esakal | मुलांचे दात पिवळे का पडतात? वाचा कारण अन् उपाय
sakal

बोलून बातमी शोधा

teeth

मुलांचे दात पिवळे का पडतात? वाचा कारण अन् उपाय

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : मुले मोठे झाल्यावर दुधाचे दात पडतात आणि नवीन दात येतात. दोघांच्या रंगात थोडा फरक असतो. मोठ्या व्यक्तींच्या दातांमध्ये जास्त डेटींन असते. त्यामुळे दात दुधाच्या दातांपेक्षा अधिक पिवळे (yellowness of teeth) दिसतात. पण, मुलांचे दात जर जास्तच पिवळे दिसत असेल तर त्यामागे गंभीर कारणं असू शकतात. यामुळे दातांमध्ये पोकळी निर्माण होणे, दातांवर डाग दिसणे अशा समस्या जाणवू लागतात. (know the causes and treatment of yellow teeth of children)

हेही वाचा: corona positive story : एचआरसीटी स्कोअर १८ तर ऑक्सिजन लेव्हल ८२; मग झाला पुनर्जन्म

मुलांचे दात पिवळसर होण्याचे एकमेव कारण म्हणजे कॅविटी तयार होते. दातांमध्ये घाण असल्यामुळे त्याचा एक थर तयार होतो, जो पिवळ्या रंगाचा दिसतो. त्यालाच स्पॉट कॅविटी म्हणतात. तुमच्या मुलांमध्ये असे लक्षणं दिसत असतील तर तुम्ही लगेच दंतचिकित्सकाकडे दाखवायला विसरू नका.

  • खाल्ल्यानंतर मुलं व्यवस्थित ब्रश करत नसतील तर ते कण तिथेच जमा होतात. त्यानंतर त्यांच्या दातांवर पिवळसरपणा येऊ शकतो.

  • दातांना इजा झाली असेल तर रक्तिवाहनी तुटून दात पिवळसर दिसू शकतात.

  • लहान वयातच मुलांच्या पिवळ्या दातांमुळे फ्लूरोसिस देखील होऊ शकतो. जर दात जास्त पिवळे दिसले तर दंतचिकित्सकांचा सल्ला घ्या.

  • काही सप्लीमेंट घेतल्यामुळे किंवा हेपेटायटीस, कावीळ किंवा इतर आजारांमुळे मुलांचे दात पिवळसर होऊ शकतात.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

मुलांच्या दातांचा पिवळसरपणा घालविण्यासाठी ब्लिचिंग सुरक्षित आहे का?

अनेकजण क्लिनिकमध्ये जाउन डॉक्टरांना विचारतात की दातांवरील पिवळसरपणा काढून टाकण्यासाठी ब्लीचिंगचा वापर करता येतो का? तर त्याचे उत्तर नाही असे आहे. मुलाच्या दातांमधील पिवळसर रंग काढून टाकण्यासाठी आपल्याला दंतचिकित्सकाशी संपर्क साधावा लागेल. मुलांच्या दातांवर ब्लीचिंगचा वापर करू नका. मुलांच्या दातवर ब्लीच करण्याची शिफारस करु नका. ब्लीचिंग उत्पादनांमध्ये पेरोक्साइड असते जे मुलांचे दात खराब करू शकते. म्हणून आपल्याला हे करणे टाळावे लागेल, विशेषत: अशा मुलांसाठी ज्यांचे दूध दात आहेत.

मुलाचे दात पिवळसर होण्यापासून कसे रोखावे?

  • मुलाचे दात पिवळपणापासून वाचवण्यासाठी ब्रशिंगसह फ्लॉक्स करण्याची सवय लावा. सुरुवातीला, तुम्ही मुलांसमोर फ्लॉसिंग करा. त्यानंतर त्यांना करायला सांगा. यामुळे दातामध्ये अडकलेले अन्न बाहेर पडेल.

  • मुले किंवा मोठी, प्रत्येकाने दिवसातून कमीतकमी दोनदा ब्रश करण्याची सवय लावावी. यामुळे दात किडणार नाहीत आणि तुमचे दात निरोगी असतील.

  • मुलांना योग्यप्रकारे ब्रश करण्यास सांगावे.

  • आहारात जास्त साखर असेल तरीही मुलांच्या दातांवर पिवळसरपणा येऊ शकतो. यामुळे मुलांना ताजी फळे आणि भाजीपाला द्यावा.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)