High Blood Pressure: घरी रक्तदाब कसा तपासायचा? योग्य पद्धत जाणून घ्या

जे लोकं गर्दीत जायला घाबरतात अशा लोकांना रक्तदाबाची तपासणी बाहेर रूग्णालयात जाऊन करणे कठीण होते
blood pressure checking
blood pressure checking

How To Manage High Blood Pressure: अनेक लोकं हल्ली घरीच राहणे पसंत करतात. याचं मुख्य कारण म्हणजे त्यांना आरोग्य तपासणी (Health) करावी लागते. कारण आरोग्य तपासणीत उशीर झाला तर समस्या निर्माण होऊ शकतात. जे लोकं गर्दीत जायला घाबरतात अशा लोकांना रक्तदाबाची (Blood Pressure) तपासणी बाहेर रूग्णालयात जाऊन करणे कठीण होते. त्यामुळे त्यांना घरीच ब्लड प्रेशर बघावे लागते. शरीरात (Body) घडणारे बदल पटकन समजले की घरी काळजी घेणे सोपे जाते. मात्र असे करताना काळजी घेऊन करणे गरजेचे आहे.

blood pressure checking
ऑफिसमध्ये १० तास काम करताना पार दमताय! या प्रकारे व्हा रिफ्रेश

१) उपकरणावर प्रयोग करा- डॉक्टर किंवा इतर आरोग्यतज्ज्ञ रक्तदाब अचूक ओळखण्यासाठी स्वयंचलिच किंवा यांत्रिक उपकरणांचा वापर करतात. तुम्ही घरी नियमितपणे तुमच्या रक्तदाबाचे निरीक्षण करण्यासाठी एक उपकरण खरेदी करू शकता. ते कसे वापरायचे यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.

blood pressure checking
Diabetes असताना रात्रीचा रक्तदाब वाढतोय? जीवाचा धोका आत्ताच ओळखा
बीपी मशीन
बीपी मशीन

२) मॅन्युअली जाणून घ्या- यासाठी स्टेथोस्कोप, दाबणारा फुगा असलेला ब्लड प्रेशर कफ आणि मोजमाप वाचण्यासाठी नंबर असलेला एनरोइड मॉनिटर असावा. तुम्ही अगदी आरामात बसा. हात टेबलवर ठेवा. बायसेप्सवर कफ सेट करा आणि कफच्या अगदी खाली एल्बो क्रीजमध्ये स्टेथोस्कोप ठेवा. सुमारे 180 मिमी एचजी दाब वाढवण्यासाठी फुग्याला पिळण्यास सुरुवात करा. फुगा हळू हळू डिफ्लेट करा, स्टेथोस्कोपने ऐका आणि एनरोइड मॉनिटर पहा. पहिलं स्पंदन सिलोस्टिक दबाव असल्याची सूचना देईल. जेव्हा दाब आणखी दिला जातो, तेव्हा अॅनरॉइड मॉनिटरवर नंबर लक्षात ठेवा. हृदयाचा ठोका स्थिर होऊ द्या. तोपर्यंत ऐकत राहा. मॉनिटरवर नंबर पुन्हा नोंदवा. हा डायस्टोलिक दबाव आहे. पण जर तुम्हाला जास्तच रक्तदाबाचा त्रास होत असल्यास, डॉक्टरांना ताबडतोब कळवणे महत्त्वाचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com