'या' काही सोप्या टिप्स वापरा; तणावाला 'Goodbye' करा

Psychological Stress
Psychological Stress
Summary

काही सोप्या टिप्स आहेत ज्या तुम्हाला तणाव कमी करण्यासाठी उपयोगी ठरु शकतील.

आपल्या शरीरावर दैनंदिन कामाचा आणि तणावाचा परिणाम होत असतो. यामुळे शारिरीक आणि मानसिक अशा दोन्ही त्रासांचा सामना करावा लागतो. हल्ली धावपळीच्या जीवनात अनेकजण तणावाखाली वावरत असतात. याचा शरीरावरही परिणाम होतो. आता लहानग्यांनाही याचा त्रास सुरु झाला आहे. एका संशोधनानुसार ८८ टक्के लोक तणावाचे शिकार असतात. मुलांमध्ये तणावाचे मुख्य कारण परीक्षा आणि प्रेशर असे आहे. परंतु काही सोप्या टिप्स आहेत ज्या तुम्हाला तणाव कमी करण्यासाठी उपयोगी ठरु शकतील. घरी राहूनही तुम्ही तणावावर नियंत्रित ठेऊ शकता. या काही टिप्स तुमच्या उपयोगी पडतील.

पोषक आहार आणि व्यायाम

तणावापासून मुक्तता हवी असल्यास दैनंदिनीमध्ये थोडा बदल करावा लागेल. सकस आणि पोषक आहारशिवाय शरीराला व्यायामाची सवय असणे गरजेचे आहे. घरीच फिरण्यास अन्यथा यासाठी कोणताीही ऑनलाइन क्लास सुरु करु शकता. यामुळे तुमचा तणावाचा त्रास कमी होईल. यासोबत आहारामध्ये ताजी फळे आणि भाज्यांचाही वापर सुरु करा.

Psychological Stress
फायब्रोमायल्जिया : रुग्ण हरवून बसतो स्वत:वरचे नियंत्रण

मेडिटेशन/मेडिटेशनचा अभ्यास करा

मेडिटेशन हे तणावावार मात करते, यासाठी त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. दिवसभरात स्वत:साठी थोडासा वेळ काढून मेडिटेशन करु शकता. यामध्ये फक्त तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रीत करा. यासाठी तुम्ही ऑनलाईन व्हिडीओचा वापरही करु शकता.

काही नवीन ट्राय करा

ज्यामध्ये तुमच कौशल्य आहे, अशा गोष्टींवर तुमचे लक्ष केंद्रीत करा. तुमच्याकडे एखादी कला असेल तर ती सादर करा. लेखन, चित्र काढणे, वाचणे, कुकिंग अशी कौशल्य तुम्ही विकसित करु शकता.

Psychological Stress
Health Benefits: तुळशीची पाने खाण्याचे आरोग्यदायी फायदे...

रुटीन तयार करा

आपल्या दैनंदिनीमध्ये रुटीन असणे आवश्यक आहे. तणावाला कमी करण्यासाठी हे मदत करते. याला तुम्ही नियमित फॉलो करु शकता. यामुळे तुम्ही बीझी रहाल शिवाय शरीरासाठी हे रुटीन उपयोगी पडेतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com