हेल्दी फूड : प्रथिने आवश्‍यकच

आपण अनेकदा ऐकले आहे, की तुमची तब्येत सुदृढ राहण्यासाठी आहारातील प्रथिनांचे (प्रोटिन्स) प्रमाण वाढवा. याचे कारण काय असावे? प्रथिने नक्की का घ्यायची, याच्या कारणांबद्दल आपण आज बोलू या. प्रथिनांचे शरीरासाठीचे कार्य खूप महत्त्वाचे असते.
food
foodsakal

आपण अनेकदा ऐकले आहे, की तुमची तब्येत सुदृढ राहण्यासाठी आहारातील प्रथिनांचे (प्रोटिन्स) प्रमाण वाढवा. याचे कारण काय असावे? प्रथिने नक्की का घ्यायची, याच्या कारणांबद्दल आपण आज बोलू या. प्रथिनांचे शरीरासाठीचे कार्य खूप महत्त्वाचे असते.

दुरुस्ती आणि देखभाल

प्रथिने शरीरातील उतींची (टिश्यू) वाढ, त्यांची देखभाल आणि दुरुस्ती करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. केस, त्वचा, डोळे, स्नायू आणि काही अवयव प्रथिनांपासून बनलेले असतात. लहान मुलांना मोठ्यांच्या तुलनेत त्यांच्या प्रतिकिलो वजनाच्या तुलनेत अधिक प्रथिनांची गरज असते, कारण त्यांच्या शरीरात प्रथिनांपासून बनणाऱ्या नव्या उती सातत्याने विकसित होत असतात.

ऊर्जा

प्रथिने ऊर्जेचा स्रोत आहेत. तुम्ही तुमच्या शरीराला आवश्यक असलेल्या देखभाल आणि इतर कार्यासाठी आवश्यक असलेल्या प्रथिनांपेक्षा अधिक प्रथिने घेतल्यास त्यांचा उपयोग ऊर्जेप्रमाणे केला जाऊ शकतो. मात्र, त्यांचा उपयोग ऊर्जेसारखा न झाल्यास त्यांचे रूपांतर मेदामध्ये (फॅट्स) होऊन ते शरीरात साठवले जातात.

food
शोध स्वतःचा : प्रतिपक्ष भावना आणि स्वच्छ मन!

हार्मोन्स (संप्रेरक)

हार्मोन्सचा पाया प्रथिनेच असतात. हार्मोन्सद्वारे तुमच्या शरीरातील कार्ये नियंत्रित केली जातात. उदा. इन्शुलिन हे प्रथिनांवर आधारित हार्मोन असून, ते तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करते.

एन्झाइम्स (विकर)

विकर प्रथिनेच असतात व त्यांचे कार्य शरीरातील रासायनिक अभिक्रियांचा वेग वाढविणे, हे असते. उदा. चयापचय करणारे एन्झाइम्स शरीरातील प्रथिने, कार्बोहायड्रेट्स व फॅट्सचे पचन करण्याच्या क्रियेत सहभागी होतात.

शरीरातील रेणूंचे वहन आणि साठवण

वहन करणाऱ्या प्रथिनांद्वारे विविध रेणू बांधून घेऊन त्यांचे सर्व पेशी व शरीरभर वहन केले जाते. उदा. हिमोग्लोबिन हे प्रोटिन शरीरातील रक्तापर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा करते. प्रथिनांचा उपयोग फेरिटिनसारखे काही प्रकारचे रेणू साठवून ठेवण्यासाठीही केला जातो. या प्रथिनाचा लोहाशी संयोग होऊन यकृतामध्ये साठविले जाते.

food
इनर इंजिनिअरिंग : भव्य भारताचे निर्माण

प्रतिपिंडे (अॅन्टिबॉडिज)

प्रोटिनद्वारे प्रतिपिंडांची निर्मिती करतात व त्याचा उपयोग शरीरात प्रवेश करणाऱ्या विषाणू व जिवाणूंना ओळखून त्यांना नष्ट करण्यासाठी करतात. उदा. इम्युनोग्लोब्युलिन जी (आयजी जी).

प्रथिनांचा आहारातील उपयोग

परिपूर्ण अन्नामध्ये विविध प्रकारच्या अमिनो अॅसिड्सचे जोड्या असतात. साधारणपणे, मांस, डेअरी उत्पादने आणि अंडी या प्राणिजन्य प्रथिनांमध्ये शरीराला आवश्यक सर्व प्रकारची प्रथिने असतात व त्यामुळेच त्यांना परिपूर्ण प्रथिने असे म्हटले जाते. सोयाबीन हे असे एकमेव वनस्पतिजन्य अन्न मानले जाते, ज्यामध्ये परिपूर्ण प्रथिने आहेत. शेंगादाणे, धान्ये, काजू-बदाम आदींमध्ये काही अमिनो अॅसिड्स विपुल प्रमाणात असतात, तर इतरांमध्ये खूपच कमी असते. विविध वनस्पतिजन्य पदार्थांचे एकत्र सेवन करून शरीरातील अमिनो अॅसिड्चे प्रमाण नियंत्रित ठेवणे शक्य होते. पुढील भागात आपण शरीराला किती प्रमाणात प्रथिनांची गरज असते, हे पाहू.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com