वेगाने चालणाऱ्या महिलांमध्ये हृदयविकाराचा धोका 34 टक्क्यांनी कमी

अमेरिकन जेरियाट्रिक्स सोसायटीच्या जर्नलमध्ये नुकताच हा अभ्यास प्रकाशित झाला आहे.
fast walking
fast walking Esakal
Summary

अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी 50 ते 79 वर्षांच्या 25,183 महिलांच्या आरोग्याचे 17 वर्ष निरिक्षण केले. त्यानुसार त्यांनी हृदयविकाराचा धोका येण्याची शक्यता किती आहे याविषयी परिणाम बघितले. अमेरिकन जेरियाट्रिक्स सोसायटीच्या जर्नलमध्ये नुकताच हा अभ्यास प्रकाशित झाला आहे

हळूहळू चालणाऱ्या महिलांच्या तुलनेत वेगाने चालणाऱ्या महिलांमध्ये हृदविकाराचा झटका येण्याचा धोका 34 टक्के कमी असतो. अमेरिकेच्या ब्राऊन युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी दोन दशकांपासून वृद्ध महिलांवर (Old Age Women) केलेल्या संशोधनात हा दावा केला आहे. शास्त्रज्ञांनी २५ हजारांपेक्षा जास्त महिलांची दिनचर्या (Lifestyle) कशी आहे ते पाहिली. या काळात 1,455 महिलांना हृदयविकाराच झटका (Heart Attack) आला. म्हणजेच त्यांचे हृदय संपूर्ण शरीरात (Body) रक्त पंप करण्यास सक्षम नव्हते, असे त्यांना आढळले.

fast walking
के पॉप आहार घेतल्याने वजन कसं कमी होईल जाणून घ्या!
walking
walkingesakal

असा केला अभ्यास

शास्त्रज्ञांनी संशोधनात सहभागी झालेल्या महिलांना काही प्रश्न विचारले, त्यानुसार ताशी दोन मैल (3.2 किमी), सरासरी दोन ते तीन मैल किंवा ताशी तीन मैल (4.8 किमी) पेक्षा जास्त वेगाने चालतात का याविषयी त्यांना उत्तर द्यायचे होते. महिलांनी यावेळी जो प्रतिसाद दिला त्यानुसार . महिला वेगाने चालतात त्यांना हृदयविकाराचा झटका (Heart Atatck) येण्याचा धोका 34 टक्के कमी असतो, असा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी नोंदविला.

fast walking
पुरूषांनो, 'एनर्जी' वाढवायची असेल तर 'हे' पाच पदार्थ खा!
Walk
WalkWalk

17 वर्ष चालले संशोधन

अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी 50 ते 79 वर्षांच्या 25,183 महिलांच्या आरोग्याचे 17 वर्ष निरिक्षण केले. त्यानुसार त्यांनी हृदयविकाराचा धोका येण्याची शक्यता किती आहे याविषयी परिणाम बघितले. अमेरिकन जेरियाट्रिक्स सोसायटीच्या जर्नलमध्ये नुकताच हा अभ्यास प्रकाशित झाला आहे.

fast walking
आनंद महिंद्रांचा फिटनेस फंडा माहितेय का? या चार गोष्टींवर देतात भर
walk
walk

वेगाने चालणे हृदयाच्या आरोग्यासाठी फायद्याचे

वेगाने चालणे हे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहे, असे शास्त्रज्ञ सांगतात. जलद चालण्यामुळे शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया संतुलित राहते. हृदय चांगले काम करते. यामुळे हृदयाशी संबंधित समस्यांचा धोकाही कमी होतो. जे लोक वेगाने हालचाली करतात त्यांना हृदयाच्या समस्यांचा धोका 27 टक्के कमी असतो.

fast walking
सकाळ, संध्याकाळच्या व्यायामाचा शरीरावर वेगवेगळा परिणाम! अभ्यासात झाले स्पष्ट
heart
heart esakal

हृदयाच्या कार्यक्षमतेवर परिणाम

संशोधनादरम्यान 1,455 महिलांना हृदयविकाराचा झटका येऊन गेला होता.तसेच त्यांच्या हृदयातून शरीरात पुरेसे रक्त येण्याच्या प्रक्रियेत अडथळा येत होता. ही वृद्धत्वाची समस्या असून चांगल्या जीवनशैलीद्वारे योग्य ठेवली जाऊ शकते, असे संशोधनातील प्रमुख संशोधक डॉ. चार्ल्स इटन यांनी सांगितले. एका आठवड्यातील 150 मिनिटांच्या व्यायामाइतके थोड्या कालावधीसाठी वेगाने चालणे हे खूप फायद्याचे आहे, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. वृद्ध महिलांनी हृदयविकार टाळण्यासाठी त्यांच्या रोजच्या सवयीप्रमाणे वेगाने चालावे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यामागे इतरही कारणे असू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com