Toothache Home Remedy
Toothache Home Remedy

दात दुखते का? मग करा हे घरगुती उपाय अन् मिळवा आराम

नागपूर : अचानक दात दुखीचा (Toothache) अनुभव आपल्यापैकी बहुधा सर्वांनाच कधीतरी येतो. साधारणपणे दात किडल्याने दातदुखी उद्भवते. आहार, बदलती जीवनशैली यासारख्या कारणांसह मानसिक ताणतणावांमुळेही दातांचे आरोग्य बिघडत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशावेळी दुखणे कमी करण्याचे नैसर्गिक उपाय माहीत असलेले बरे. निसर्गातील अनेक वनस्पतींच्या वापराने दातदुखी (The use of herbs relieves toothache) कमी करता येते. उदा. मोहरी, काळे मिरे, लसूण आदी... (Toothache Home Remedy)

दातांचे दुखणे सहजा-सहजी जात नाही. दातदुखीचा त्रास एकदा सुरू झाला की, दुर्लक्ष करून चालत नाही. दात दुखीचा त्रास सुरू झाला की डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे. डॉक्टरांकडे लगेच जाणे शक्य नसेल तर काही घरगुती उपाय करून तात्पुरता आराम मिळून शकता. दातदुखी हा लपलेला शत्रू असतो. कारण, एकदा दात दुखायला लागले की धष्ट पुष्ट पहिलवान सुद्धा लहान मुलासारखा रडू लागतो.

Toothache Home Remedy
पत्नी उच्चशिक्षित असेल तरीही पोटगी द्या : उच्च न्यायालय

मिठाच्या पाण्याच्या चुळा भरणे

हलकीशी दातदुखी असेल किंवा दातांमध्ये काही अन्नपदार्थ अडकून दात दुखत असेल तर मिठाच्या पाण्याच्या चुळा भरणे हा उत्तम उपाय आहे. मीठ हे डिसइनफेक्टन्ट असल्यामुळे दातातील किटाणू मारते.

मिरे पावडर

एक चतुर्थांश चमचा मिठात चिमुटभर मिरे पावडर मिसळून दुखणाऱ्या भागात लावावे. यामुळे नक्की आराम मिळेल.

बर्फाचा शेक

आईसबॅग किंवा एखाद्या रुमालात बर्फाचे तुकडे गुंडाळून दुखत असलेल्या दातांना बाहेरून शेक द्या. बर्फाच्या थंडाव्याने तिथले रक्त गोठते आणि वेदना शांत होतात.

Toothache Home Remedy
विदर्भ ते थेट लंडन, शेतकरी पुत्राची ६३ हजार विद्यार्थ्यांमधून निवड

लसणीच्या कळ्या चावा

लसूण हे जखम बरी करण्यासाठी वापरण्यात येणारा आयुर्वेदिक पदार्थ. लसुणाचा पेस्ट करून दुखणाऱ्या दातावर लावा किंवा कच्चा लसूण चावून रस दुखणाऱ्या दाताजवळ न्या. असं केल्याने दातदुखीवर लवकर आराम मिळेल.

लिंबू व हिंग

लिंबात व्हिटामन सी असते. जो दात दुखत आहे तेथे लिंबाच्या चकत्या ठेवल्यानेही आराम मिळतो. दात दुखीवर घरगुती उपाय करताना हिंग फायदेशीर ठरते. यामध्ये दातदुखी कमी करणारे गुण आढळतात. बॅक्टेरियामुळे सडणाऱ्या दातांना वाचविण्यासाठी आणि दातदुखीपासून सुटका करण्यासाठी याचा उपयोग होतो. हिंग दातावर औषधाप्रमाणे काम करते.

बटाटा

दात दुखीसोबत सूज असेल तर बटाटा सोलून त्याच्या चकत्या करा आणि दुखणं असलेल्या जागेवर १५ मिनिटांपर्यंत ठेवावे. यामुळे आराम मिळेल.

Toothache Home Remedy
असा लागला ‘फटाका बंदूक’चा शोध; शेतकऱ्यांची सुटली समस्या

पुदिन्याचे तेल

पेपरमिंट नावाने ओळखल्या जाणाऱ्या पुदिन्याच्या तेलाचे काही थेंब दुखत्या दातावर टाकल्याने आराम मिळतो.

तेजपत्ता

तेजपत्ता प्राकृतिक वेदनानाशक आहे. दुखण्यापासून त्वरित आरामासाठी त्याचा वापर केला जातो. त्यात अनेक आौषधींचे गुणधर्म आहेत. दातांची सडणं आणि दुर्गंधी ते दूर करते. असे केल्याने दात दुखीपासून सुटका मिळते.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

(If-you have-a-toothache-do-this-home-remedy-and-get-relief)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com