तुमचे दात वेडवाकडे आहेत का? मग चुकूनही खाऊ नका 'हे' खाद्यपदार्थ

टीम ई सकाळ
Saturday, 20 February 2021

सामान्य व्यक्तींपेक्षा ज्यांचे वेडवाकडे दात असतात त्यांना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांच्या दातांमध्ये जास्त फटी असतात. त्यामध्ये अन्न जास्त वेळ साचून राहू शकते.

नागपूर : दातांची निगा राखणे गरजेचे असते. दातांची योग्यप्रकारे काळजी घेतली नाहीतर वेळेआधीच खराब होण्याचा धोका असतो. सामान्य व्यक्तींपेक्षा ज्यांचे वेडवाकडे दात असतात त्यांना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांच्या दातांमध्ये जास्त फटी असतात. त्यामध्ये अन्न जास्त वेळ साचून राहू शकते. त्यामुळे दातांमध्ये कॅव्हिटीज निर्माण होतात. असे अनेक पदार्थ असतात ज्याचे सेवन केल्याने दातांच्या समस्या उद्भवू शकतात. आज अशाच काही पदार्थांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

चीज आणि जास्त फॅटी असणारे पदार्थ :
आजकाल अनेक खाद्यपदार्थांमध्ये चीज घालतात. आमलेट, पिझ्जा, पुलाव, पराठा सर्वच खाद्यपदार्थांमध्ये चीज घातले तर आपण ते चीवने खात असतो. मात्र, ज्यांचे दात वेडेवाकडे असतात त्यांच्या दातांच्या फटीमध्ये हे चीज चिपकून असते. त्यानंतर दातांची योग्य स्वच्छता न केल्यास त्यामध्ये कॅव्हिटी तयार होतात. यासोबतच ते दातांना मुळांपासून कमजोर करत असतात.

हेही वाचा - Breaking : कोरोनामुळे पाचवी ते बारावीच्या शाळा बंद, प्रशासनाचे आदेश

गोड पदार्थ : 
वेडेवाकडे दात असलेल्या लोकांनी गोड पदार्थांचे जास्त सेवन करू नये. माव्यापासून बनलेले जे गोड पदार्थ असतात ते दातामध्ये कॅव्हीटीज तयार करतात. हे पदार्थ दातांची स्वच्छता करून काढले नाही, तर तोंडामधून दुर्गंधी यायला सुरुवात होते. त्यामुळे गोड पदार्थ खाल्ल्यानंतर दात घासायला विसरू नका. तसेच रात्रीच्या वेळी गोड पदार्थ खाणे टाळायला पाहिजे. नाहीतर दाता लवकर खराब होण्याचा धोका असतो. अनेकदा दात घासूनही स्वच्छ होत नाही. त्यामुळे डॉक्टरांकडे जाऊन दातांची स्वच्छता करणे गरजेचे आहे. 

कोल्ड ड्रिंक :
कोल्ड ड्रिंकचा तसा कॅव्हिटीजसोबत संबंध नसतो. मात्र, कोल्ड ड्रिंक वेड्यावाकड्या दातांना लवकर खराब करते. कोल्ड ड्रिंकमध्ये असलेला सोडा दातांना कमजोर करत असतो. वेडवाकडे दात आधी हलायला लागतात आणि लवकर तुटतात. त्यामुळे सोडा असलेल्या कोल्ड ड्रिंकचे सेवन करणे टाळा.   

हेही वाचा - लग्न करायचंय तर आधी घ्या परवानगी, जास्त जण आढळल्यास आकारणार दंड

जंक फूड :
वेडवाकडे दात असेल तर चुकूनही जंक फूडचे सेवन करू नका. चायनीजमध्ये वापरण्यात येणार दात वेड्यावाकड्या दातांना धोका पोहोचवतात. हिरड्यापर्यंत पोहोचून दातांना कमजोर करतात. या सासच्या सेवनामुळे दातांमध्ये दुखणे, हिरड्यांवर सूजन येणे आदी समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे जंक फूडचे कमीच सेवन करा. 

अ‌ॅसिडीक फूड : 
तुमचे दात वेडवाकडे असेल तर अ‌ॅसिडीक खाद्यपदार्थ खाणं टाळा. जास्तीत जास्त मसालेदार पदार्थ तुमच्या दातांना नुकसान पोहोचवतात. तसेच मसालेदार पदार्थ खाऊन अधिक वेळपर्यंत उपाशी राहिल्याने तुमच्या पोटामध्ये अ‌ॅसिड तयार करतात. अ‌ॅसिडीटी झाल्यानंतर आंबट ढेकर येतात. त्यामुळे दात खराब होण्याचा धोका असतो. त्यामुळे असे पदार्थ खाल्ल्यानंतर जास्त प्रमाणात पाणी प्या.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crooked teeth people should avoid some food