
डॉ. पंचाग्नुला म्हणाले,"मधुमेह झाल्यानंतर पाच ते 15 वर्षातच रुग्णाला किडनी फेल्यूअर होण्याची शक्यता असते. त्यामुळे मधुमेही व्यक्तीचे पहिल्या टप्प्यातच किडनी फेल्यूअरचे निदान होणे अपेक्षित आहे. यासाठी आम्ही देशभरात विविध रुग्णांच्या मूत्राच्या चाचण्या घेतल्या. त्यातून केलेल्या संशोधनातून आम्हाला हा 'जैवनिर्देशक' निश्चित करण्यात यश आले आहे.
पुणे : मधुमेहाची राजधानी म्हणून जगभरात भारताची ओळख आहे. 2025 पर्यंत 6 कोटी 99 लाख भारतीय मधुमेहाच्या विळख्यात अडकलेले असतील, असा अंदाज संशोधक व्यक्त करत आहे. मधूमेहात 'किडनी फेल्युअर'ने मृत्यू ओढावल्यांचे प्रमाणही जास्त आहे. किडनी फेल्युअर अंतिम टप्प्यात असल्यावरच त्याचे निदान होते. त्यामुळे बचावणाऱ्यांची संख्याही कमी आहे. यावर प्रभावी उपाय म्हणून मधुमेह झाल्यास किडनी फेल्यूअरचे पूर्वानुमान देणाऱ्या 'जैवनिर्देशका'चा (बायोमार्कर) शोध राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या शास्त्रज्ञांनी घेतला आहे.
उन्हाळ्यात व्यायाम करताना घ्या काळजी
एनसीएलचे वैज्ञानिक डॉ. वेंकटेश्वरलु पंचाग्नुला, तसेच डॉ. कुप्पान गोकुलकृष्णन आणि डॉ. व्ही. मोहन यांनी यांच्या चमूने हे संशोधन केले आहे. यामध्ये मद्रास मधुमेह संशोधन संस्था, बंगळूर येथील राष्ट्रीय मानसिक आरोग्य आणि मज्जातंतू विज्ञान संशोधन संस्था यांचाही समावेश आहे.
फिट है तो हीट है : मानसी कुलकर्णी
डॉ. पंचाग्नुला म्हणाले,"मधुमेह झाल्यानंतर पाच ते 15 वर्षातच रुग्णाला किडनी फेल्यूअर होण्याची शक्यता असते. त्यामुळे मधुमेही व्यक्तीचे पहिल्या टप्प्यातच किडनी फेल्यूअरचे निदान होणे अपेक्षित आहे. यासाठी आम्ही देशभरात विविध रुग्णांच्या मूत्राच्या चाचण्या घेतल्या. त्यातून केलेल्या संशोधनातून आम्हाला हा 'जैवनिर्देशक' निश्चित करण्यात यश आले आहे.'' या जैवनिर्देशकामूळे मधुमेही व्यक्तीचे किडनी फेल्यूअर होऊन मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण कमी, पण त्याच बरोबर कमी उत्पन्न गटातील व्यक्तीला लवकर निदान झाल्यास आवश्यक ती काळजी घेता येईल.
असा शोधला 'जैवनिर्देशक'
- पुर्वमधुमेह, मधुमेह झालेली आणि किडनी फेल्यूअर असलेल्या 500 रुग्णांची संशोधनासाठी निवड.
- सर्व रुग्णांच्या मुत्राच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यासाठी प्रथमच भारतीय (आशियायी) व्यक्तीसाठी संशोधनाची प्रक्रिया निश्चित करण्यात आली.
- रुग्णांच्या मुत्रामधील "डायमिथीलार्जीन' या प्रथिनांचा अभ्यास करण्यात आला. या प्रथिनांचे रासायनिक बंधाच्या रचनेवरुण समान (सिमेट्रीक) आणि असमान (असिमेट्रीक) असे भाग पडतात. त्यांचा लेसर आयोनायझेशन मास स्पक्ट्रोस्कोपीच्या साहाय्याने अभ्यास करण्यात आला.
- किडनी फेल्यूअरची प्रक्रिया होत असलेल्या रुग्णात या असमान ते समान "डायमिथिलार्जीन' प्रथिनांच्या वजनाच्या गुणोत्तरात मोठा बदल होतो. हाच बदल मधूमेहींसाठी जैवनिर्देशक म्हणून उपयोगात येणार आहे.
Video : अभिनेत्री इलाश्री गुप्ता सांगतेय फिटनेस मंत्र
(व्यक्तीचा प्रकार (रुग्णांची संख्या) ः असमान ते समान डायमिथीलार्जीनचे गुणोत्तर
मधुमेह नसलेला (95) ः 1.08
पूर्व मधुमेही (80) ः 1.07
नुकतेच मधुमेहाचे निदान (120) ः 1.05
किडनी फेल्यूअरचे निदान झालेले (140) ः 0.909
किडनी फेल्यूअरच्या अंतिम टप्प्यात (120) ः 0.714
वुमन हेल्थ : पीसीओएस - समजून घेऊया!
पाश्चिमात्य देशांमध्ये किडनी फेल्यूअर झालेल्या व्यक्तीचा उपचाराचा खर्च सरकार करते. आपल्याकडे तशी व्यवस्था नाही. मधुमेह असलेल्या सामान्य घरातील व्यक्तीच्या किडनी फेल्यूअरचे निदान आधीच झाले. तर, ती व्यक्ती व्यायाम आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यातून लवकर बाहेर पडू शकते. पर्यायाने तिचे प्राणही वाचतील.
- डॉ. वेंकटेश्वरलु पंचाग्नुला