बहुगणकारी मेथी : लठ्ठपणापासून तर मासिक पाळी, सर्व आजारांवर एकच उपाय

मेथी
मेथीe sakal

नागपूर : आपल्या स्वयंपाकघरात अनेक मसाले असतात. त्यापैकी मेथी (fenugreek seeds) हा एक असा पदार्थ आहे, आरोग्यासाठी लाभदायक जाते. मेथीचा वापर अनेक पदार्थांमध्ये केला जातो. त्यामुळे त्या पदार्थांची चव देखील वाढते. मेथीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, झिंक, फॉस्फरस, फॉलिक अॅसिड, लोह, सोडियम यांसारखे खनिजे आढळते. त्यामुळे मेथीचे नियमित सेवन केल्यास अनेक आजार बरे होतात. (health benefits of fenugreek seeds)

मेथी
पेव्हर ब्लॉकवरून धावणे धोकादायक!

पोट निरोगी ठेवण्यास मदत -

आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे, अनेक आजार बळावताना दिसतात. अनेक बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. तसेच अनेक पोटाच्या व्याधी देखील उद्भवतात. त्यामुळे शरीर कमजोर बनत जाते. तुमचे पोट नेहमी साफ होत नसेल तर मेथीचे दाणे खावे. हे दाणे पाच ते सहा तासांसाठी पाण्यात भिजत घालून ठेवा. त्यानंतर एक कपड्यात बांधा. त्याला एका दिवसात अंकुर फुटतील. त्यानंतर तुम्ही ही मेथी खाऊ शकता.

मेथी लठ्ठपणाची समस्या दूर करते -

आजकाल वाढते वजन ही गंभीर समस्या बनली आहे. वजन कमी करण्यासाठी आपण निरनिराळ्या पदार्थांचा वापर करतो. मात्र, लठ्ठपणा कमी होती. तज्ज्ञांच्या मते चयापचय क्रियेच्या कमरतेमुळे लठ्ठपणा वाढतो. मात्र, मेथीचे सेवन केल्यास चयापचय क्रिया वाढण्यास मदत होते. त्यामुळे लठ्ठपणा कमी होतो. यासाठी तुम्ही अंकुरित मेथी किंवा मेथीचा चहा पिऊ शकता. मेथीचा चहा बनवण्यासाठी प्रथम एक चमचा मेथी पूड घेऊन गरम पाण्यात मिसळा. थोड्या वेळासाठी उकळवा आणि नंतर ते फिल्टर करा आणि त्यात लिंबाचा रस घाला. तुम्हाला आवडत असल्यास आपण थोडे मध देखील घालू शकता.

केस गळण्याची समस्या दूर -

आजकाल केस गळण्याची समस्या प्रदूषण आणि चुकीच्या आहारामुळे निर्माण झाली आहे . मेथीच्या दाण्यांचा नियमित वापर केल्यास आपण केस गळतीच्या समस्येपासून मुक्त होऊ शकता. अंकुर फुटलेली मेथी खाल्ल्यास केस गळण्याची समस्या दूर होण्यास मदत होते. मेथी भिजत घातल्यानंतर उरलेल्या पाण्याचा केस धुण्यासाठी वापर करू शकता.

मासिक पाळी नियमित -

आजकाल मासिक पाळी वेळेत न येणे ही एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. अनेक महिला या समस्येपासून ग्रस्त आहेत. त्यासाठी तुम्ही अंकुर फुटलेली मेथी खाऊ शकता. शरीरातील रक्तभिसरण प्रक्रिया सुधारते आणि पाळीतील अनियमितता दूर करण्यास मदत करते. यासाठी तुम्ही मेथीची पूडदेखील वापरू शकतात. त्यासाठी कोरडी मेथी बारीक करून घ्या. दररोज सकाळी उपाश्यापोटी एक चमचा मेथीची पूड आणि कोमट पाणी प्या. यामुळे पाळीचा त्रास दूर होईल.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com