‘गोल्डन ब्लड’बद्दल कधी ऐकले आहे का? ५२ वर्षांत फक्त ४३ लोकांमध्ये आढळला ‘आरएच नल’

टीम ई सकाळ
Sunday, 20 September 2020

१९५२ साली आणखी एका रक्तगटाची नोंद झाली व तो ‘बाँबे ग्रुप’ म्हणून ओळखला जाऊ लागला. ‘बाँबे ग्रुप’ हा दुर्मिळ रक्तगट आहे. जगात १० लाख लोकांमध्ये फक्त चार जणांमध्ये हा रक्तगट सापडतो. आता तर त्याहूनही आणखी एक दुर्मिळ रक्तगट नोंदला गेला आहे.

नागपूर : ‘रक्तदान जीवन दान’, ‘रक्तदान महादान’, ‘रक्तदान आहे जीवनदान ते वाचवते दुसऱ्याचे प्राण’, ‘चला रक्तदान मोहीम राबवूया, रक्तदान करून जीवन वाचवूया’ आदी घोषणा वाक्यातून रक्तदानाचे महत्व पटवून देण्यात आले आहे. रक्त आपल्या शरीरासाठी किती उपयोगी आहे, हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे मनुष्याला अनेक आजारांना सामोरे जाव लागते. कित्येकवेळा तर मृत्यू देखील ओढवतो. अभिनेता सलमान खानच्या ‘सुल्तान’ चित्रपटात ‘O-’ ब्लड ग्रुपचे महत्व सांगण्यात आले आहे. असाच एत ब्लड ग्रुप आहे जो खूप कमी लोकांमध्ये आढळतो. या ब्लड ग्रुपचे नाव ‘गोल्डन ब्लड’ व ‘आरएच नल’ आहे. चला तर जाणून घेऊया या ब्लड ग्रुप बद्दल....

एखाद्या अपघातात मनुष्य जखमी झाला किंवा गंभीर आजार झाल्यास शरीरात रक्ताची कमतरता मोठ्या प्रमाणात निर्माण होते. ही कमतरता भरून काढण्यासाठी मनुष्याला आवश्यक त्या रक्तगटाची गरज भासते. अशावेळी एका व्यक्तीच्या शरीरतून रक्त काढून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात देण्याने ही कमतरता कमी होऊ शकते. रक्त केवळ मनुष्याच्या शरीरातच तयार होते. याला कोणत्याही वैज्ञानिक प्रयोगशाळेत तयार करता येत नाही.

हेही वाचा - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावे आहेत तब्बल इतके गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड; वाचून तुम्हालाही नक्की वाटेल अभिमान

माणसाच्या रक्ताचे आठ प्रकारचे गट असतात. हे सर्वसामान्य ज्ञान शाळेपासून आपण शिकतो. ए, बी, एबी व ओ असे मुख्य चार रक्तगट त्यात पॉझिटिव्ह व निगेटिव्ह असे त्याचे आणखी चार उपप्रकार मिळून आठ प्रकारचे रक्तगट असतात.

यात १९५२ साली आणखी एका रक्तगटाची नोंद झाली व तो ‘बाँबे ग्रुप’ म्हणून ओळखला जाऊ लागला. ‘बाँबे ग्रुप’ हा दुर्मिळ रक्तगट आहे. जगात १० लाख लोकांमध्ये फक्त चार जणांमध्ये हा रक्तगट सापडतो. आता तर त्याहूनही आणखी एक दुर्मिळ रक्तगट नोंदला गेला आहे.

अधिक माहितीसाठी - बाळाच्या घाईने पती-पत्नी भरपावसात घराकडे निघाले; अन् नियतीने डाव साधला

फक्त ९ लोक सध्या ब्लड डोनर

दुर्मिळ रक्तगट हा ‘गोल्डन ब्लड’ नावाने किंवा ‘आरएच नल’ नावाने ओळखला जातो. जगात आतापर्यंत फक्त ४३ लोकांमध्ये हा रक्तगट आढळून आला आहे. विशेष म्हणजे या रक्तगटाचे लोक कोणत्याही दुर्मिळ रकतगट असलेल्यांसाठी रक्त देऊ शकतात. मात्र, त्यांना रक्ताची गरज असेल तर याच ग्रुपचे रक्त द्यावे लागते. या रक्तगटाचे फक्त ९ लोक सध्या ब्लड डोनर आहेत. अत्यंत आणीबाणीच्या परिस्थितीतच त्यांना रक्त देण्याची विनंती केली जाते. या ग्रुपच्या लोकांना स्वतःची खूपच काळजी घ्यावी लागते. कारण, त्यांच्यासाठी डोनर मिळण्यात अडचणी येऊ शकतात.

फक्त ४३ लोक जगभरात

आपल्याला हे माहिती असेल की रक्तगट ओळखताना लाल पेशींवर असलेल्या अँटीजेनच्या काऊंटवरून तो ठरविला जातो. लाल पेशींवर डोनटवरील स्प्रिंकलप्रमाणे ही अँटीजेन असतात. जेथे डी अँटीजेन आढळते ते रक्तगट आरएच पॉझिटिव्ह म्हटले जातात तर जेथे हे अँटीजेन आढळत नाही ते आरएच निगेटिव्ह म्हटले जातात. ‘आरएच नल’मध्ये तब्बल ६१ प्रकारचे अँटीजेन आढळत नाहीत. त्यामुळे हा ग्रुप अत्यंत दुर्मिळ समजला जातो. प्रत्येक लाल पेशीवर ३४२ प्रकारचे अँटीजेन असतात. गेल्या ५२ वर्षांत या रक्तगटाचे फक्त ४३ लोक जगभरात नोंदले गेले आहेत.

क्लिक करा - सोने खरेदीकडे नागरिकांची पाठ; भाव घटले तरीही ग्राहक मिळेना; जाणून घ्या

१९६१ मध्ये आढळला प्रकार

बायोमेडिकल रिसर्च पोर्टल मोजॅकवर प्रकाशित झालेल्या लेखात पेनी बेली यांनी लिहिले आहे की या रक्ताचा प्रकार प्रथम १९६१ मध्ये ओळखला गेला होता. ऑस्ट्रेलियन मूळ रहिवास्यांमध्ये हा रक्तगट आढळला होता. जगात हा रक्तगट असणारे केवळ ४३ लोक आहेत.

इथे आहे ‘आरएच नल’ रक्त गटाचे लोक

गोल्डन ब्लड हा रक्त ग्रुप असणे बहुतेकदा महागात पडते. यूएस दुर्मिळ आजार माहिती केंद्रानुसार, ज्या लोकांना रक्त प्रकार आरएच नल आहे, त्यांना सौम्य अशक्तपणा होऊ शकतो. त्यांना वरून रक्त वाहण्याची गरज असेल. त्यांना फक्त आरएच नल रक्तच दिले जाऊ शकते. जे शोधणे कठीण आहे. दुसऱ्या देशात रक्तदाता सापडला तर रक्त आणणे अवघड काम बनते. ब्राझील, कोलंबिया, जपान, आयर्लंड आणि अमेरिकेत ‘आरएच नल’ रक्त प्रकार असलेले लोक आहे.

संकलन आणि संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Have you ever heard of Golden Blood read full story