आता अजिबात दुर्लक्ष नको, 'ही' आहेत कोरोनाची तीन नवी लक्षणं...

आता अजिबात दुर्लक्ष नको, 'ही' आहेत कोरोनाची तीन नवी लक्षणं...

मुंबई - कोरोना व्हायरसनं देशात थैमानं घातलं आहे. दररोज कोरोनाबाधितांचा आकडा नवा उच्चांक गाठतो. कोरोनाला रोखण्यासाठ केंद्र सरकार विविध पातळीवर प्रयत्न करताहेत. दर दिवशी कोरोनाची रेकॉर्ड ब्रेक आकडेवारी समोर येत असते. देशात कोरोनाची एकूण संख्या 5 लाख 48 हजार 318 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 19,459 नवीन रुग्ण आढळले आणि 380 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. सलग दुसर्‍या दिवशी कोरोनाची जवळपास 20 हजार प्रकरणं समोर आली आहेत. अशातच आता सरकारसमोर आणखी काही अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. कारण कोरोनाची काही नवीन लक्षणं समोर आल्याचं माहिती मिळाली आहे. त्यामुळे आरोग्य विभागासमोर ही नवी समस्या समोर आली आहे. 

आतापर्यंत ताप, श्वास घेण्यास त्रास होणं, कोरडा खोकला आणि थकवा यासारखी शरीरात काही बदल जाणवले की ही कोरोनाचे लक्षणं असल्याचं मानलं जायचं. पण आता अमेरिकेतल्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंशन या वैद्यकीय संस्थेनं तीन नवी कोरोनाची लक्षणं समोर आणलीत. त्यामुळे आरोग्य विभागासह नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. त्यातच पावसाळा तोंडावर आल्यानं ही लक्षणं मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. म्हणूनच या लक्षणांमुळे कोरोनाबाधितांचा आकडाही वाढू शकतो. 

सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन संस्थेच्या म्हणण्यानुसार, वाहणारं नाक, मळमळ आणि जुलाब होणं ही देखील कोरोनाची लक्षणं असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान याप्रकारचे काही लक्षण तुम्हाला आढऴून आली तर तात्काळ रुग्णालयात जाऊन कोरोनाची चाचणी करण्याचा सल्ला देखील या संस्थेनं दिला आहे. 

सर्दी होणं 

आतापर्यंत वाहती सर्दी म्हणजे कोरोनाची लक्षणं नाही असं सांगितलं जातं होतं. मात्र आता जरी एखाद्याला ताप येत नसेल तरी वाहती सर्दी आणि अस्वस्थता वाटत असेल तर त्या व्यक्तिला कोरोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता असते. 

मळमळीकडे दुर्लक्ष नको 

सध्याच्या परिस्थितीत मळमळ होत असेल तर अजिबात दुर्लक्ष करु नका कारण ते तुमच्यासाठी धोकादायक ठरु शकतं. पावसाळ्याचे दिवस असल्यानं वातावरणात बदल होतात अशावेळी अनेकांना मळमळ वाटत असते. पण कोरोनासारख्या परिस्थितीत याकडे दुर्लक्ष करु नका. तात्काळ त्याची तपासणी करुन घ्या. 

जुलाब होताच डॉक्टरांकडे जा 

कोरोना रुग्णांमध्ये आता जुलाब होणं हे देखील नवं लक्षण आढळून आलं आहे. यापूर्वीही डॉक्टरांनी कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये जुलाब होण्याची लक्षणं आढळून येतात असं सांगितलं होतं. त्यामुळे जुलाबसारखी समस्या उद्भवल्यास आणि शरीरात काही इतर गोष्टी जाणवल्यास तात्काळ डॉक्टरकडे जाऊन कोरोनाची चाचणी करणं गरजेचं आहे.

dont neglect these symptoms of vomiting and cold because these are new symptoms of corona

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com