इनर इंजिनिअरिंग : देवाच्या मूर्तींची निर्मिती का?

भारतीय संस्कृतीमध्ये, देव वर कुठेतरी बसून काहीतरी करत आहे, अशी कुठलही संकल्पना नाही. निदान, काही शतकांपूर्वी तरी तसा विश्वास नव्हता.
Sadguru
SadguruSakal
Summary

भारतीय संस्कृतीमध्ये, देव वर कुठेतरी बसून काहीतरी करत आहे, अशी कुठलही संकल्पना नाही. निदान, काही शतकांपूर्वी तरी तसा विश्वास नव्हता.

तुम्ही एखाद्या नदीवर जाऊन कळशीमध्ये पाणी भरले, तर ते पाणी त्या कळशीचा आकार घेते. पाण्याचा कायमस्वरूपी असा कुठलाच आकार नाही. तुम्ही त्याला ज्या काशात ओताल, ते त्याचा आकार घेते. त्याचप्रमाणे, ज्याला तुम्ही देव म्हणता, जरी त्याला आकार नसला, तरी तुम्हाला त्याच्याशी नाते जोडण्यासाठी, मूर्तींची निर्मिती केली गेली.

भारतीय संस्कृतीमध्ये, देव वर कुठेतरी बसून काहीतरी करत आहे, अशी कुठलही संकल्पना नाही. निदान, काही शतकांपूर्वी तरी तसा विश्वास नव्हता. हाच देव आहे किंवा तोच देव आहे अशा संकल्पना केवळ गेल्या सहा ते सात शतकांमध्ये निर्माण झाले आहे. अन्यथा, नेहमीच ‘शिव’ याचा अर्थ ‘जे नाहीये ते’. शिव या शब्दाचा हा अर्थच मुळात ‘जे नाहीये ते’ असा आहे. सामान्य मनुष्य ‘जे नाहीये ते’ अशा कुठल्या तत्वाशी कसा संबंध जोडू शकेल? केवळ जेव्हा तुम्ही त्यासाठी कुठली ओळख निर्माण करता तेव्हाच त्यासोबत तो संबंध जोडू शकेल. म्हणूनच मूर्ती निर्माण केल्या गेल्या.

साधारणपणे, सर्व संस्कृतींमध्ये देवाला चांगले आणि खूप चांगले दर्शवले जाते. तुम्ही या जगाकडे पाहिल्यास तुम्ही त्याकडे चांगले म्हणून पाहू शकत नाही. शिवाबद्दल अशा अनेक कथा आहेत, ज्या ऐकल्या तर तुम्ही त्याला चांगले म्हणू शकत नाही आणि वाईटही म्हणू शकत नाही. काही वेळा, शिव एका सच्च्या योग्याप्रमाणे बसतो, तर दुसऱ्या वेळी तो एखाद्या दारुड्यासारखा फिरतो आणि आणखी कुठल्या वेळी, तुम्ही त्याला आणखी कुठल्या रुपात पाहता. तुम्ही त्याबद्दल कुठलाही निष्कर्ष काढू शकत नाही. तुम्ही तो हेच करेल किंवा तेच करेल असे म्हणू शकत नाही. कधी तो कुठल्या गुंडाप्रमाणे वागतो, तर कुठल्या वेळी, तो ईश्वराचे मूर्त स्वरूप वाटतो. कुठल्या अन्य वेळी तो आणखी काही असतो. शिवाला हरेक प्रकारच्या गुणाने आणि स्वभावाने ओळखले गेले आहे.

हे असे का आहे याचे कारण म्हणजे, तो कुठल्याही साच्यात बसत नाही; त्याला कुठलाही आकार नाही. ज्याला कुठलाही एक ठराविक गुण नाही, त्याला एक ठराविक रूप दिले आहे, जेणेकरून तुम्ही त्या ऊर्जेशी संबंध जोडू शकाल. आपण शिवाला असे का दर्शवले आहे याचे कारण म्हणजे, तुम्ही शिवाला स्वीकारू शकलात, तर तुम्हाला इतर कुणालाही स्वीकारण्यामध्ये काहीच अडचण येणार नाही. साधारपणे तुम्ही देव म्हणता, तेव्हा तुमच्यासाठी तो म्हणजे चांगला आणि फक्त चांगलाच असतो. मग जे चांगले आहे ते स्वीकारण्यामध्ये काय अडचण आहे? पण जेव्हा शिवाचा विषय येतो, तेव्हा तो दारू पिऊन पडतो, तो चिडून कुणाची हत्या करतो; तो अशा अनेक गोष्टी करतो ज्या तुमच्या समजेपलीकडच्या असतात. पण तुम्ही लक्ष देऊन पाहिल्यास तुम्हला दिसेल की तो एका वेगळ्याच आयमातून कार्य करत आहे, तुमच्या तार्किक समजुतीच्या पलीकडचा एक आयाम. आपण देवाला अशा गुणांनी का घडवले आहे, याचे कारण, जर तुम्ही त्याला पूर्णपणे स्वीकारू शकलात, तर तुम्ही इतर कुठल्याही मनुष्याला पूर्णपणे स्वीकारू शकाल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com