जेव्हा ती कॉलेजमध्ये होती, तेव्हा तिने सर्व प्रकारचे डाएट (Diet) फॉलो केले होते, परंतु त्याचं पालन करणे तिला फारसं जमत नसे. लीन 20 वर्षांची होती तेव्हा तिचे वजन 152 किलो होते. बायपास सर्जरी करून वजन कमी करण्यासाठी तिला गॅस्ट्रिक सर्जरी करण्याचा सल्ला देण्यात आला होता, पण तिनं नकार दिला. यानंतर तिला 21 वा वाढदिवस साजरा करता येणार नाही, असा इशारा डॉक्टरांनी दिला होता. यानंतर, तिेने आपली मानसिकता बदलली आणि डाएट प्लॅन फॉलो केला. शेवटी नोकरीदरम्यान दररोज चालण्यामुळे आणि नियंत्रित आहारामुळे त्यांनी तब्बल 82 किलो वजन कमी केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com