कोरोनाच्या तांडवावर 'आर्सेनिक अल्बम 30' खरंच ठरतंय उपयुक्त ? वाचा महत्त्वाची बातमी

कोरोनाच्या तांडवावर 'आर्सेनिक अल्बम 30' खरंच ठरतंय उपयुक्त ? वाचा महत्त्वाची बातमी

जगभरात कोरोना व्हायरसचं तांडव सुरू असताना आणि कोरोना आटोक्यात आणताना सरकारच्या नाकी नऊ आले आहे.  त्यातच एक आशेचा किरण म्हणून होमिओपॅथिक रोग प्रतिकार शक्ती वर्धक औषध पुढे आलं आहे. सध्या होमिओपॅथीमधील आर्सेनिकम अल्बम 30 या औषधाचा खूप मोठ्या प्रमाणावर सर्वत्र बोलबाला सुरू आहे.

होमिओपॅथिक गोळी म्हणलं तर चवीला गोड असणारी गोळी आठवते. बाकीची काही औषधे खाल्यास कडू लागतात, पण साबुदाण्यासारख्य दिसणाऱ्या होमिओपॅथिक गोळ्या अनेकांना खाण्यास आवडतात. होमिओपॅथीचं एक औषध बऱ्याच आजारांवर काम करू शकतं. सध्या 'आर्सेनिक अल्बम ३०' हे औषध चर्चेत आहे, कारण कोविड-19 ची लक्षणं आहेत. त्या लक्षणांवर प्रभावी असणारं हे औषध आहे. या औषधामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होत असल्यामुळे या औषधांची मागणी वाढली आहे.

कोरोना व्हायरसविरोधात कोणती लस नाही किंवा कोणतं प्रभावी औषध नाही. वेगवेगळ्या औषधांचं ट्रायल कोरोनाविरोधात केलं जात आहे. आयुष मंत्रालयाने प्रतिबंधात्मक उपचार म्हणून हे औषध घेण्याचा सल्ला दिल्यानंत या औषधाकडे लोकांचा कल वाढू लागला. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण हे औषध घेऊ शकतात. फक्त प्रतिबंधात्मक म्हणूनच नव्हे तर उपचार म्हणूनही हे औषध वापरता येऊ शकते. करोनावर रामबाण उपाय म्हणून नाही तर केवळ रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी या औषधांचा सल्ला दिला जात आहे. करोनाव्हायरसवर अद्यापही प्रभावी लस उपलब्ध नाही. कोणताही औषधोपचार उपलब्ध नसल्याने आता रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे हा एकमेव पर्याय असल्याने अनेकजण या औषधाचा वापर करत आहेत.

असे तयार होते होमिओपॅथिक औषधे
शेळीचे दूध, अल्कोहोल आणि सॅक्रीम हे सर्व मिक्स करून याची फार्मसीमध्ये प्रक्रिया पूर्ण करून हे होमिओपॅथिक औषध तयार केलं जातं

असे करा गोळ्यांचे सेवन
होमिओपॅथिक गोळ्यांना हात न लावता औषधांच्या झाकणात घेऊन सरळ जिभेवर टाकून चोखायच्या. कारण होमिओपॅथिक गोळ्यांच्या वरील भागावर त्याचे अंश असतात त्यामुळे हात न लावता आणि खाली पडू न देता औषध खावीत.

या वयोगटासाठी आहे औषधे
सर्व वयोगटातील व्यक्ती या गोळ्यांचे सेवन करू शकतात. एकावेळी लहान मुले दोन गोळ्या तर मोठ्या व्यक्ती चार ते पाच गोळ्या खाऊ शकतात. शिवाय, इतर कोणत्याही आजारावर या गोळ्या घेता येतात.

असा करा गोळ्यांचा वापर
रोज उपाशीपोटी तीन गोळ्या केवळ सलग तीन दिवस  घ्यावे. त्यानंतर महिनाभरानंतर पुन्हा या गोळ्या तीन दिवस घ्यायच्या आहेत, असे सलग तीन महिने या गोळ्यांचं सेवन करायचं आहे. 

हे पाळा पथ्य 
होमिओपॅथिक उपचार घेताना आहारात तीव्र गंध असलेले पदार्थ टाळणे उत्तम. लसूण, आलं, कच्चा कांदे, कॉफी यांसारख्या पदार्थांना तीव्र गंध असतो. तीव्र गंधामुळे होमिओपॅथिक औषधांचा परिणाम कमी होतो.

वेळेचे नियम पाळा
होमिओपॅथी औषध घेण्याच्या पंधरा मिनिटे आधी आणि पंधरा मिनिटे नंतर काहीही खाणं किंवा पिणं टाळा.

येथे आहे उपलब्ध
'आर्सेनिक अल्बम ३०' हे औषध होमिओपॅथिक फार्मसी, मेडिकल्स, होमिओपॅथिक डॉक्टर, आयुर्वेदिक शॉप या ठिकाणी उपलब्ध आहेत.

होमिओपॅथी डॉक्टरांचे हे आहे म्हणणे

डॉ. किर्ती गोळवलकर म्हणाल्या, करोना व्हायरसचा श्वसनसंस्थेवरती होणारा प्रभाव, तापमानामधील या आजाराबाबत वाढलेली भीती विचारात घेतली तर अर्सनिक अल्बम या औषधाच्या गुणधर्मांशी सर्व लक्षणे मिळतीजुळती आहेत. म्हणूनच आर्सेनिकम अल्बम हे औषध कोरोनावर रोगप्रतिकारशक्ती वर्धक म्हणून वापरले जाऊ शकते.

मुळातच होमिओपॅथिक औषधे ही अत्यंत सूक्ष्म प्रमाणात वापरली जातात. त्यामुळे त्याचे डोस सुद्धा कमी प्रमाणातच गरजेचे असतात. होमिओपॅथिक औषधे ही रोगप्रतिकार शक्तिवर्धक म्हणून उत्तम काम करतात. परंतु ती होमिओपॅथिक विशेषज्ञांच्या सल्ल्यानेच घेणे अत्यंत गरजेचे असते.

डॉ. स्नेहल गायकवाड म्हणाल्या, अवघे जग करोनाला हटविण्यासाठी लस शोधत आहे. मात्र अद्यापही कोणत्याही देशाला म्हणावे असे यश आले नाही. आपल्यातील प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सध्या होमिओपॅथी औषधांचा वापर केला जात आहे. केवळ रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी या औषधांचा सल्ला दिला जात आहे, पण यामुळे करोना बरा होतो असे नाही.

मुळात, होमिओपॅथिक औषधे काम कशी करतात?
एखाद्या व्यक्तीस एखाद्या आजाराची लागण होते. तेव्हा त्या आजाराचे गुणधर्म आणि सिम्प्टम्स त्या व्यक्तीमध्ये दिसू लागतात. होमिओपॅथीमध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधांचे देखील काही ठराविक गुणधर्म असतात. जेव्हा रुग्ण होमिओपॅथिक विशेषज्ञकडे उपचारासाठी येतो. तेव्हा होमियोपॅथीक विशेषज्ञ त्याची सविस्तर माहिती गोळा करतात. ज्यामध्ये त्याच्या आजाराची लक्षणे तसेच त्याचे स्वभाव गुणधर्म त्याचा आजाराबद्दलचा दृष्टिकोन त्याची जीवनशैली इत्यादी गोष्टींची सविस्तर माहिती गोळा केली जाते. होमिओपॅथिक औषधांचे देखील असे वेगवेगळे गुणधर्म औषध घेतल्यानंतर तयार होणारी लक्षणे आणि स्वभाव गुणधर्म नोंद करून ठेवलेले असतात.

रुग्णांची सर्व लक्षणे होमिओपॅथिक औषधांच्या लक्षणांची जुळवून त्याला समसमान औषध निवडले जाते. हे औषध त्या व्यक्तीच्या सर्व बाबींचा विचार करून निवडलेले असते. अशा प्रकारचे औषध रुग्णाला दिले असता त्याच्या शरीरातली रोगप्रतिकारशक्‍ती वाढून आजारामुळे बिघाड झालेल्या शारीरिक बदलांना पूर्ववत आणण्यास मदत करते आणि परिणामी तो रुग्ण त्या आजारातून बरा होतो. म्हणूनच होमिओपॅथिक विशेषज्ञना रुग्णाची माहिती गोळा करणे गरजेचे असते. ज्याची सांगड औषधांसोबत घालून त्याला त्याच्या गरजेचे योग्य ते औषध दिले जाते. हे औषध प्रत्येक आजार आणि व्यक्तीनुसार वेगळेवेगळे असू शकते.

अर्सनिक अल्बम म्हणजे नक्की काय ते तयार कुठे आणि कसे केले जाते?

आर्सेनिक हे एक प्रकारचे विषारी घटक द्रव्य आहे. ज्याचा शरीरातील फुफ्फुसावरती परिणाम होतो. होमिओपॅथिक पद्धतीने औषध बनवताना या घटक द्रव्यावर ती प्रक्रिया करून त्याचा विषारीपणा संपुष्टात आणला जातो. त्याचे वैद्यकीय गुणधर्म वाढविले जातात. ज्याचा उपयोग फुफ्फुसांच्या आजारांची निगडीत रूग्णांवर करता येऊ शकतो. हे औषध द्रवरूपात तयार केली जाते. हे औषध तयार करणाऱ्या होमिओपॅथिक फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज परदेशात विशेषतः जर्मनीत आणि भारतात देखील आहेत.

हे औषध घेताना काय काळजी घ्यावी?
सर्वात महत्वाचे म्हणजे हे एक प्रकारचे औषध आहे. होमिओपॅथिक विशेषज्ञांच्या सल्ल्यानुसारच ते घेतले गेले पाहिजे‌. सध्या बाजारात हे औषध इथे तिथे कुठेही ही आणि कशाही प्रकारे उपलब्ध होत आहे, हे अतिशय घातक आहे. अशाप्रकारे मिळणाऱ्या औषधाचे विश्वासार्हता तपासून बघणे अत्यंत गरजेचे आहे. 

महत्त्वाचे मुद्दे : 

  • डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच होमिओपॅथिक औषधांचा वापर करा
  • होमिओपॅथिक औषधे उघडे ठेवू नका
  • हे औषधे घेतल्यानंतर बाटलीचे झाकण बंद करा  
  • या औषधांना स्पर्श करू नका
  • औषधांच्या बाटलीच्या झाकणातून सरळ जिभेवर औषध घ्या.

is arsenic album 30 a homeopathic medicine really helpful on covid19 read full news 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com