सतत हात धुताय ? वेळीच सावधान व्हा, कारण हे 'या' आजाराचं असू शकतं लक्षण 

मिलिंद तांबे
Monday, 27 July 2020

बऱ्याचदा पीडित व्यक्तीला साबणाने हात धुतल्यानंतर ही हात किंवा शरीर अस्वच्छ असल्याचे भासते त्यामुळे अश्या व्यक्ती कपडे धुण्याचा साबण किंवा सर्फ ऍक्सेल च्या पावडर ने हात स्वच्छ किंवा आंघोळ करतात.

मुंबई : कोरोना संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी डॉक्टर किंवा तज्ञ सतत हात धुण्याचा सल्ला देतात. आसपास स्वच्छता ठेवण्याचा सल्ला ही दिला जातो. अनेक लोक या गोष्टी तंतोतंत पाळतात. मात्र जगात अशी ही लोक आहेत जी आधीपासूनच या गोष्टींची अंमलबजावणी करत आहेत. काही लोकांनातर वारंवार हात धुण्याची तसेच साफ सफाई करण्याची सवय असते. खरतर ही सवई एका विशीष्ट प्रकारच्या आजाराची लक्षणे असू शकतात ज्याकडे लोकं फारसे लक्ष देत नाहीत.

हा आजार नेमका काय आहे?

या आजाराला ऑब्सेसिव कंपल्सिव डिसऑर्डर असे म्हणतात. हा एक मानसिक आजार आहे. बीबीसीच्या एका अहवालानुसार जे लोक आधीपासूनच या आजाराने ग्रस्त आहेत त्यांच्या अडचणी कोरोना काळात आणखी वाढल्या आहेत.

मोठी बातमी मुख्यमंत्र्यांच्या स्टिअरींच्या विधानांनंतर उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अजित पवारांकडून सूचक फोटो ट्विट

या आजाराने ग्रस्त लोकांना नेमकं काय वाटतं ?

ऑब्सेसिव कंपल्सिव डिसऑर्डर आजाराने ग्रस्त लोकांना वाटते की हात धुतल्यानंतर ही हात अस्वच्छ असल्याचे या लोकांना वाटते. त्यांना प्रत्येक वस्तू मध्ये विषाणू, बॅक्टेरिया किंवा घाण असल्याचा भास होतो. त्यामुळे ते वारंवार हात धुतात आणि साफसफाई करत राहतात मात्र तरी देखील त्यांच्या मनाचे समाधान होत नाही. खरतर त्यांनी आपले हात स्वच्छ धुतलेले असतात किंवा साफसफाई ही योग्य प्रकारे केलेली असते मात्र त्यांना त्यावर विश्वास नसतो.

या आजाराची लक्षणे काय आहेत ?

वारंवार हात धुणे , अंघोळ करतांना शरीर स्वच्छ झाले नाही असे वाटून तासोनतास आंघोळ करणे,संपूर्ण दिवस साफसफाई करत राहणे,स्वतावर विश्वास नसल्याने स्वच्छते बाबत दुसऱ्या लोकांना विचारणे. आपले हात अस्वच्छ होतील,वारंवार धुवावे लागतील म्हणून अशी लोकं सौचालयात देखील जाणे टाळतात. अश्या व्यक्ती दरवाजाची कडी व्यवस्थित लागली नाही म्हणून वारंवार तपासतात तसेच लाईटचा स्वीच देखील वारंवार पाहतात. 

अनेक वर्षे संशोधन केल्यानंतर ही या आजाराची नेमकी कारण शोधण्यात यश आलेले नाही. मात्र या आजाराबाबत अस मानलं जातं की, मेंदूमधील सिरोटोनिन हे रसायन कमी झाल्याने एखादे काम अपूर्ण असल्याचा भास होत राहतो.त्यामुळे पीडित व्यक्ती ते काम वारंवार करतात.

मोठी बातमी  - मुंबईत पुन्हा दमदार पावसाची एन्ट्री, अनेक ठिकाणी पाणीच पाणी

आजारांमुळे हे होते नुकसान

ऑब्सेसिव कंपल्सिव डिसऑर्डर आजाराने ग्रस्त लोकांना मानसिक आणि शारीरिक असे दोन्ही प्रकारचे नुकसान होऊ शकते. बऱ्याचदा पीडित व्यक्तीला साबणाने हात धुतल्यानंतर ही हात किंवा शरीर अस्वच्छ असल्याचे भासते त्यामुळे अश्या व्यक्ती कपडे धुण्याचा साबण किंवा सर्फ ऍक्सेल च्या पावडर ने हात स्वच्छ किंवा आंघोळ करतात.

वारंवार हात धुतल्याने किंवा आंघोळ केल्याने त्वांचा निस्तेज बनते, त्वचेवर सुरकुत्या येतात किंवा नंतर ती फाटू ही शकते. यामुळे शरीराला नुकसान पोहोचते. दैनंदिन कामाकडे लक्ष न देता पीडित दिवसभर केवळ साफसफाई करत राहतात. त्यामुळे चिडचिड वाढते, नैराश्य येते, याचा वाईट परिणाम कालांतराने तब्येतीवर होतो. 

ऑब्सेसिव कंपल्सिव डिसऑर्डर ने पीड़ित व्यक्तिवर वेळेत उपचार नाही केले तर हा आजार अधिक गंभीर होऊ शकतो. वेळेत निदान आणि उपचार केले तर हा आजार बरा होऊ शकतो. या आजाराने ग्रस्त व्यक्तीचं समुपदेशन करणे गरजेचे असते तसेच या पीडित व्यक्तींना डॉक्टर औषध ही देतात. यासह पीडित व्यक्तीला बिहेवियर थेरेपी देऊन एखादे काम वारंवार करण्यापासून रोखलं जातं. मात्र यासाठी आजाराचे वेळेत निदान आणि उपचार होणे महत्त्वाचे असल्याचे डॉक्टर सांगतात.

( संपादन - सुमित बागुल )

if you are washing your hands very frequently beware you might have obsessive compulsive disorder


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: if you are washing your hands very frequently beware you might have obsessive compulsive disorder