
महेंद्र गोखले - फिटनेसविषयक प्रशिक्षक
एकदा मी मैदानावर धावण्यास सुरवात करत असताना माझ्या गुडघ्याला दुखापत झाली. खूप दुखत होते. गुडघ्याला लागणे, दुखणे आणि ते ठीक होणे अतिशय त्रासदायक असते. केवळ दोन महिन्यांच्या विश्रांतीने मी बरा झालो हे नशीबच! मात्र, त्या दोन महिन्यांत मी फक्त शरीराच्या वरच्या भागाचे व्यायाम करू शकत होतो.