Coronavirus : लस घेतल्यावर का येतो ताप?

लसीकरणाविषयी सध्या अनेक अफवा पसरत आहेत.
Corona Vaccine
Corona VaccineSakal

कोरोनापासून (coronavirus) स्वत:चा व कुटुंबाचा बचाव करायचा असेल तर लस घेण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे सध्या संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. मात्र, ही लस घेतल्यानंतर ताप, थकवा, डोकेदुखी ही लक्षण दिसून येत आहेत. म्हणूनच, अनेक जण लस घेण्यास नकार देत आहेत. परंतु, ही किरकोळ लक्षणं नेमकी का जाणवतात किंवा कशामुळे हा त्रास होतो हे कोणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? अर्थात नाही. त्यामुळेच लसीकरणाविषयी सोशल मीडियावर अनेक अफवा पसरत आहेत. म्हणूनच, लस घेतल्यानंतर ताप, डोकेदुखी हा त्रास का जाणवतो हे पाहुयात. (coronavirus-why-are-some-people-hit-with-side-effects-after-taking-covid-vaccines)

आपली रोगप्रतिकारक शक्ती दोन भागांमध्ये काम करत असते. यात पहिल्या भागात कोणत्याही विदेशी विषाणू किंवा जीवाणूने शरीरात प्रवेश केला तर आपली रोगप्रतिकारक शक्ती सक्रीय होते व या विषाणू विरोधात काम सुरु करते. अगदी तसंच लसीच्या बाबतीत होतं. लस घेतल्यानंतर पांढऱ्या पेशी जमा होतात व शरीरात इन्फ्लेमेशन होतं. ज्यामुळे त्याची रिअॅक्शन म्हणून मग ताप, थकवा आणि अन्य लक्षणं जाणवू लागतात, असं 'इकोनॉमिक टाइम्स'च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

Corona Vaccine
उत्तर प्रदेशचं होणार विभाजन? ; केंद्राने घेतला महत्त्वाचा निर्णय

लस घेतल्यावर ज्याप्रमाणे काही नागरिकांमध्ये किरकोळ लक्षण जाणवतात. त्याचप्रमाणे काही नागरिकांमध्ये अजिबात लक्षण दिसून येत नाही. त्यामुळे अनेकदा आपल्याला ताप आला नाही म्हणजे आपण घेतलेली लस अकार्यक्षम झाली का असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण होतो. मात्र, तसं अजिबात नसतं. जरी तुमच्यात लक्षण दिसत नसली तरीदेखील ही लस शरीरात तिचं काम करण्यास सुरुवात करते. आपल्या शरीरातील असलेल्या रोगप्रतिकारक शक्तीचा दुसरा भाग त्यावेळी अँटीबॉडी तयार करण्याचं काम करत असतो. या अँटीबॉडीमुळे दिसणाऱ्या लक्षणांविरुद्ध लढण्याचे काम केलं जातं.

दरम्यान, अनेकदा लस घेतल्यानंतर काही जणांमध्ये गंभीर लक्षण दिसून येतात. त्यामुळे अशा वेळी त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ही गंभीर लक्षण अंगावर काढू नयेत, असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com