इनर इंजिनिअरिंग : नियती तुमच्या हातात

सद्गुरू : प्रत्येक व्यक्तीसाठी, मग ती कोणीही असो, त्याचे जीवन महत्त्वाचे आहे. त्याचे जीवन महत्त्वाचे असल्यावर त्याचे कल्याणही महत्त्वाचेच असते.
Sadguru
SadguruSakal
Summary

सद्गुरू : प्रत्येक व्यक्तीसाठी, मग ती कोणीही असो, त्याचे जीवन महत्त्वाचे आहे. त्याचे जीवन महत्त्वाचे असल्यावर त्याचे कल्याणही महत्त्वाचेच असते.

सद्गुरू : प्रत्येक व्यक्तीसाठी, मग ती कोणीही असो, त्याचे जीवन महत्त्वाचे आहे. त्याचे जीवन महत्त्वाचे असल्यावर त्याचे कल्याणही महत्त्वाचेच असते. लोक त्यांच्या कल्याणासाठी पुष्कळ वेळ खर्च करतात. एखाद्या व्यक्तीने इंजिनिअर बनण्यासाठी, पैसे कमावण्यासाठी चांगली २५ वर्षे गुंतवलेली असतात. त्याने आपले अर्धे आयुष्य आपल्या कुटुंबाच्या बांधणीसाठी खर्च केलेले असते, पण त्याने त्याच्या आंतरिक कल्याणासाठी किती वेळ खर्च केला आहे?

आज प्रत्येकजण बाह्य परिस्थिती हाताळण्यात आणि सुधारण्यात व्यग्र आहे. पण तुम्ही बाह्यपरिस्थिती कितीही सुनिश्चित केल्या, तरी तुम्ही त्या शंभर टक्के सुनिश्चित करू शकत नाही. कोणीही करू शकत नाही. जगातील उच्चभ्रू समाज त्याचे जिवंत उदाहरण आहे. त्यांनी बाह्यगोष्टींची पुरेशी व्यवस्था केली आहे, पण त्या लोकांची स्थिती पाहा. उदाहरणार्थ, अमेरिकेमध्ये बाह्य परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली गेली आहे, पण लोकांची लक्षणीय टक्केवारी नैराश्यावर इलाज घेत आहे. त्यांना स्वस्थ राहण्यासाठी औषधे घ्यावी लागतात! याला कल्याण म्हणत नाही.

तुमच्यापैकी जे पुरेसे यशस्वी आहेत - किमान तुमच्या बाह्य जीवनात - तुम्हाला समजते की, तुम्ही योग्य गोष्टी केल्याशिवाय ते काम करणार नाही. तुमचा अजूनही विश्वास आहे की, तुम्ही मूर्खपणाच्या गोष्टी कराल आणि एखादी प्रार्थना केल्यामुळे, ते सर्व काही ठीक होईल? नाही. तुम्हाला बाहेरच्या जगात यशस्वी व्हायचे असल्यास तुम्हाला योग्यच गोष्टी कराव्या लागतील. नाहीतर ते काम करणार नाही. मग तुम्हाला असे का वाटते की, आंतरिक गोष्टींच्या बाबतीत हे खरे नाही?

तुम्ही योग्य गोष्टी केल्याशिवाय, ते तिथेही काम करणार नाही. जसे बाह्य कल्याणासाठी एक विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे, तसेच आंतरिक कल्याणासाठी एक संपूर्ण विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे – योगशास्त्र – ज्याद्वारे तुम्ही स्वतःच्या नशिबाचे स्वामी बनू शकता.

काहीही पूर्वनियोजित नाही

काहीही पूर्वनिर्धारित नसते, अगदी मृत्यूदेखील नाही. सर्व काही तुम्हीच निर्माण केलेले आहे. अडचण अशी आहे की, तुम्ही त्यातील बहुतांश भाग नकळतपणे निर्माण करता, म्हणून तुम्हाला असे वाटते की, ते तुमच्यावर कुठूनतरी लादले जात आहे. तुम्ही काहीतरी नकळत निर्माण करू शकत असाल, तर तुम्ही ते जाणीवपूर्वकही निर्माण करू शकता. सर्व आध्यात्मिक प्रक्रियांचा हाच मुख्य प्रयत्न आहे - हे पाहणे की, तुम्ही तुमचे जीवन नकळतपणे निर्माण करण्याऐवजी ते जाणीवपूर्वक निर्माण करणे.

एकदा का तुम्ही त्यासाठी प्रयत्न केले की, तुमचे आयुष्य अधिकाधिक स्वनिर्धारित बनलेले दिसेल, पूर्वनिर्धारित नाही. तुमचे तुमच्या भौतिक शरीरावर प्रभुत्व असल्यास तुमचे १५ ते २० टक्के आयुष्य आणि नशीब तुमच्या हातात असेल. तुमचे तुमच्या मनावर प्रभुत्व असल्यास तुमचे ५० ते ६० टक्के आयुष्य आणि नशीब तुमच्या हातात असेल. तुमचे तुमच्या जीवनाच्या ऊर्जेवर प्रभुत्व असल्यास तुमचे १०० टक्के आयुष्य आणि नशीब तुमच्या हातात असेल. इतके की, तुम्ही मृत्यूचा क्षणही निवडू शकता, तुम्ही कधी आणि कसे मरावे - याचा अर्थ आत्महत्या नाही. तुम्ही कोणत्या गर्भात जन्म घ्याल, तुमचा जन्म कसा होईल ते तुम्ही निवडू शकता - तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण स्वनिर्धारित होऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com