कोरोना, प्रेग्नंसी आणि आईचं मानसिक आरोग्य!

सौ.विनया गोरे
Thursday, 3 December 2020

आजच्या काळात प्रेग्नांसीसाठी तयारी करत असतांना सगळे होणारे आई वडील, शारीरिक स्वास्थ्य, financial planning, social Condition, या सगळ्याचा विचार करतात पण या सगळ्यामध्ये मागे पडतं ते मानसिक स्वास्थ्य!

पुणे: अक्षया आणि अमित दोघंही माझ्याकडे लग्नापूर्वी समुपदेशनासाठी आले होते, पण आज Session ला येण्यामागचं कारण वेगळं होतं. अक्षया," मॅम माझी हल्ली खूप चिडचिड होतीये आणि एकदम असं रडायलापण येतंय, आई होतांना हे असं सगळं होणं कितपत बरोबर आहे? सध्या ही सगळी कोरोनाची परिस्थिती आहे मला समजतंय की इतका विचार नाही केला पाहिजे पण मी काय करू विचार येतात कसं होईल सगळं?" अमित, "मॅम ही खूप विचार करते हल्ली, तिचा थोडा सेन्सेटिव्ह स्वभाव आहेच ना पण काळजी करणं आणि चिडचिड जरा वाढलीये हिची! पण म्हणून त्याच त्याच गोष्टींचा विचार करून अजून त्रास होतोय हे हिला समजतच नाहीये." अक्षया आणि अमित दोघंही गोंधळलेले आणि काळजीत होते, आई बाबा होण्याच्या या टप्प्यात हे असं सगळं खूप अनपेक्षित आणि वेगळं वाटतं होतं त्यांना. 

आता इथे जसं अमित आणि अक्षया एका महत्वाच्या गोष्टीचा विचार करत नव्हते, तसंच आपण सगळेच किंबहुना आई बाबा होणारे सर्व जण ही गोष्ट विसरून जातो या गोष्टी काळजीघेण, त्या कडे लक्ष देणे हे सगळं मागे पडतं, आणि ती गोष्ट म्हणजे, होणाऱ्या आईच व बाबांचं मानसिक स्वास्थ्य! मानसिक आरोग्य!प्रेग्नांसी मधील मानसिक आरोग्याचं महत्व काय आहे ते बघू.

वाचा सविस्तर- कहाणी एका वृद्ध शेतकऱ्याची...

आजच्या काळात प्रेग्नांसीसाठी तयारी करत असतांना सगळे होणारे आई वडील, शारीरिक स्वास्थ्य, financial planning, social Condition, या सगळ्याचा विचार करतात पण या सगळ्यामध्ये मागे पडतं ते मानसिक स्वास्थ्य! आपलं शरीर आणि मन जोडलेल आणि एकमेकांवर अवलंबून आहे. यामुळेच बाळासाठी विचार करतांना आपल्या मानसिक स्वस्थ तंदुरूस्त असणं गरजेचं आहे.

 हल्ली होणाऱ्या आईसाठी प्रेग्नन्सीचे दिवस हे अधिक तक्रारींचे आणि अस्वस्थतपूर्ण असे असतात, जस की कंबर दुखी, गुढगेदुखी, भावनिक चढाव उतार, पण खरी कसोटी तेव्हा असते जेव्हा आजूबाजूच्या लोकांना तुम्ही कायम आनंदी राहावं असं वाटत असतं आणि तुम्ही सकारात्मक भावना अनुभवणं तुमचं मन आनंदी राहणं महत्वाचं आहे, कारण कुठलीही भावना अधिक तीव्रते जेव्हा एक आई अनुभवते तेव्हा ती भावना पोटातल्या बाळा पर्यंत पोचते आणि यामुळे होणाऱ्या आईने healthy भावनांचा अनुभव घेणे महत्वाचं आहे.

वाचा सविस्तर- सुंदर मी होणार

आपलं मन हे लोहचुंबकासारखं आहे, ते नकारात्म विचारांना, भावनांना पटकन आकर्षित करतं. आणि यामुळे प्रेग्नन्सी मध्ये तुम्ही सकारात्मक विचार करणं, सकारात्मक राहणं महत्वाचं आहे. होणाऱ्या आईच मानसिक स्वास्थ्य चांगलं असेल तर बाळाचं सुद्धा संपूर्ण स्वास्थ्य छान होतं!

ते म्हणतात ना, Happy healthy mother gives birth to happy healthy child, म्हणूनच आईबाबा होण्याची तयारी करत असतांना तुमच्या मानसिक स्वास्थ्याची पण काळजी घ्यायला हवीये!

(लेखिका मानसोपचार तज्ञ आहेत)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pregnancy during corona mental health precautions