
शेन वॉर्नने केलेल्या Liquid Dietचा आरोग्यावर कसा होतो परिणाम ?
लोकप्रिय क्रिकेटर शेन वॉर्नचा मृत्यूमुळे अनेकांना धक्का बसला. त्याच्या निधनानंतर काही दिवसांनी एक अहवाल समोर आला आहे. त्यानुसार वॉर्न १४ दिवस लिक्विड डाएटवर (Diet) होता असे सांगितले आहे. हे डाएट त्याच्या मृत्यूच्या कारणापेकी एक असू शकते असेही म्हटले आहे. शेन वॉर्नच्या मॅनेजरच्या म्हणण्यानुसार, शेन वॉर्न 14 दिवसांच्या लिक्वीड डाएटवर होता. या डाएटमध्ये फक्त द्रवपदार्थ प्यायचे. कोणतेही अन्नपदार्थ (Food) खायचे नाहीत. त्यामुळे वॉर्नला निधन होण्याच्या आधीच्या आठवड्यात नेहमीपेक्षा जास्त घाम येत होता. त्याच्या मुलानेही असे सांगितले. त्याने मृत्यूच्या काही दिवस आधी डाएट प्लॅन पूर्ण केला. त्यानंतर व्हेजमाइट टोस्ट खाल्ल्याचे अहवालात म्हटले आहे. वॉर्नने जे डाएट केले होते त्याला लिक्वीड डाएट म्हणतात.
हेही वाचा: Morning Drinks : रिकाम्यापोटी जीरं, ओव्याचे पाणी प्यायल्याने होतील 'हे' फायदे
लिक्वीड डाएट म्हणजे काय
वजन कमी करणाऱ्या लोकांमध्ये हे डाएट खूप लोकप्रिय आहे. यात शीतपेये पिऊन कॅलरीज बर्न करण्याचा प्रयत्न केला जातो. वजन कमी करण्यासाठी लोक लिक्विड डाएट करतात. यामध्ये फळे आणि भाज्यांचा रस किंवा शेक घेतला जातो. दिवसातून तीन वेळा ते प्यायचे असते. पण त्यादरम्यान काहीही खायचे नाही.
हेही वाचा: नाश्ता, जेवणाची योग्य वेळ कोणती? आयुर्वेद काय सांगते जाणून घ्या!
या डाएटचे धोके काय?
वॉर्नच्या निधनाचा आणि त्याचा डाएटचा संबंध सांगणारा कोणताही पुरावा नाही. हार्ट फाउंडेशनचे हेल्थ एक्सपर्ट प्रोफेसर गॅरी जेनिंग्स यांच्या मते, काहीवेळा कमी-कॅलरीजचे सेवन हृदयाच्या आरोग्यावर परिणाम करू शकते. अशा आहारामुळे हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. याचा हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. लिक्वीड डाएटमध्ये तुम्हाला आवश्यक पोषक द्रव्ये मिळत नाहीत. कमी-कॅलरी आहारामध्ये प्रथिने, कर्बोदके, चरबी, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचे योग्य संतुलन नसते, असे मानले जाते.
Web Title: Shane Warne Followed Extreme Liquid Diet Expert Explain What Is It And How Safe For Body
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..