दिनचर्येतील चुका आजाराचे मूळ कारण; डॉक्टर म्हणाले, थोडी काळजी घेतल्यास आजार दूर पळतील

मनोहर घोळसे
Wednesday, 27 January 2021

कुठलाही आजार झाला तर लोकांना एकच उपचारपद्धतीची माहिती असल्याने इतर उपचारपद्धतीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. होमिओपॅथीमध्ये आजार पूर्णतः बरा होतो.

सावनेर (जि. नागपूर) : दिनचर्येतील चुका आजाराचे मूळ कारण आहे. थोडी काळजी घ्या, आहार-विहारासह दिनचर्या सुधारा, आजार दूर पळतील हा आरोग्याचा मूलमंत्र शहरातील मान्यवर डॉक्टरांनी दिला.

दै. ‘सकाळ’च्या ‘कॉफी विथ सकाळ’ या सदराखाली डॉक्टरांचा संवाद घडवून आणण्यात आला. याप्रसंगी प्रामुख्याने डॉ. पराग चौधरी, डॉ. शशांक मिलिंद कुथे, डॉ. प्रिया पवार, डॉ. निहारिका साहू यांनी सहभाग दर्शविला. चर्चेदरम्यान अद्यापही कोरोना व्हायरसचा धोका टळलेला नाही. बाधित रुग्ण आढळतच असल्याने नागरिकांनी अलर्ट राहून कोरोना संदर्भात शासनाच्या आरोग्यविभागाने सुचविलेल्या गाईडलाईन पाळणे, लक्षणे दिसून येताच न घाबरता चाचणी करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.

जाणून घ्या - ‘जे जे करणं शक्य असेल ते माझ्या नागपुरात करील’; मुख्यमंत्री असं का म्हणाले...

आयुर्वेदिक पद्धतीने व घरगुती उपायाने रोगप्रतिकारशक्ती वाढविणे शक्य असल्याचे डॉ. शशांक कुथे म्हणाले. होमिओपॅथिक एक सुरक्षित व सायंटिफिक उपचार पद्धती आहे. मात्र, त्याबद्दल पाहिजे तशी जनजागृती झालेली नसल्याने अनेकांना याविषयी माहिती नाही. ॲलोपॅथिक उपचार करताना आजारानुसार औषधी दिली जातात. मात्र, होमिओपॅथिमध्ये व्यक्तिमत्वावरून म्हणजे रुग्णांची मानसिक व शारीरिक स्थिती बघून उपचार केले जातात, असे डॉ. पराग चोधरी म्हणाले.

कुठलाही आजार झाला तर लोकांना एकच उपचारपद्धतीची माहिती असल्याने इतर उपचारपद्धतीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. होमिओपॅथीमध्ये आजार पूर्णतः बरा होतो. आरोग्य सेवेमध्ये होमिओपॅथी डॉक्टरांचा समावेश नाही. तसेच रिसर्च सेंटर उपलब्ध नसल्याने होमिओपॅथीकडे दुर्लक्ष होण्याची खंत डॉ. पराग चौधरी यांनी व्यक्त केली. डॉक्टरांनी सांगितलेल्या उपचार पद्धतीने उपचार केल्यास कुठलाही दीर्घ आजार बरा करण्याची क्षमता असल्याचे मत डॉ. प्रिया पवार, डॉ. निहारिका साहू यांनी व्यक्त केले.

जाणून घ्या - माणुसकीला कळीमा! बाळाचा जन्म अन् पतीचा मृत्यू; बाळ अपशकुनी असल्याचे समजून केले भयानक कृत्य

डॉ. शशांक कुथे यांचे आजोबा डॉ. गणपतराव कुथे सामाजिक बांधिलकी जोपासण्यास परिसरातील गरीब व सर्वसामान्यांची अविरत सेवा करण्यासाठी नावारूपाला आले होते. त्यांच्या प्रेरणेतून रुग्ण सेवा सुरू असल्याचे डॉ. शशांक म्हणाले. तर जन्मभूमीवर रुग्णसेवा करण्याचा आगळावेगळा आनंद वाटत असल्याचे डॉ. पराग म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctors said Improve routine, get rid of illness