उंच इमारतीत एका मजल्यावरुन दुसऱ्या मजल्यावर कोरोना पसरतो?

इमारतीत राहणाऱ्या लोकांच्या घराचे दरवाजे २४ तास बंद असतात, मात्र..
corona update
corona updatesakal

गेल्या वर्षभरापासून थैमान घातलेल्या कोरोना विषाणूने (coronavirus) संपूर्ण जगात पाय पसरले आहेत. सध्या या विषाणूची दुसरी लाट आली असून मुंबई, पुण्यासारख्या शहरामध्ये रुग्णसंख्या वाढतांना दिसत आहे. यामध्येदेखील अपार्टमेंट म्हणजे इमारतीमध्ये राहणांऱ्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होतांना दिसत आहे. विशेष म्हणजे इमारतीत राहणाऱ्या लोकांच्या घराचे दरवाजे २४ तास बंद असतांना किंवा ते एकमेकांच्या फारसे संपर्कात येत नसतांनाही इमारतींमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कसा काय वाढतो हा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु, नुकत्याच करण्याच आलेल्या सर्व्हेक्षणात एका मजल्यावरुन दुसऱ्या मजल्यावर कोरोनाचा प्रादुर्भाव सहज होऊ शकतो. (can-corona-viruses-spread-from-floor-to-floor)

कोरोना काळापूर्वी २००२ मध्ये एक सर्वेक्षण करण्यात आलं होतं. त्यानुसार, एका मजल्यावरुन दुसऱ्या मजल्यावर कोणत्याही विषाणूचा प्रादुर्भाव सहज होऊ शकतो. इमारतीत राहणाऱ्या व्यक्तींचा जरी एकमेकांशी फारसा संपर्क येत नसला तरीदेखील खिडक्या, ड्रेनेज लाईन यांच्या माध्यमातून हे संक्रमण होऊ शकतं.

corona update
Fact Check : RO चं पाणी पिणं ठरतंय शरीरासाठी घातक?

२०२० मध्ये कोविडविषयी करण्यात आला रिसर्च

डिसेंबर २०२० मध्ये एक अहवाल सादर करण्यात आला होता. त्यानुसार, अपार्टमेंटमध्ये ड्रेनेज पाइप्स हे एकमेकांशी जोडलेले असतात. त्यामुळे या ड्रेनेज पाइप्सच्या माध्यमातून कोरोनाच संसर्ग सहज पसरु शकतो. याविषयी चीनमधील तीन कुटुंबांवर एक रिसर्च करण्यात आला होता. हे तीनही कुटुंबीय २६ जानेवारी ते १३ फेब्रुवारीपर्यंत कोविडग्रस्त होते.

या तीन कुटुंबांपैकी एक फॅमेली वुहानवरुन परतली होती, या कुटुंबाला त्यावेळी कोरोना झाला होता. त्यामुळे मधल्या काळात बाहेरील कोणतीही व्यक्ती त्यांच्या संपर्कात नव्हती. मात्र, तरीदेखील अन्य दोन कुटुंबियांनी कोरोना झाल्याचं समोर आलं. यासाठी संशोधकांनी लिफ्ट किंवा अन्य काही ठिकाणांचा तपास केला. परंतु, त्या माध्यमातून कोरोनाचा फैलाव झाल्याचा कोणताच पुरावा सापडला नाही. मात्र, या तीनही कुटुंबाचे मास्टर बाथरुम हे एकाच ड्रेनेज पाईपने जोडले होते. त्यामुळे या पाईप्सच्या माध्यमातून कोरोनाचा फैलाव झाल्याचं समोर आलं.

दरम्यान, घरात व्हेंटिलेशन नसणे, घरातील पाईप्सचं प्लंबिंग नीट नसेल तर कोरोना झपाट्याने पसरु शकतो. तसंच उंच इमारतीमध्ये एका घरातून दुसऱ्या घरात कोरोना झपाट्याने पसरु शकतो. परंतु, ड्रेनेज पाईप्स व्यतिरिक्त अन्य कोणत्या कारणामुळे हा विषाणू पसरत असावा हे स्पष्ट झालेलं नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com