esakal | वजन कमी करण्यापासून तर केसांच्या सौंदर्यासाठी पौष्टिक मूगडाळ
sakal

बोलून बातमी शोधा

health benefits of moong pulses

मूगडाळीचे आपण अनेक पदार्थ बनवू शकतो. खीर, लाडू, कोरड्या भाज्यांमध्ये मूगडाळीचा वापर, वरण असे एक ना अनेक पदार्थांची चव आपण चाखली आहे. यामधून तर आपल्याला पोषक तत्व मिळतातच. पण, मूगडाळीचे पाणी सर्वात पोषक आहे

वजन कमी करण्यापासून तर केसांच्या सौंदर्यासाठी पौष्टिक मूगडाळ

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर - सर्वात प्रोटीनयुक्त आणि पोषक असणारी डाळ म्हणजे मूग डाळ. पचायला हलकी असल्याने आपल्यापैकी बरेचजण मूग डाळ खाण्याला पसंती देतात. पण, दररोज आपल्या आहारात मूगडाळ असेल तर शरीरातील पोषक तत्वांचा अभाव लवकरच दूर होईल. तसेच डेंग्यूसारख्या धोकादायक आजारापासून बचावासाठी देखील मूगडाळ फायदेशीर ठरते.

मूगडाळीमधील पोषक तत्व - जर आपण एक कप मूगडाळ घेतली तर त्यामध्ये १४ ग्रॅम प्रथिने, १ ग्रॅम फॅट, १५ ग्रॅम फायबर, फोलेट, शूगर, कॅल्शियन, मॅग्नेशियम, जस्त या धातूंचा समावेश असतो. याशिवाय जीवनसत्व ब देखील आढळून येते.

मूगडाळीचे आपण अनेक पदार्थ बनवू शकतो. खीर, लाडू, कोरड्या भाज्यांमध्ये मूगडाळीचा वापर, वरण असे एक ना अनेक पदार्थांची चव आपण चाखली आहे. यामधून तर आपल्याला पोषक तत्व मिळतातच. पण, मूगडाळीचे पाणी सर्वात पोषक आहे. हे तयार करण्यासाठी प्रेशर कूकरमध्ये दोन वाटी पाणी गरम करायचे. त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि मूग डाळ घालायची. २ ते ३ शिट्टया झाल्यानंतर डाळीला चांगले बारीक करून घ्यायचे. या पाण्याचे सेवन केल्याने अनेक आजार दूर पळतात.

हेही वाचा - फायदेशीर असूनही होमिओपॅथी उपचारपद्धती दुर्लक्षित का?...

वजन कमी करण्यास मदत - 
मूग भूकेवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. यामुळे वजन घटवण्याचा प्रयत्न करणार्‍यांसाठी मूगडाळीचे सेवन हा चांगला पर्याय आहे. तसेच  यामध्ये कॅलरीजची कमी आणि फायबरची मात्रा जास्त असते. त्यामुळे रक्तदाबाचा त्रासही आटोक्यात राहतो.  तसेच मूगडाळ शरीरातील मेटाबोलीजम वाढविण्यास मदत करते. त्यामुळे वजन नक्कीच कमी होते.

चेहऱ्यावरील सुरकुत्या  
मूगडाळीमध्ये व्हिटॅमिन आणि फॉस्फरस घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे चेहर्‍यावरील सुरकुत्या कमी होतात. तसेच नैसर्गिकरित्या चेहर्‍यावरील डाग कमी करण्यासाठी मूगडाळ फायदेशीर आहे. 

मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर - मूगडाळीच्या पाण्यामुळे शरीरातील इन्सुलिनची पातळी वाढत असल्याचे डॉक्टर सांगतात. याशिवाय मूगडाळीमुळे शरीरातील साखरेवर देखील नियंत्रण राहते. त्यामुळे मूगडाळीच्या पाण्याचे सेवन करणे हे मधुमेहाच्या रुग्णासाठी फायदेशीर मानले जाते.

हेही वाचा - कोरोनाकाळात ज्येष्ठमध आहे सर्वात गुणकारी; सर्दी, खोकल्यापासून बचावासाठी रामबाण उपाय

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत - मूगडाळीच्या पाण्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे आपण डेंग्यूसारख्या धोकादायक आजारांपासून स्वतःला वाचवू शकतो.

केसांच्या आरोग्यासाठी - 
मूगडाळीमध्ये कॉपर मुबलक प्रमाणात आढळते. यामुळे केस मजबूत होण्यास मदत होते. मूगडाळीमुळे मेंदूमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत होते. केसांना मुळांसह मजबूतपणा येण्यास मदत होते. 

शरीर स्वच्छतेसाठी मदत - आपल्या शरीरातील घाण स्वच्छ न झाल्यास आपल्याला अनेक आजार जडतात. त्यासाठी मूगडाळीच्या पाण्याचे दररोज सेवन केल्याने शरीरातील घाण दूर होते आणि शरीर स्वच्छ होते. याशिवाय या डाळीच्या पाण्यातील पोषक घटकांमुळे यकृत, मूत्राशय, रक्त आणि आतडे देखील स्वच्छ राहण्यास मदत होते.

 
 

loading image