
फेकण्याऐवजी या पाण्याचे सेवन केल्यास तुम्हाला आश्चर्यकारक फायदे होतील . आज बघुयात तांदळाच्या पाण्याचे कोणकोणते फायदे आहेत.
नागपूर : तांदूळ शिजविताना अनेकजण त्याचे उकळते पाणी फेकून देतात. मात्र, असे करणे चुकीचे आहे. या तांदळाच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्व असतात. फेकण्याऐवजी या पाण्याचे सेवन केल्यास तुम्हाला आश्चर्यकारक फायदे होतील . आज बघुयात तांदळाच्या पाण्याचे कोणकोणते फायदे आहेत.
ऊर्जेचा स्त्रोत -
तांदळाचे पाणी हे खूप मोठा ऊर्जेचा स्त्रोत आहे. तांदळाला जास्त पाण्यात उकळा आणि वरचे पाणी काढून ठेवा. या काचेच्या बाटलीमध्ये ते पाणी साठवून ठेवा. त्यानंतर हळू-हळू त्या पाण्याचे सेवन करा. पिताना हे पाणी तुम्ही गरम देखील करू शकता. या पाण्याचे सेवन केल्याने शरीरातील अॅसिड, अँटीअॅक्सिंडेंट आणि खनिजांचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत करते. उन्हाळाच्या दिवसांमध्ये हे पाणी वरदान ठरते.
हेही वाचा - तुमचे दात वेडवाकडे आहेत का? मग चुकूनही खाऊ नका 'हे' खाद्यपदार्थ
पोटाच्या विकारासाठी उपयुक्त -
तांदळाचे पाणी पोटाच्या विकारांवर गुणकारी असते. तांदळाचे पाणी प्यायल्यास पचनशक्ती सुधारण्या मदत होते. तसेच अपचन झाले असल्यास त्यावर ते उपयुक्त ठरते. लहान मुलांना पोटाचे विकार असतील तर हे पाणी गुणकारी असते.
लहान मुलांसाठी गुणकारी -
लहान मुले वाढीला लागतात तेव्हा त्यांना तांदळाचे पाणी दिल्यास ते सुदृढ बनतात. तांदळाचे पाणी पचण्यास हलके असते. तसेच यापासून मोठ्या प्रमाणात ऊर्जा देखील मिळते. त्यामुळे तांदळाच्या पाण्यात शिजवलेला थोडा भात मिक्स करा आणि लहान मुलांना खाऊ घाला. त्यामुळे मुलांची बद्धकोष्ठतेची समस्या संपुष्टात येईल.
इतर फायदे -
तांदळाच्या पाण्यानी शरीरावर उठणारे पुरळ देखील कमी होते. तांदळाच्या पाण्यात कापसाचा बोळा बुडवून ठेवा. त्यानंतर चेहऱ्यावर त्याने मसाज करा. नैसर्गिक आणि एक चांगले टोनर म्हणून ते माक करेल. यामध्ये असलेल्या जीवनसत्व अ, सी आणि क आपल्याला त्वचेचे रक्षण करते. तसेच त्वचेला मुलायम आणि कोमल बनवतात.
(डिसक्लेमर: वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )