शरीरातील हाडे कमकुवत करणारे हे खाद्य पदार्थ तुम्ही खातात का? |Healthy Lifestyle | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bones

शरीरातील हाडे कमकुवत करणारे हे खाद्य पदार्थ तुम्ही खातात का?

हाडे हे शरीराचा महत्त्वपूर्ण भाग आहे. हाडे मजबूत असेल तर शरीर सदृढ राहते. मानवी शरीरात असलेल्या 206 हाडांचा वेगगेगळ्या कामांसाठी उपयोग होतो. त्यामुळे चांगल्या आरोग्यासाठी हाडे मजबुत असणं गरजेचे असते. हाडांना नेहमी कॅल्शियमसोबत मिनरल्सदेखील उपयुक्त ठरते. पण अनेकदा आपण काही पदार्थ खातो जे आपल्याला अधिक स्वादीष्ट वाटते मात्र हेच पदार्थ आपले हाडे कमकूवत करत आहे, याचा आपल्याला अंदाजही नसतो.

आज आपण अशाच पदार्थांबाबत जाणून घेणार आहोत जे आपल्या शरिरातील शरीरातील कॅल्शियम कमी करतात. हे पदार्थ खाल्ल्याने शरीरातील हाडांमधील कॅल्शियम कमी होते आणि हाडे कमकूवत होतात. (For strong bones avoid to eat these foods, check list)

कोल्ड ड्रिंक्स - कोल्ड ड्रिंक्समध्ये कार्बन डाय ऑक्साईड आणि फॉस्फोरसचं प्रमाण जास्त असल्याने तुमच्या शरीरातील हाडे कमकुवत होतात.

चॉकलेट - जास्त प्रमाणात चॉकलेट खाल्ल्यानेही हाडे कमजोर होतात. चॉकलेट खाल्ल्याने शरीरात साखर आणि ऑक्सलेटचं प्रमाण वाढतं.

मीठ - मीठ हे अत्यावश्यक आहे पण जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्यानेही शरीरातील हाडे कमजोर होतात.

दारू - दारुचे पिल्यानेही मानवी शरीरातील कॅल्शियमचं प्रमाण कमी होऊन हाडे कमकुवत होत असतात.

चहा आणि कॉफी - चहा आणि कॉफीच्या सेवनानेही शरीरातील हाडे कमकुवत होतात. चहा आणि कॉफी अधिक प्रमाणात पिणे हे आरोग्यासाठी धोकादायक आहे.

पालक - हिरव्या भाज्यांमध्ये कॅल्शियमचं प्रमाण अधिक असलं तरी पालकमध्ये ऑक्सालेट्सचं प्रमाण जास्त असतं. ज्यामुळे कॅल्शियम कमी होतं. त्यामुळे पालक सारख्या भाज्या जास्त प्रमाणात खाऊ नये

वीट ब्रेड आणि दुध - वीट ब्रेड आणि दुध एकत्र खाल्ल्यानेही शरीरातील कॅल्शियम कमी होते.