esakal | लसूण शरीराला आतून देतो पोषण; जाणून घ्या फायदे
sakal

बोलून बातमी शोधा

garlic

लसूण शरीराला आतून देतो पोषण; जाणून घ्या फायदे

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : जीवनशैलीत बराच बदल झाला आहे. पूर्वी दररोजच्या कामामधून शारीरिक व्यायाम होत असे. मात्र, आता व्यस्त जीवनशैलीमुळे हे शक्य होत नाही. असे असले तरी मधुमेहींनी व्यायामाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. कारण, नियमित व्यायामामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. यासाठीच मधुमेहींनी स्वस्थ व निरोगी राहण्यासाठी नियमित व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे.

रक्तातील साखर वाढते किंवा कमी होते यावर लक्ष ठेवणे फार गरजेचे आहे. लसणासारखे नैसर्गिक पदार्थ रक्तातील साखरेच्या पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकतात. लसणात कॅल्शिअम, लोह, तांबे, पोटॅशिअम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात आढळतात. लसणातील हेच गुणधर्म त्याला सर्वोत्तम औषध बनवतात. कारण, हे सर्व पोषक घटक शरीराला आतून पोषण देण्यासाठी आवश्यक असतात.

हेही वाचा: आता थ्री-डी बॉडी कॉन्टोरिंग डिव्हाईस करणार लठ्ठपणा कमी

नियमित लसणाचे सेवन केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. लसूण बी ६ आणि सी जीवनसत्त्वाचा चांगला स्रोत आहे. व्हिटॅमिन बी ६ चयापचयसाठी उपयुक्त आहे. तर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राखण्यासाठी व्हिटॅमिन सी देखील मोलाची भूमिका बजावू शकते. लसूण कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराइड्स आणि रक्तातील लिपिड लेवल कमी करून हृदयाचे आरोग्य सुधारते.

रक्तदाब कमी करण्यासाठी लसूण उपयुक्त आहे. म्हणूनच उच्च कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी तज्ज्ञ लसूण खाण्याचा सल्ला देतात. कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे. लसुणामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे अँंटीफंगल आणि अँंटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. ज्यामुळे अनेक व्हायरल आजारांचा धोका टाळता येतो.

हेही वाचा: गणेशमूर्तीवर अखेरचा हात फिरविताना मूर्तिकाराचा मृत्यू

लसूण खाण्याचे फायदे

  • रक्तदाब राहतो नियंत्रणात

  • वजन कमी करण्यास होते मदत

  • हृदय राहते स्वास्थ

  • सर्दी-खोकल्यावरही उपयोगी

  • पचनक्रिया सुधारते

  • श्वास घेण्याच्या त्रासावर उपयोगी

  • कॅन्सरचा धोका होतो कमी

  • कोलोस्टेरॉल करते कमी

  • मधुमेहाचा धोका होतो कमी

  • हिमोग्लोबिन वाढते

loading image
go to top