esakal | आरोग्यासाठी नागरिकांनी केले मुंडण; ओव्हरलोड वाहतुकीमुळे त्रस्त
sakal

बोलून बातमी शोधा

आरोग्यासाठी नागरिकांनी केले मुंडण; ओव्हरलोड वाहतुकीमुळे त्रस्त

आरोग्यासाठी नागरिकांनी केले मुंडण; ओव्हरलोड वाहतुकीमुळे त्रस्त

sakal_logo
By
आनंद चलाख.

राजुरा (जि. चंद्रपूर) : बल्लारपूर वेकोलि क्षेत्रांतर्गत गोवरी डीप कोळसा खदान इथून सास्ती रेल्वे पॉइंट जवळ दररोज ओव्हरलोड कोळसा वाहतूक होते. कुठलीही ताडपत्री न झाकता दररोज २५० ओव्हरलोड ट्रक या मार्गावरून धावत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे वेकोलिचे दुर्लक्ष होत आहे. वारंवार निवेदन देऊनही वाहतूक बंद झाली नसल्यामुळे नागरिकांनी गुरुवारी (ता. २) गौवरी येथे चक्काजाम आंदोलन केले. आज सकाळचे सहा वाजल्यापासून आंदोलन सुरू आहे. त्यामुळे वेकोलि प्रशासन खडबडूण जागे झाले.

ढोल ताशाच्या नादात नागरिकांनी चक्काजाम केला व वेकोलि प्रशासनाच्या निषेधार्थ मुंडण करून जाहीर निषेध नोंदविला. अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलिस बंदोबस्त होता. बल्लारपूर वेकोलि अंतर्गत गौवरी, पवनी, गोयेगाव परिसरात प्रचंड प्रमाणात कोळसा खाणी आहेत. राजुरा, गौवरी, पवणी, साखरी कवठाळा मार्गावर दिवस-रात्र अवजड वाहतूक सुरू असते. अनेक वर्षांपासून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले आहेत. त्यामुळे कोट्यावधींची रॉयल्टी शासनाला मिळून सुद्धा हा मार्ग अतिशय दयनीय अवस्थेत आहे.

हेही वाचा: मेहुण्याला वाचवायला गेला अन् विहिरीत बुडून मेला

या मार्गावर वारंवार अपघात होतात. याबाबत नागरिकांनी अनेकदा प्रशासनाला निवेदने दिली. मात्र, मार्गाचे मजबूत खडीकरण आणि डांबरीकरण झाले नाही. मार्गाचे काँक्रीटीकरण आणि रुंदीकरण कराने, अशी मागणी स्थानिकांची आहे. वणवे ट्रॅफिक झाल्यास अपघाताचे प्रमाण कमी होईल. याबाबत नागरिकांनी निवेदनही दिले. मात्र, प्रशासनाचे साफ दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे नागरिकांनी गुरुवारी कोळसा वाहतूक रोखण्यासाठी चक्काजाम आंदोलन केले.

शासनाचे दुर्लक्ष

ओव्हरलोड वाहतुकीमुळे धुळीचे प्रमाण वाढले आहे. शेती लगत रस्त्यालगतची शेती पूर्णपणे नष्ट होत आहे. शिवाय नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मार्गावरील अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. शिवाय पार्किंग व्यवस्था कुठेही ठरावीक ठिकाणी होत नसल्यामुळे रात्री अनेक ठिकाणी अपघात होतात. या सर्व बाबीकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केलेला आहे.

हेही वाचा: दोघांचे मृतदेह वर्धा नदीपात्रात आढळले तरंगताना

तात्काळ उपाययोजना करा

या भागातील कोळसा खाणीमुळे शासनाला रॉयल्टी मिळते. मात्र, या भागातील विकासकामांसाठी खर्च होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे. नागरिकांच्या मूलभूत सुविधा पूर्ण करण्यासाठी शासनाने तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांनी केली.

loading image
go to top