esakal | तुमच्या हातातला सॅनिटायझर डुप्लिकेट तर नाही ना? घरच्या घरी घ्या टेस्ट
sakal

बोलून बातमी शोधा

hand sanitizer

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्यापासून सॅनिटायझर रोजच्या वापरातली गोष्ट बनली आहे. मात्र यातही बनावट सॅनिटायझर बाजारात आल्यानं मोठी अडचण निर्माण झाली आहे.

तुमच्या हातातला सॅनिटायझर डुप्लिकेट तर नाही ना? घरच्या घरी घ्या टेस्ट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी सध्या तरी कोणतंच औषध आलेलं नाही. त्यामुळे केवळ सोशल डिस्टन्सिंग हाच एक पर्याय आहे. याशिवाय हात सतत स्वच्छ धुणे आणि सॅनिटायझरचा वापर करण्यास सांगितलं जात आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्यापासून सॅनिटायझर रोजच्या वापरातली गोष्ट बनली आहे. मात्र यातही बनावट सॅनिटायझर बाजारात आल्यानं मोठी अडचण निर्माण झाली आहे. ओरिजनल आणि डुप्लिकेट सॅनिटायझरमधील फरक ओळखणं कठीण होत आहे. मात्र हे कसं ओळखायचं यासाठी काही गोष्टी तुम्हाला माहिती असायला हव्यात.

आरोग्य विभागाने कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सुरु झाला तेव्हाच स्पष्ट केलं होतं की, कोरोनाला रोखण्यासाठी तेच सॅनिटायझर उपयुक्त आहे ज्यामध्ये 70 ते 80 टक्के अल्कोहलचा वापर करण्यात आला आहे. दरम्यान, सॅनिटायझरच्या निर्मितीमध्ये आरोग्याची काळजी घेत काही प्रक्रिया फॉलो केल्या जातात. तुमचे हात स्वच्छ व्हावेत पण त्वचेला कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये यासाठी ते महत्वाचे असते. मात्र बनावट सॅनिटायझरमध्ये दोन्ही गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जातं.

हे वाचा - पाच असे पदार्थ जे जगभरात मानले जातात हेल्दी, तुमच्याही जेवणात असायलाच हवेत

बनावट सॅनिटायझर ओळखण्यासाठी तुम्ही टॉयलेट पेपर किंवा टिश्यू पेपरचा वापर करू शकता. यासाठी पेपरवर पेनच्या मदतीने एक गोल तयार करा. पेपरच्या बरोबर सेंटरला हा गोल तयार करा. पेनने तयार केलेल्या गोलामध्ये सॅनिटायझरचे काही थेंब टाका. जर या पेनाची शाई पसरली तर समजून जा की सॅनिटायझर बनावट आहे. तो तुमच्या हाताला पुर्णपणे निर्जंतुक करण्यास सक्षम नाही. जर शाई पसरली नाही आणि सॅनिटायझर टाकल्याने भिजलेला पेपर लगेच वाळला तर तो सॅनिटायझर वापरण्यायोग्य आहे असे समजावे.

हँड सॅनिटायझर बनावट आहे की नाही हे ओळखण्यासाठी हातावर घेतो तितकासा एका लहान भांडयात काढा. त्याला हेअर ड्रायरने वाळवण्याचा प्रयत्न करा. सॅनिटायझर नकली नसेल तर तो 3 ते 5 सेकंदात सुकेल. नकली असेल तर तो भांड्यात लगेच सुकणार नाही. 

हे वाचा - एक कप चहात फक्त दोन गोष्टी अॅड करून पहा, आरोग्यासाठी आहे फायद्याचे

सॅनिटायझरची गुणवत्ता तपासण्यासाठी तुम्ही आट्याचा वापर करू शकता. एका भांड्यात एक चमचा आटा घ्या. यामध्ये थोडं सॅनिटायझर टाका. दोन्ही मिसळण्याचा प्रयत्न करा. जर सॅनिटायझर बनावट नसेल तर आटा मळता येणार नाही. तो तसाच पसरलेला राहील. मात्र नकली असेल तर पाणी टाकल्यानंतर जसं पीठ मळता येतं तसा आटा होईल.