रातांधळेपणापासून तर पचनसंस्थेपर्यंतच्या आजारावर फायदेशीर काळीमिरी

टीम ई सकाळ
Thursday, 15 October 2020

अनेक स्वादिष्ट भाज्या आणि पदार्थ बनवताना त्यात काळी मिरी टाकली नाही, तर त्या पदार्थाची चव कुठे ना कुठे कमी राहते. काळी मिरी ही फक्त पदार्थाची चव वाढवण्यासाठी नसून आपल्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे.

नागपूर - आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध होणारा मसाल्याचा पदार्थ म्हणजे काळी मिरी. असे कुठलेही घर नाही, जिथे काळी मिरी सापडणार नाहीत. अनेक स्वादिष्ट भाज्या आणि पदार्थ बनवताना त्यात काळी मिरी टाकली नाही, तर त्या पदार्थाची चव कुठे ना कुठे कमी राहते. काळी मिरी ही फक्त पदार्थाची चव वाढवण्यासाठी नसून आपल्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे.

हेही वाचा - बिअरच्या बाटलीवरील 'क्राऊन कॉर्क' अन् 'ओपनर'चा शोध लावणारी...

काळी मिरीचे फायदे -

  • डोळ्यांवरील आजारावर उपयोगी - रातांधाळेपणा, डोळ्यातील वाढणाऱ्या मांसावर, बुब्बुळांवरील अपारदर्शक पडद्यावर काळी मिरीची पावडर मधात मिसळून लेप लावल्याने हे आजार कमी होतात. मात्र, या उपायांना वैद्यकीय देखरेखीखाली करणे कधीही फायदेशीर ठरते. 
  • सर्दी, खोकल्याने त्रस्त असणाऱ्या लोकांसाठी काळीमिरी अतिशय फायदेशीर ठरते. आयुर्वेदात काळ्या मिरीच्या सेवनाने सर्दी आणि खोकला ठीक होऊ शकतो, असेही सांगितले गेले आहे. त्यासाठी काळी मिरीचे पावडर आणि मधाचे सेवन करावे. त्यामुळे खोकला आणि सर्दीपासून आराम मिळतो.
  • दातदुखी आणि किडलेल्या दातांसाठी मिरीपूड दन्तमंजनासारखी वापरतात आणि मिरीच्या काढ्याने चूळ भरतात.
  • रोगप्रतिकारशक्ती - कोरोनाच्या संकटकाळात रोगप्रतिकारशक्ती चांगली असणे महत्वाचे आहे. त्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो. काळी मिरीसोबत तुळशीची पान, हळद याचा काढा करून प्यायल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे काळी मिरीचे सेवन करायला विसरू नका. 
  • घशाच्या आजारावर उपयुक्त - घसा दुखत असल्यास, घशाला सूज आल्यास त्यावर काळी मिरी फायदेशीर ठरतात. घशात कफाचा त्रास होत असल्यास मिरीच्या काढ्याने गुळण्या केल्यास फायदा होता.
  • पचनसंस्था - मिरीमुळे यकृताला उत्तेजना मिळते आणि त्यामुळे पाचक स्राव योग्य प्रमाणात स्रवतात. यामुळे चांगल्याप्रकारे अन्नपचन होतंय. मिरी जंतांवर खूप उपयोगी पडते. जेवणात मिरी घेतल्यास जंत होण्याची सवय मोडते. याशिवाय भूक न लागणे, अपचन होणे, पोट फुगणे, पोटात वायू धरणे, पोटदुखी अशा रोगांमध्ये मिरीपूड लिंबाचा रस किंवा ताकाबरोबर प्यायल्यास चांगला उपयोग होताना दिसतो.
     

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: health benefits of black pepper