Vitamin C शरीरासाठी गरजेचं, पण जास्त प्रमाण ठरु शकतं धोकादायक

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 18 November 2020

अनेक फळे आणि भाज्यांपासून व्हिटॅमिन सी मिळत असते.

पुणे: व्हिटॅमिन C शरीरासाठी खूप महत्वाचे असते, याला ऍस्कॉर्बिक ऍसिड (Ascorbic Acid) असेही म्हणतात. याची निर्मिती आपल्या शरीरात होत नसल्याने व्हिटॅमिन Cची गरज आपल्या शरीराला असते. अनेक फळे आणि भाज्यांपासून व्हिटॅमिन सी मिळत असते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते-
व्हिटॅमिन सी पाण्यात विद्राव्य असते. तसेच संत्री, स्ट्रॉबेरी, किवी, ब्रोकोली आणि पालक यांसारख्या फळे आणि भाज्यांमध्ये व्हिटॅमिन सी चं प्रमाण मोठं असतं. व्हिटॅमिन सी मुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि विविध रोगांशी लढण्यास मदत होते. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे स्कर्व्ही रोग होतो. पण व्हिटॅमिन सी चे प्रमाण शरीरात वाढल्यास त्याचे दुष्परिणाम होतो.

Natural Weight Loss Tricks: घरगुती उपायांद्वारे करु शकता वजन कमी

व्हिटॅमिन सीचा शरीरावर कसा परिणाम होतो?
 -जर तुम्ही दररोज 1000 मिलीग्रॅमपेक्षा जास्त व्हिटॅमिन सी घेतलात तर तुम्हाला जुलाब, मळमळ, उलट्या, छातीत जळजळ, पोटदुखी, डोकेदुखी आणि इन्सोमेनिया यांचा त्रास होऊ शकतो.
- सर्वसाधारणपणे स्त्रियांनी 75 मिलीग्रॅम नियमित आणि पुरुष 90 मिलीग्रॅम व्हिटॅमिन सी चे सेवन करावे.

शरीरासाठी व्हिटॅमिन सी ची गरज का आहे?
-कोलॅजेनच्या (collagen) निर्मितीमध्ये व्हिटॅमिन सी महत्त्वाची भूमिका बजावते.
- व्हिटॅमिन सी कनेक्टिव्ह ऊती (TISSUE) वाढतात आणि सांध्यांना आधार देतात. यामुळे जखम लवकर बरी होण्यास मदत होते. 
-तसेच इतर कारणांसाठी शरीराला व्हिटॅमिन सी आवश्यक आहे.

कोरोना रुग्णांमध्ये आढळली vitamin D ची कमतरता; 5 पदार्थांचे करा सेवन

रक्तदाब नियंत्रित केला पाहिजे-
-व्हिटॅमिन सी रक्तवाहिन्यांना मजबूत करते आणि याचा हृदयाला रक्त पुरवठा होण्यास मोठी मदत होती.
- तसेच यामुळे रक्तदाबी कमी होतो. 
-व्हिटॅमिन सीच्या वापरामुळे प्रौढांमधील सिस्टॉलिक रक्तदाब कमी होतो. 
- पक्षाघात किंवा हृदयाशी संबंधित इतर समस्यांचा धोका कमी होतो.

तणाव मुक्त करण्यास मदत होते- 
शरीरातील व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे तणावाशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. त्यात आढळणारे पोषक घटक तणावासाठी संवेदनशील असतात. व्हिटॅमिन सी मुळे तणावाची पातळी कमी होते आणि एकूण आरोग्य सुधारण्यास मदत होत असते.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: much vitamin c is dangerous for health blood pressure