सायकल चालविल्याने कॅन्सरचा धोका कमी, वाचा इतरही फायदे|Cycling Benefits | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cycle
सायकल चालविल्याने कॅन्सरचा धोका कमी, वाचा इतरही फायदे|Cycling Benefits

सायकल चालविल्याने कॅन्सरचा धोका कमी, वाचा इतरही फायदे Cycling Benefits

लोकांना दैनंदिन (Daily Routine) जीवनात सायकल चालविण्याचे (Cycling Benefits) महत्व कळले आहे. त्यामुळे अनेक लोकं सायकल चालविण्याला पसंती देतात. अनेक सायकलप्रेमी एकत्र येऊन सायकल चालवतात. खरं तर कोविड नंतर, बरेच लोक व्यायामाचा प्रकार म्हणून सायकलिंगकडे वळले आहेत. कारण सायकलिंग बरेच सुरक्षित असून तुम्ही सामाजिक अंतराचे नियम सहज पाळू शकता. पण सायकल चालविल्याचे अनेक फायदे आहेत. (Cycling Benefits For Health)

हेही वाचा: महिलांनो, योनीतून दुर्गंधी येतेय,अशी घ्याल काळजी Vaginal Health

Cycle

Cycle

कर्करोग आणि सायकलिंग

अनेक संशोधकांनी व्यायाम आणि कर्करोग, विशेषत: कोलन आणि स्तनाचा कर्करोग यांच्यातील संबंधांचा अभ्यास केला आहे. संशोधनात असे दिसून आले आहे की जर तुम्ही सायकल चालवली तर आतड्याचा कर्करोग होण्याची शक्यता कमी होते. तसेच नियमित सायकलिंगमुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो.

मानसिक आजार आणि सायकलिंग

नैराश्य, तणाव आणि चिंता यासारख्या मानसिक आरोग्याच्या समस्या नियमित सायकल चालविल्याने कमी केल्या जाऊ शकतात. कारण तुमचे मन वातावरणामुळे आनंदित झालेले असते.(Cycling Benefits For Health)

हेही वाचा: लहान मुलांसाठी जगभरात कोविडच्या 'या' लसी आहेत उपलब्ध

Diabetes

Diabetes

मधुमेह आणि सायकलिंग

सध्या टाइप 2 मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे. लोकांच्या शारीरिक हालचाली कमी झाल्याचे कारण यामागे मानले जात आहे. फिनलंडमध्ये काही काळापूर्वी झालेल्या संशोधनात आढळून आले की, जे लोक दररोज 30 मिनिटांपेक्षा जास्त सायकल चालवतात त्यांना मधुमेह होण्याचा धोका 40 टक्क्यांनी कमी असतो.

संधीवातातही फायदा

सायकलिंगमुळे ताकद वाढते. जर तुम्हाला आर्थरायटिस असेल तर सायकल चावलणे चांगले मानलो जाते. यामुळे सांध्यांवर थोडा ताण पडतो. सायकल चालवल्याने ऑस्टिओपोरोसिसला (हाडे पातळ होण्याचा आजार) मदत होत नाही कारण तो वजन उचलणारा व्यायाम नाही.(Cycling Benefits For Health)

हेही वाचा: दिवसाची सुरूवात प्रसन्न करायचीय! ही पाच काम कराच

calories

calories

कॅलरी कमी करण्यासाठी मदत

सायकलिंग हा एरोबिक व्यायामाचा उत्कृष्ट प्रकार आहे. कॅलरीज कमी करण्यासाठी त्याचा फायदा होतो. जर तुम्ही वेगाने सायकल चालवत असाल तर तुमचे शरीर अधिक ऊर्जा वापरते. त्यामुळे तुम्ही अधिक कॅलरी बर्न करू शकाल. सायकल 14 ते 15.9 मैल प्रति तास वेगाने चालवताना, समान वजनाची व्यक्ती सुमारे 372 कॅलरीज बर्न करेल. एका दिवसात अधिक कॅलरी जाळण्यासाठी दररोज ३० मिनिटे सायकल चालवणे गरजेचे आहे.

वजन नियंत्रणात

सायकलिंग हा वजन नियंत्रित करण्याचा किंवा कमी करण्याचा एक चांगला मार्ग आहे, कारण यामुळे तुमचा चयापचय प्रक्रिया सुधारते, ब्रिटीश संशोधनात असे दिसून आले आहे की दररोज अर्धा तास सायकल चालवल्याने वर्षभरात सुमारे पाच किलोग्रॅम चरबी जाळते.

हेही वाचा: Omicron Symptoms: अंगावर रॅशेस आलेत, सावधान... असू शकतं ओमिक्रॉनचं लक्षण!

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top