मशरूमचे आश्चर्यकारक फायदे; आजच करा खायला सुरुवात

Nagpur news The amazing benefits of mushrooms Start eating today
Nagpur news The amazing benefits of mushrooms Start eating today

नागपूर : आजच्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येकाला स्वस्थ रहायचे असते. त्यासाठी आपण व्यायाम करणे, सेंद्रिय अन्न खाणे आदी सर्व प्रकारच्या गोष्टी करतो. तसेच लोक वाढत्या वजनाची विशेष काळजी घेतात. वजन वाढू नये म्हणून बरेच उपाय करतात. वाढते वजन केवळ मशरूम खाणे थांबवू शकते असे म्हटले तर आपण काय म्हणालं? होय, वजन कमी करण्यात मशरूम खूप प्रभावी मानली जातात.

मशरूमचे आश्चर्यकारक आरोग्य फायदे आहेत. मशरूम उत्कृष्ट स्वाद आणि आश्चर्यकारक आरोग्य फायद्यांसाठी ओळखले जाते. अनेक पौष्टिक आणि जीवनसत्त्वे समृद्ध असलेल्या मशरूम आरोग्यास फायदा देते. हेच कारण आहे की ते जगभरातील स्वयंपाकघरांमध्ये आपले स्थान ठेवत आहे. मशरूममध्ये उष्मांक कमी आहे. परंतु, हे पोषक तत्वांनी भरलेले आहे. हे बऱ्याच प्रकारे खाल्ले जाते.

मशरूम औषधी गुणधर्मांचा खजिना आहे. पोटाशी संबंधित अनेक आजारांशिवाय इतर अनेक शारीरिक समस्यांमध्येही याचा फायदा होतो. मशरूम देखील व्हिटॅमिन डीचा चांगला स्रोत मानला जातो. त्यामुळे हाडे मजबूत होतात. आपल्याला त्याचे फायदे देखील माहित असावेत. आजारांशी लढण्यासाठी मशरूम फायदेशीर आहे.

कारण, त्यामध्ये असलेले घटक रोग प्रतिकारशक्ती वाढवतात. ज्यामुळे व्यक्तीला सर्दीसारखे आजार लवकर होत नाही. तसेच यात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण अगदी कमी प्रमाणात असते. त्यामुळे ते रक्तातील साखरेची पातळी वाढू देत नाही. मशरूममध्ये व्हिटॅमिन डी देखील भरपूर प्रमाणात असते. ते हाडे मजबूत करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.

वजन कमी करण्यास प्रभावी

वजन कमी करण्यासाठी मशरूम एक चांगला पर्याय आहे. मशरूममध्ये असलेले द्रव्य आणि तंतू कोलेस्टेरॉलची पातळी कमी करतात. यात उच्च पोषक घटक असतात. जे हृदयाला निरोगी ठेवण्यास मदत करतात. मशरूममध्ये अँटीऑक्सिडेंट्सची महत्त्वपूर्ण प्रमाणात असते. तसेच त्यात एर्गोथिओनिन सर्वात खास आहे, हे वजन कमी करण्यात सर्वात उपयुक्त आहे. वाढत्या वयानुसार आपल्या शरीरात बरीच लक्षणे वाढू लागतात, जी मशरूम कमी करण्यात मोठ्या प्रमाणात उपयुक्त ठरते.

हाडे मजबूत बनवते

मशरूमला व्हिटॅमीन डी चा एक चांगला स्त्रोत मानले जाते. त्यामुळे हाडे मजबूत होतात. मशरूमचे नियमित सेवन शरीरासाठी फायदेशीर ठरते.

गंभीर आजारांमध्येही फायदेशीर आहे

मशरूम हे फायबर, प्रथिने आणि अँटिऑक्सिडेंट्सचे समृद्ध स्रोत आहेत. याचे सेवण केल्यास अल्झायमर, हृदयरोग, कर्करोग आणि मधुमेह यासारख्या गंभीर आजारांचा धोका कमी करण्यात मदत होऊ शकते.

बद्धकोष्ठता, अपचन करेल दूर

मशरूमचे सेवण केल्यास पोटासंबंधी अनेक रोगांपासून मुक्तता मिळू शकते. मशरूममध्ये फायबर आणि कार्बोहायड्रेट्सचे पुरेसे प्रमाण असल्यामुळे ते पोटदुखी, बद्धकोष्ठता आदीपासून आराम देते.

औषध म्हणून वापर

अशा बऱ्याच भाज्या आहेत, ज्यांना लोकांची पहिली पसंती असते. परंतु, मशरूम ही शाकाहारींची सर्वात पहिली निवड असते. ते खाण्यासाठी चव नसल्यामुळे आपल्या शरीरासाठी अधिक फायदेशीर आहे. आपल्या शरीरास पोषक घटकांची विशेष गरज असते. हे घटक मशरूममध्ये आढळतात. एवढेच नव्हे तर मशरूम फायबरचा चांगला स्रोत देखील आहेत. मशरूम अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी औषधे म्हणून वापरली जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com