esakal | करा सात्त्विक ताकाचो सेवन; मिळेल रोगांपासून आराम
sakal

बोलून बातमी शोधा

करा सात्त्विक ताकाचो सेवन; मिळेल रोगांपासून आराम

करा सात्त्विक ताकाचो सेवन; मिळेल रोगांपासून आराम

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : दह्यात पाणी टाकून पातळ केलेले पेय हे ताक नाही तर लोणी येईपर्यंत घुसळून लोणी काढून घेतल्यास उरलेल्या द्रव्याला ताक असे म्हणतात. आयुर्वेदानुसार ताक दिवसभरात कधीही पिण्यास हरकत नाही. पोटाच्या काही तक्रारी असल्यास सकाळी अनुशापोटी ताकाचे सेवन करणे फायद्याचे असते. ताकामध्ये लॅक्टिक अ‍ॅसिड व अनेक खनिजे जसे कॅल्शिअम, पोटॅशिअम, फॉस्फरस आणि रिबोफ्लेविन असतात.

ताकाची गणना सात्त्विक अन्नाच्या श्रेणीत केली जाते. यामध्ये लॅक्टिक ॲसिड आढळते. हे गॅस्ट्रिक ॲसिडिटीपासून आराम देऊ शकते. गॅसची किंवा अपचनाची समस्या झाली तर काळी मिरी आणि कोथिंबिरीचा रस मिसळून ग्लासभर ताक प्या. अस केल्याने गॅसपासून लवकरच आराम मिळेल. ताक पिल्याने पचनशक्ती वाढते व पोट साफ होते. पोट साफ झाल्याने अनेक आजार दूर पळून जातात. शिवाय त्वचा व केसांसाठीही याचे अगणित लाभ होतात.

हेही वाचा: अस्वलाच्या हल्ल्यात वृद्धेचा फुटला डोळा अन् गंभीर जखमा

ॲसिडिटी किंवा गॅस दूर करण्यासाठी अनेक दशकांपासून केळीचा वापर केला जात आहे. केळीमध्ये नैसर्गिक अँटासिड असतात जे अॅसिड रिफ्लक्सपासून बचाव करण्यास मदत करते. गॅसपासून आराम मिळवण्यासाठी दररोज एक केळ खाऊ शकता. योग्य रितीने केळ खाल्ल्यास वजन देखील कमी होऊ शकते.

जास्त खाल्याने पोटात गॅस निर्माण होतो. तसेच जठराशी संबंधित ग्रंथी जेव्हा जास्त आम्ल निर्माण करतात तेव्हा ॲसिडिटीची समस्या उद्भवते. यामुळे गॅस, तोंडाची दुर्गंधी, पोटदुखी आणि इतर समस्या होतात. तसे तर गॅस दोन प्रकारे शरीरात तयार होतो. जेवताना शरीरात हवा प्रवेश करते तेव्हा गॅस तयार होतो. जेवताना शरीरात नायट्रोजन आणि ऑक्सिजन प्रवेश करतात. अन्न पचवण्याच्या प्रक्रियेत असतो तेव्हा शरीरात हायड्रोजन, मिथेन किंवा कार्बनडायऑक्साईड यासारखे गॅस शरीरात तयार होऊ लागतात. या गॅसवर वेळेवर काही उपाय केले नाही तर त्यातून अनेक समस्या निर्माण होतात.

पचनप्रक्रियेशी संबंधित समस्यांचा सामना करणाऱ्या लोकांना आहारामध्ये दही व ताकाचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. मसालेदार, तिखट स्वरूपातील जेवण केल्यानंतर ताक प्यायल्यास पचनक्रिया सुरळीतपणे पार पडण्यास मदत होते. यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचेल आणि पोटालाही आराम मिळेल.

हेही वाचा: मेट्रो भरती घोटाळ्यावर विजय वडेट्टीवार आक्रमक; म्हणाले...

ताक पिण्याचे फायदे

  • ताक पिल्याने लठ्ठपणा कमी होतो

  • वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकात मीठ टाकून प्या

  • दही पाणी अथवा ताकाने गुळण्या केल्यास तोंड येणे बरे होते

  • ताकात ओवा टाकून प्यायल्यास पोटातील जंतू मरतात

  • ताकात गूळ टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते

  • थोडी जायफळ पूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते

  • रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने पोटदुखी बरी होते

  • ताकात साखर आणि काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो

  • लहान मुलांना दात येतेवेळी दररोज चार चमचे असे दिवसभरातून २-३ वेळा दिल्यास दात येताना होणारा त्रास कमी होतो

loading image
go to top