चुकीच्या पद्धतीनं कधीच तपासू नका ब्लड प्रेशर; जाणून घ्या योग्य पद्धत

चुकीच्या पद्धतीनं कधीच तपासू नका ब्लड प्रेशर; जाणून घ्या योग्य पद्धत

नागपूर : आज संपूर्ण देश कोरोना (Coronavirus) नावाच्या महामारीचा सामना करतोय. मात्र काही विकार असे आहेत जे भारतातील बहुतांश लोकांना आहेत. यात प्रमुख म्हणजे मधूमेह (Diabetes) आणि ब्लड प्रेशर (Blood Pressure) अनेकदा अधिक थकल्यामुळे, टेन्शनमुळे (Hypertension) किंवा इतर काही व्याधींमुळे आपला ब्लड प्रेशर वाढतं. तसंच काही वेळा ब्लड प्रेशर कमी (low BP home remedies) होऊन आपल्याला चक्करही येऊ लागतात. अशावेळी आपण डॉक्टरकडे जातो किंवा घरीच ब्लड प्रेशर तपासण्याच्या मशीनच्या (Blood Pressure Monitor Online) मदतीनं तपासतो. मात्र अशावेळी दाखवत असलेलं रिडींग बरोबर असेलच असं नाही. याच प्रमुख कारण म्हणजे चुकीची पद्धत. आज आम्ही तुम्हाला ब्लड प्रेशर तपासण्याची योग्य पद्धत सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. (Know Right steps to measure blood pressure at home )

चुकीच्या पद्धतीनं कधीच तपासू नका ब्लड प्रेशर; जाणून घ्या योग्य पद्धत
गडचिरोलीत पोलिस आणि नक्षल्यांमध्ये चकमक; १३ नक्षलवाद्यांचा खात्मा

यामुळे होतो ब्लड प्रेशरवर परिणाम

'व्हाईट कोट सिंड्रोम'

अनेकदा दवाखान्यात किंवा डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये आपलं ब्लड प्रेशर आपण तपासतो. अशावेळी अनेकांना माझं ब्लड प्रेशर वाढलंच असणार असं वाटतं. यालाच 'व्हाईट कोट सिंड्रोम' म्हणतात. यामुळे त्या ठिकाणी ब्लड प्रेशर वाढलेलंच आढळून येतं. मात्र बाहेर आल्यावर ते अगदी नॉर्मल येतं.

रीडिंग घेताना आपण कसे बसता

तुमच्या बसण्याची पद्धत बरोबरच असणं आवश्यक आहे. ब्लड प्रेशर तपासताना तुम्ही योग्य रीतीनं बसले नाहीत तर रिडींग चुकीचे असू शकतात.

तुमचा आहार

जर ब्लड प्रेशर मोजण्याच्या ३० मिनिटं आधी तुम्ही दारू किंवा अन्य तंबाखूयुक्त पदार्थांचं सेवन केलं असेल तर तुमचं ब्लड प्रेशर वाढलेलं असू शकतं. त्यामुळे ब्लड प्रेशर तपासण्यापूर्वी खानपानावर लक्ष द्या.

चुकीच्या पद्धतीनं कधीच तपासू नका ब्लड प्रेशर; जाणून घ्या योग्य पद्धत
"आई मला खेळायला जायचंय, जाऊ दे गं"; वाढली पालकांची डोकेदुखी

ही आहे ब्लड प्रेशर तपासण्याची योग्य पद्धत

  • ब्लड प्रेशर तपासण्यापूर्वी वॉशरूमला अवश्य जाऊन या.

  • रिडींग घेण्यापूर्वी 5 मिनिटं आरामदायक आणि सरळ स्थितीमध्ये बसा.

  • तुमचे पाय रिलॅक्स ठेवा, पायात मोड येऊ देऊ नका.

  • तुमचा हात छातीच्या उंचीवर टेबलावर ठेवा.

  • रिडींग घेत असताना अजिबात बोलू नका.

  • ब्लड प्रेशर कधीच शर्ट किंवा कुठल्या कापडाच्या वरून तपासू नका. त्वचेला ब्लड प्रेशरचा पट्टा लावा.

  • ब्लड प्रेशर तपासताना अगदी शांत आणि रिलॅक्स राहा. घाबरून जाऊ नका.

डिस्क्लेमर: ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.

(Know Right steps to measure blood pressure at home )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com