निरोगी जगण्याचे 10 मंत्र!

निरोगी जगण्याचे 10 मंत्र!

आपल्या सर्वांसाठी २०२० हे वर्ष फारसे चांगले नव्हते. हवेत आजार पसरलेला होता, आपल्या खाण्याच्या सवयी इतस्ततः पसरल्या होत्या आणि शारीरिक हालचालींवर मोठ्या मर्यादा आल्या होत्या. या वर्षासाठी आपण रोज एक चांगली सवय लावून घेऊयात व तिची नोंदही ठेवूयात... चला तर मग, नव्या वर्षाची जोरदार सुरुवात करूयात... त्यासाठी या सवयी लावून घ्या.

जंक फूड फेका : सुटीच्या काळात तुम्ही फ्रिजमध्ये साठवून ठेवलेले जंक फूड काढून फेकून द्या. ते तुमच्या शरीरासाठी कोणतीही चांगली गोष्ट करीत नाहीत, ते केवळ रिकामे उष्मांक तुमच्या शरीरात भरतात आणि तुम्हाला विनाकारणच काहीतरी खाण्यासाठी प्रवृत्त करतात. 

उगाच खाऊ नका : तुम्ही सुपर मार्केटमध्ये पाऊल ठेवण्याआधीच हे सुनिश्चित करा, की तुमचे जेवण झाले आहे आणि तुमचे पोट पूर्ण भरलेले आहे. यामुळे तुमची अनावश्यक जंक फूड खरेदी करून ते खाण्यापासून सुटका होईल.

फळे-भाज्या खा : सीझनल फळे आणि भाज्यांचा आहार घ्या. तुमची गोडाची भूक भागविण्यासाठी फळे खा, तर चटकदार खाण्याची हौस भागविण्यासाठी मीठ आणि मिरीचा वापर करा. 

काय खात ते पाहा : तुमच्या ताटामध्ये मॅक्रोज (प्रोटीन, कार्ब आणि पिष्टमय पदार्थ) हे तपासून पाहा. या सर्वांचे सुयोग्य मिश्रण तुमच्या ताटात असल्याची खात्री करून घ्या. 

आठवड्यात एकदाच बाहेरचे खा : तुमचे हॉटेलमध्ये जाऊन खाण्याचे प्रमाण तपासा. आठवड्यातून एकदाच बाहेरचे खा; त्यापेक्षा अधिक नको. यातून तुमच्या शरीर आणि पाकिटाचे होणारे नुकसान टाळण्यास मदतच होईल...

साधे अन्न शिजवा : मोठ्या गुंतागुंतीचे पदार्थ बनविणे टाळा, ते अत्यंत साधे ठेवा. खाल्लेले अन्न जड होऊ नये, यासाठी ते साधे असावे, हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

व्यायाम करा : दररोज एक तास व्यायामाचा आनंद लुटण्याची सवय लावून घ्या. तुम्हाला घाम येईल व दिवसभर हसवत ठेवतील असा कोणताही व्यायामप्रकार तुम्ही निवडू शकता.

घरचा डबा न्या : तुमच्या कामाच्या ठिकाणी घरूनच डबा घेऊन जा. दुपारी तीनच्या सुटीत सामोसा खाण्याची इच्छा झाल्यास डब्यातील शेंगदाणे, एखादे पळ, सुकामेवा आदी खाऊन त्या इच्छेला मारा. 

पॅक्ड फूड टाळा : कोणत्याही प्रकारचे पॅकबंद अन्न खाऊ नका. मैदा, साखर, ब्रेड किंवा कोणत्याही प्रकारच्या धान्यापासून बनविलेले हे पदार्थ पूर्ण  वर्ज्य करा.

विचारपूर्वक खा, छान झोपा : खाताना तुमच्या ताटातील अन्नाकडे पूर्ण लक्ष असूद्या. त्यामुळे ग्रहण करीत असलेले अन्न किती प्रमाणात आहे, हे तुमच्या लक्षात येईल. झोप या तुम्हाला सुदृढ बनविणाऱ्या गोष्टीकडे पूर्ण दुर्लक्ष केले जाते. विनाअडथळा झालेली झोप तुमचे मन, शरीर आणि आत्म्याची दुरुस्ती करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

मी सांगितलेल्या या दहा छोट्या गोष्टी तुमचे नवे वर्ष धडाक्यात सुरुवात करण्यास नक्की मदत करतील, अशी आशा आहे. पुढच्या वेळी आणखी माहितीसह भेटू...

(लेखिका ‘किलोबीटर’ या हेल्थ फूडविषयक स्टार्टअपच्या संस्थापिका आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com