कहाणी.. वजनदार स्त्रियांची, वाचा अधिक माहितीसाठी...

information about weight loss diet
information about weight loss diet

सुपरपॉवर असलेल्या "स्री' चा खास शत्रू... म्हणजे "वजन' हा काही केल्या हार मानत नाही.. काही अंडरवेट तर काही ओव्हरवेट.. कमी वजनी स्त्रिया एक वेळ कधी ना कधी अंगाने भरतील पण.. वजनदार स्त्रियांची करूण कहाणी काय सांगावी..? 
साडी बेढब दिसते, जीन्स होत नाही, थंडीत स्वेटर घालावा तर मूठभर घेर वाढतो, फॅशन तर कोणतीच करता येत नाही..आयुष्य त्या सलवार कुर्त्या मध्ये संपेल की काय असे वाटत राहते.. फिरायला जावं तर मैत्रिणींबरोबर गप्पाटप्पाच जास्ती होतात, जिमला जावं तर रोज जायचा कंटाळा.. म्हणजे नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न असा काहीसा प्रकार असतो.

सडपातळ बांध्याच्या मॉडेल्स आणि त्यांनी घातलेले सुंदर पोशाख हे तासंतास न्याहाळण्यापलीकडे आपण काहीही करू शकत नाही..कारण कधी कधी वजन इतके वाढलेले असते की आपल्या साईझचा कपडा सुद्धा बाजारात मिळणे मुश्‍किल होऊन बसते. काही जणी नवऱ्याबरोबर किंवा मैत्रिणींबरोबर व्यायाम सुरू तर करतात पण पुढे पुढे सगळे ढेपाळते.

कारण नवऱ्याचे वजन तर पटापट कमी होताना दिसते आणि आपला काटा आपल्या वजनाच्या इतका प्रेमात पडतो.. की त्यावरून हटता हटत नाही.. शेवटी आपण वजन कमी करायचा नाद सोडून देतो आणि शरीराची आबाळ करून घेतो..वाचायला मजेदार वाटेत असलं तरी.. ह्या सगळ्या घटनांशी आपण नक्कीच रिलेट करू शकतो.

लठ्ठपणा ही आजच्या जिवनपद्धतीमधील एक मुख्य समस्या बनली आहे. प्रत्येक तिसरा व्यक्ती लठ्ठपणाला सामोरे जातोय. सध्या भारतमध्ये जवळपास 4 कोटी 10 लाख लोकांचे वजन सामान्य वजनापेक्षा जास्त आहे. बहुतांश लोक सुरुवातीला वजन वाढण्याकडे लक्ष देत नाहीत परंतु जेव्हा वजन जास्त प्रमाणात वाढते तेव्हा ते कमी करण्यासाठी घाम गाळत बसतात.

वाढलेले वजन कमी करण्यासाठी खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. काही नैसर्गिक पदार्थ असे आहेत, ज्यांच्या सेवनाने वजन नियंत्रणात राहते. तुम्हालाही कमी कष्टामध्ये वजन कमी करण्याची इच्छा असेल तर आज आम्ही तुम्हाला काही छोटे-छोटे उपाय सांगत आहोत. हे उपाय केल्यास तुमचे वाढलेले वजन कमी होण्यास निश्‍चितच मदत होईल. 

घरीच करता येणारे सोपे उपाय 

  • - जास्त कार्बोहायेड्रेट असणाऱ्या पदार्थांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. साखर, बटाटा आणि तांदळामध्ये जास्त प्रमाणात कार्बोहायेड्रेट असते. यामुळे चरबी वाढते.
  • - फक्त गव्हाच्या पिठाची पोळी खाण्यापेक्षा गहू, सोयाबीन आणि हरभरे मिश्रित पिठाची पोळी फायदेशीर ठरते.
  • - दररोज पत्ताकोबीचे ज्यूस घ्यावे. पत्ताकोबीमध्ये चरबी कमी करणारे गुण असतात. यामुळे शरीरातील मेटाबॉलिज्म योग्य राहते.
  • - पपईचे नियमीत सेवन केल्याने कंबरेवरची अतिरिक्त चरबी कमी होते.
  • - दह्याचे सेवन केल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होते.
  • - रोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास घरातच तयार करण्यात आलेले ताक प्यावे.
  • - कारल्याची अर्धवट कच्ची भाजी वजन कमी करायला मदत करते.
  • - आवळा आणि हळद समान प्रमाणत घेऊन बारीक चूर्ण तयार करा. ताकामध्ये हे चूर्ण टाकून घेतल्यास कंबर बारीक होईल.
  • - दररोज सकाळी सूर्यप्रकाशामध्ये किमान 20 मिनिटे चालल्याने वजन कमी होते.
  • - दररोज योगासने केल्याने शरीर आणि मन सुस्त राहते आणि यामुळे वजन सहजपणे कमी होऊ लागते.

योगासन, व्यायाम अधिक भर
लॉकडाऊन काळात सर्वच घरात असल्याने, अनेकांना लढ्ढपणा, वजनवाढीचा त्रास होऊ लागला आहे. प्रामुख्याने स्रीयांना आपल्या वाढलेल्या वजनाचा खुप त्रास होतो. वजन कमी करण्यासाठी त्या उपाशी राहतात. परंतु, उपाशी राहील्याने वजन कमी होत नाही तर, त्यासाठी विशेष डायट प्लॅन तयार करावा लागतो. कमी खाने, प्रोटीनयुक्त खाने आणि योगासन, व्यायाम यावर अधिक भर दिल्यास, वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. 
- कवीता गुप्ता,
आहारतज्ज्ञ, नागपूर. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com