जिरे आणि गुळ एकत्र खाणं आरोग्यासाठी फायद्याचं, अनेक समस्या होतात दूर

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 28 June 2020

आरोग्यासाठी लाभदायक असलेल्या या दोन पदार्थांच्या एकत्र सेवनामुळे काय फायदा होतो हे जाणून घेऊया.

स्वयंपाकघरात असलेल्या पदार्थांमध्ये अनेक असे पदार्थ असतात जे आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात. त्यांच्या नियमित आणि प्रमाणात सेवन करण्यामुळे अनेक फायदे होत असतात. मात्र याची आपल्याला माहिती नसते. घरात जीरे आणि गुळ यांचा नेहमीच वापर होतो. या दोन्ही पदार्थांचे एकत्र सेवन केल्यास शरीराला खूप फायदा होतो. आरोग्यासाठी लाभदायक असलेल्या या दोन पदार्थांच्या एकत्र सेवनामुळे काय फायदा होतो हे जाणून घेऊया. 

वजन कमी करण्यास मदत
वाढतं वजन ही बऱ्याच लोकांची समस्या असते. वाढलेलं वजन हा टाइप 2 डायबेटीज किंवा इतर प्रकारच्या कर्करोगाचा धोकाही निर्माण करतो. याबाबत वैज्ञानिकांनीही दाखले दिले आहेत. जिऱ्याचे पाणी उकळून गुळासोबत खाल्ल्यास वजन कमी होण्यास मदत होते. तुम्हाला वाटलं तर जिरे गुळासोबत मिक्स करूनही खाता येतात. अनेकजण याचा वापर वजन कमी करण्यासाठी करतात.

हे वाचा - एक कप चहात फक्त दोन गोष्टी अॅड करून पहा, आरोग्यासाठी आहे फायद्याचे

अॅनिमियाचा धोका कमी होतो
शरीरात रक्ताची कमतरता असणे म्हणजेच अॅनिमिया होय. ही समस्या प्रामुख्याने गर्भवती महिलांना त्रासदायक ठरते. गुळात लोहाचे प्रमाण जास्त असते. गुळ प्रमाणात खाल्ल्यास अॅनिमियाचा धोका अनेक पटींनी कमी होतो. जिऱ्यासोबत गुळ खाल्ल्याने रक्ताभिसरण प्रक्रियाही चांगली होते. 

उच्च रक्तदाब कमी होण्यासाठी उपयुक्त
​उच्च रक्तदाबाच्या त्रासाला हायपरटेन्शन असंही म्हटलं जातं. यामुळे हृदयाशी संबंधित अनेक आजार किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो. जिरे आणि गुळ यामध्ये असलेले पोटॅशिअम आणि मॅग्निशिअमच्या प्रमाणामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास कमी होण्यासाठी मदत होऊ सकते. यासाठी ज्या लोकांना उच्च रक्त दाबाचा त्रास आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने जिरे आणि गुळाचे सेवन करायला हवे. 

हे वाचा - तिळाचे आश्चर्यकारक फायदे, सुंदर आणि निरोगी शरीरासाठी आहे उपयुक्त

हाडे मजबूत होतात
हाडांना मजबूत करण्यासाठी कॅल्शियमची गरज असते. जिरे आणि गुळाचे सेवन केल्यानं हाडांची मजबुती वाढण्यास मदत होऊ शकते. नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशननुसार या दोन्ही पदार्थांमध्ये हाडांसाठी उपयुक्त असलेले गुणधर्म आढळले आहेत. एका संशोधनात ही गोष्ट समोर आली आहे. यासाठी वयोवृद्ध किंवा लहान मुलांसाठी जिरे आणि गुळाचे सेवन आरोग्यदायी असतं. 

हे वाचा - 'व्हिटॅमीन डी'च्या कमतरतेमुळे कोरोनाने घेतले सर्वाधिक मृत्यू, वाचा काय आहे उपाय

मासिक पाळीच्या समस्यांवर औषधी
मासिक पाळीच्या काळात उद्भवणाऱ्या समस्यांवरही गुळ आणि जिरे फायदेशीर ठरतात. गुळाच्या पाण्यात जिरे टाकून प्यायल्याने मासिक पाळीच्या काळातील तक्रारी दूर होतात. जिऱ्यामध्ये आयर्न आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. तर गुळामधील अँटी इंफ्लेमेटरी प्रॉपर्टीजमुळे मासिक पाळीच्या काळात होणाऱ्या वेदना कमी होतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cumin and jaggery mix eating healthy for body