कोरोना आणि मिठाच्या पाण्याच्या गुळण्या, UK मध्ये झालंय महत्त्वाचं संशोधन, संशोधक म्हणतायत...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

देशात कोरोनाचा संसर्ग अजिबात कमी होताना पाहायला मिळत नाही. भारतातील कोरोनाची आकडेवारी धक्कादायक आहे.

मुंबई - देशात कोरोनाचा संसर्ग अजिबात कमी होताना पाहायला मिळत नाही. भारतातील कोरोनाची आकडेवारी धक्कादायक आहे. रविवारी तर भारतात सर्वाधिक म्हणजे १९ हजारांवर कोरोना रुग्ण आढळून आलेत. अशात एकीकडे कोरोनाची औषधं आणि लस शोधण्यावर भर आहेच, सोबतच कोरोनापासून वाचण्यासाठी, स्वतःचा बचाव करण्यासाठी काय केलं जाऊ शकतं यावर देखील संशोधन होतंय. जोवर कोरोनाची लस येणार नाही तोवर बचावात्मक उपाय करणं महत्त्वाचं ठरणार आहे.

याबाबत स्कॉटलंड मधील एडनबर्ड युनिव्हर्सिटीतल्या संशोधकांनी महत्त्वाचा अभ्यास केलाय. यामध्ये मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने आपण व्हायरसपासून स्वतःला वाचवू शकतो असं या अभ्यासकांच्या चमूचं म्हणणं आहे. 

BIG NEWS - आता अजिबात दुर्लक्ष नको, 'ही' आहेत कोरोनाची तीन नवी लक्षणं...

एडनबर्ग युनिव्हर्सिटीमधील प्रोफेसर अजिज शेख यांच्या अभ्यासानुसार मिठाच्या पाण्याने नियमित गुळण्या केल्याने कोरोनाची लक्षणं कमी केली जाऊ शकतात. त्यामुळे कुणाला कोरोनाची लागण झाली असेल आणि कोरोनाची कमी लक्षणं असतील त्यांच्यासाठी मिठाच्या पाण्याच्या गुळण्या फायदेशीर असल्याचं या आभ्यासकांचं म्हणणं आहे. जेव्हा कोरोना संसर्ग हा श्वास नलिकांवर असतो तेंव्हा मीठ कोरोना व्हायरसवर विषाचं काम करतो. 

प्रोफेसर अजिज यांच्या माहितीप्रमाणे जेव्हा कोरोना मिठाच्या संपर्कात येतो तेंव्हा मीठ कोरोनासाठी जहर म्हणून काम करतो. सोबतच मिठाच्या पाण्याने शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता देखील वाढते. मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने श्वास नलिकेतील रोग प्रतिकारक क्षमता व्हायरसवर हल्ला करून त्याला संपवायला सुरवात करते. अभ्यासकांच्या मते मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने सर्दी खोकल्यावर दोन दिवसाच्या आत नियंत्रण मिळवता येतं.  

BIG NEWS - महामुंबईतील 'या' क्षेत्रांमध्ये पुन्हा लॉकडाऊन; संसर्ग रोखण्यासाठी खबरदारी

याचसोबत मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने आपल्यापासून इतरांना होणार कोरोना संक्रमण देखील कमी होऊ शकतं, असंही अभ्यासकांचं म्हणणं आहे. मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि हीच रोगप्रतिकारक शक्ती व्हायरसवर थेट हल्ला करते. 

corona virus and salt water therapy read what researchers says about salt water gargle


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona virus and salt water therapy read what researchers says about salt water gargle